Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..
Extramarital affairs: आपण रोज वृत्तपत्रांमधून काही ना काही विवाह बाह्य संबंधाच्या बातम्या पाहत असतो. अलीकडच्या काळात विवाह बाह्य संबंधामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. साहजिकच यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रकरण हातावर गेल्यानंतर एकमेकांचा घटस्फोट देखील होतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मानवी स्वभावाच्या विविध कारणांनी मानव विवाहबाह्य संबंधाकडे वळतो.
या संबंधातून त्याला एकप्रकारे समाधान मिळते, याशिवाय आनंद सुद्धा मिळतो. त्यामुळे परिणामांचा विचार न करता महिला असो वा पुरुष विवाहबाह्य संबंधामध्ये अधिक गुरफटत जातात. मात्र त्याचे त्यांना गंभीर परिणाम देखील बोलावे लागतात. भांडणे, अविश्वास यामुळे नात्यातला ओलावा दिवसें दिवस कमी होत जातो. एकटेपणा जाणवायला लागल्याने मानवी स्वभाव आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. यात बर्याचदा काही चुकांमुळे तो विवाह बाह्य संबंधाचा आधार घेतो.
विवाहबाह्य समाजामध्ये आपला जोडीदार आपल्या जवळच्या व्यक्ती सोबतच संबंध जोडत असतो या संदर्भातील अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. जवळच्याच व्यक्तीकडूनच विश्वाघात झाल्याने अनेकदा अशा प्रकरणात नक्की काय करावे? हे सुचत नाही. त्यामुळे काहीजणांना अशा संबंधांची माहिती मिळताच नैराश्य येत. नैराश्यामुळे अनेकदा टोकाची पाऊले ऊचलली जातात. मात्र विवाहबाह्य संबंध निर्माण व्हायला आपण देखील तितकेच जबाबदार असतो. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा पार्टनर विवाहबाह्य संबंध का जोडतो? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
नात्याचा कंटाळा येणे
चंचल स्वभाव असणार्या व्यक्तींसोबत बहुतांशवेळा असा प्रकार घडु शकतो. चंचल स्वभावाच्या व्यक्तीचे मन कधीच स्थिर नसते. त्यामुळे कुठल्याही एका गोष्टीत ठराविक वेळ दिल्यानंतर बदलाची अपेक्षा तो करत असतो. अनेक जण हे कारण देतात मात्र या कारणाव्यतिरिक्त देखील काही कारणे आहेत. लग्नानंतर जोडीदाराने एकमेकांना पुरेसा वेळ देणे अपेक्षित असते. वेळ न दिल्यास त्यांच्यातील दुरावा वाढत जातो. महिलांना पुरेसा वेळ न दिल्यास एका ठराविक वेळेनंतर, त्यांना कंटाळा यायला लागतो. त्यामुळे मग पुरुष असो वा स्त्री त्यांच्या बाबतीत असे घडल्यास ते दुसरा आधार शोधण्याचा प्रयत्न करतात.
एकमेकांना समजुन न घेण्याची भावना
जोडीदारांमध्ये एकमेकांना समजुन घेण्याची भावना असणे फार जरुरी आहे. दोघांनीही आपणच बरोबर आहोत यावरून देखील वाद होत असतात. रोजच वादविवाद आणि भांडणे होत असतील नात्यामधील दुरावा निर्माण होतो. साहजिकच त्यामुळे घरात नैराश्याचे वातावरण निर्माण होते. अशांतच भांडणे वाढतच गेल्यानंतर एकमेकांबद्दलचे प्रेम कमी होत जाते. शारीरिक संबंध मध्ये भावनेचा खूप मोठा रोल आहे जर शारीरिक संबंध संदर्भात तुमची इच्छा असेल मात्र पाहुणा वेगळी असेल तर तुम्हाला संबंधांमध्ये समाधान मिळत नाही. साहजिकच यामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही विवाह बाह्य संबंध ठेवतात.
शारिरीक समाधान न झाल्यास
लग्नानंतर जोडीदार एकमेकांकडून आपली शारिरीक भुक भागवतात. परंतू एकमेकांचे शारिरीक समाधान न झाल्यास त्यांच्यामध्ये प्रेमाचा धागा ताणल्या जातो. बर्याचदा पुरुषांच्या काही चुकांमुळे पुरुष आपल्या महिला जोडीदारास समाधानी करु शकत नाही. त्यामुळे महिलांच्या आनंदावर कुठेतरी विर्जन पडल्यासारखे होते. महिला समाधानी होत नसल्याचे पुरुषांना सांगू देखील शकत नाहीत. अशीच परिस्थिती पुरुषांच्या बाबतीत देखील होऊ शकते. महिला देखील पुरुषांना हवा तितका रिस्पॉन्स देत नसल्याने पुरुष बाहेर विवाहबाह्य संबंध ठेवण्यचे कारण ठरू शकतात.
विश्वासाचा अभाव
कुठलेही नाते असो विश्वास हा नात्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या जोडीदारावर आपला विश्वास असला पाहिजे. परंतू आपण बर्याचदा बघतो की, एखाद्याने फुस लाऊन दिल्यानंतर या विश्वासाला तडा जाण्यास सुरुवात होते. संशय बळावत जातो आणि मग त्यातुन वादविवाद होतात. एकमेकांवर संशय घेतल्यास किंवा अविश्वास दाखवल्यास नात्यातील गोडवा हरवुन जातो. त्यामुळे प्रेम कमी होते. परिणामी दोघांकडून आधार शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कारण विवाह बाह्य संबंध जोडण्यासाठी पुरेसं ठरतं. निर्माण होतात.
मानसिक आधाराची गरज
आजही काही विशीष्ट मानसिकता बाळगणार्या व्यक्तींकडून स्त्रिकडे वस्तू म्हणून बघितले जाते. त्यामुळे घरकाम आणि शारिरीक संभोग यापुरतेच स्त्रियांना मर्यादित ठेवले जाते. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घरातल्या काही महत्वाच्या बाबींमध्ये सुद्धा तिचा समावेश केला जात नाही. शिवाय बर्याच घरांमध्ये स्त्रियांचा छळ केला जातो.
अशावेळी त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता असते. मानसिक आधार न मिळाल्यास त्या आधार शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यातुनच विवाह बाह्य संबंध निर्माण होतात. पुरुषांना सुद्धा जोडीदाराकडून मानसिक आधाराची आवश्यकता असते. मात्र त्यांना सुद्धा बर्याचदा मानसिक आधार न मिळाल्याने ते सुद्धा आधार शोधण्याचा प्रयत्न करतात. ज्यातुन विवाह बाह्य संबंध वाढत जातात.
पैश्यांचा मोह आणि आकर्षण
अनेकदा पैश्यांचा मोह आणि आकर्षण हे सुद्धा विवाह बाह्य संबंध होण्याचे कारणं ठरु शकते. आजच्या काळात महिलांच्या अनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिकरित्या भक्कम असणे जरुरी झाले आहे. मात्र महिलांच्या आर्थिक गरजा जोडीदार पूर्ण करु न शकल्यास व मानसिक आधार, प्रेम न देऊ शकल्यास महिला विवाह बाह्य संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात.
आकर्षण हे सुद्धा विवाह बाह्य संबंध ठेवण्याचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे विवाह बाह्य संबंधापासून दुर राहण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते. महत्वाचे म्हणजे नात्यात प्रेम आणि विश्वास यात कधीच कमतरता येऊ नये. मनाची ऊदारता दाखवत जोडीदाराला समजावुन घेण्याची मानसिकता आपण दाखवली पाहिजे.
हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..
Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.