Benefits of Eating Cashew: काजू खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम…

0

Benefits Of Eating Cashew Nut; काजू हा जवळपास सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. असे खूप कमी लोक असतील, ज्यांना काजू आवडत नाही. ड्राय फ्रूट्समध्ये काजुचा ऊपयोग सर्वाधिक केला जातो. तसेच कुठलेही शुभकार्य असले की घरात मिठाई आणलीच जाते. बहुतांश मिठाईमध्येसुद्धा आपण काजू बघतो. कारण काजू मिठाईला स्वादिष्ट बनवतात. काजुमध्ये पुष्कळसे विशेष गुणसत्व आहेत. आरोग्यासाठीसुद्धा काजु अत्यंत लाभदायी आहे.एखाद्या आजाराची तीव्रता कमी करण्यात काजु फार मोठे योगदान देते. त्यामुळे आजारी व्यक्तींसाठी सुद्धा काजू लाभदायी आहे.(Benefits Of Eating Cashew Nut)

केवळ आजारीच नाही तर शरीर निरोगी ठेवण्यासाठीसुद्धा काजू उपयोगी ठरतात. कारण काजूमध्ये प्रथिनांची मात्रा भरपूर आहे. शरीर निरोगी आणि सुदृढ असल्यास कुठल्याही रोगाचा किंवा आजाराचा शरीरावर होणार परिणाम तत्काळ काहीसा कमी होतो (Benefits Of Eating Cashew Nuts . काजू शरीरातील प्रथिनांमध्ये भर घालते. परिणामी शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होते, जेणेकरुन कुठल्याही आजाराशी दोन हात करायला आपले शरीर तयार असते. खाद्यपदार्थांना चविष्ट करण्यासाठी काजूचा ऊपयोग तर होत असतोच. परंतु, त्यासोबतच शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यात सुद्धा काजू फार लाभदायक आहे. काजूचे भरपुर फायदे आहेत, जे ऐकून तुम्ही लगेच काजु खाण्यास सुरुवात केली नाही तर नवलच. त्यामुळे आज या लेखात आपण  काजु खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Kashew Nuts) सविस्तर जाणुन घेणार आहोत. हेही वाचा: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

ऊर्जा देणारे “ब” जिवनसत्व प्रदान करते काजू:
शरीरात ऊर्जा नसेल तर ते शरीर कुठल्याच ऊपयोगाचे नसते. अशा स्थितीला आपण निरोगी म्हणू शकत नाही. मात्र शरीरात ऊर्जा असतांना अशक्य कामेसुद्धा आपल्याला सहज वाटु लागतात. काजुला ऊर्जेचा स्त्रोत मानले जाते. शरीरातील अंतर्क्रिया सुरळित चालण्यासाठी पेशींना ऊर्जेची आवश्यकता असते. “ब” जिवनसत्वामुळे पेशींना ती ऊर्जा मिळते आणि पेशी अधिक जोमाने काम करु लागतात. शरीरात “ब” जिवनसत्वाची कमतरता असल्यास वारंवार थकवा येणे, निरुत्साही वाटल्यासारखे होते. “ब” जिवनसत्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आजारसुद्धा जडु शकतो. त्यामुळे “ब” जिवनसत्वे फार महत्वाची आहेत आणि “ब” जिवनसत्वाची शरीरात वाढ करण्यासाठी काजू अत्यंत उपयुक्त ठरतात. हेही वाचा : या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

हृदयास सशक्त ठेवण्यात काजूचे योगदान:
जर तुमचे हृदयच कमजोर असेल तर कुठल्याही गंभीर आजारांस तोंड देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. हृदय शरीरातला फार महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हृदयाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा हृदयाचा आजार थेट मृत्युशी सामना करुन देऊ शकतो. निरोगी हृदय राहण्यासाठी डॉक्टर व्यायामाचा तसेच खाण्या पिण्याच्या काही पथ्थ्यांचा सल्ला देतात. परंतू यासोबतच काजूसुद्धा हृदयाला निरोगी ठेवण्यात आणि सशक्त करण्यात फार मोठे योगदान देते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाचा कुठलाही आजार झाल्याशिवाय राहत नाही. परंतू कोलेस्ट्रॉल वाढीवर नियंत्रण मिळवण्यातसुद्धा काजू महत्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे ज्यांना बीपी आणि हृदय संधर्भात काही समस्या आहेत, त्यांनी  काजू खाल्ले पाहिजेत.

एनीमियाच्या रुग्णांसाठी फायदेशीर:
अनेकांना एनीमियासारख्या गंभीर आजारास सामोरे जावे लागते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे एनीमिया होतो. विशेषता किशोरावस्थेमध्ये काही व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे  एनीमिया होऊ शकतो. काजू एनीमियाच्या रुग्णांसाठी वरदान असल्यासारखे आहे. शरीरातील रक्ताची कमी भरुन काढण्यात काजू फार मोठे योगदान देते. तसेच रक्तातील लोहाच्या प्रमाणातसुद्धा काजूमुळे वाढ होते. लोह अप्रत्यक्षरित्या शरीरातील प्रथिनांमध्ये वाढ घडवुन आणते, परिणामी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्ताच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे एनीमियाच्या रुग्णासाठी काजु अत्यंत प्रभावी ऊपाय ठरु शकतो. वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतल्या जाणार्‍या औषधांसोबत योग्य प्रमाणात नियमित काजू खाणे, एनीमियापासून कायमची मुक्ती मिळू शकते. flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल

काजूच्या फायद्यासोबत हे तोटेसुद्धा जाणुन घ्या: काजू शरीरासाठी अत्यंत ऊपयुक्त आहेत. परंतू कशाचेही सेवन करत असतांना, त्याचे एक निश्चित प्रमाण ठरलेले असते. त्यामुळे प्रमाणाबाहेर एखाद्या गोष्टीचे सेवन केल्यास, ते अपायकारक ठरु शकते. काजुच्या अतिसेवनामुळे सुद्धा काही समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी काजू धोकादायक ठरु शकते. काजु गोड असतात, त्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. रक्तातील साखर वाढल्यास मधुमेहाच्या रुग्णावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी शक्यतोवर काजुचे सेवन अल्पप्रमाणात करणेच फायदेशीर ठरते. गरोदर आणि स्तनपान करणार्‍या महिलांनीसुद्धा काजुचे अतिसेवन करणे धोकादायक ठरु शकते.

काजु खाण्याचे प्रमाण किती असावे?
काजू बद्दल या लेखात सविस्तर सांगितलेले फायदे बघुन तुम्हाला आता एक प्रश्न नक्कीच पडला असणार की, नेमके काजु खाण्याचे प्रमाण किती असावे? म्हणजेच एका वेळेला किंवा एका दिवसातुन किती काजू खावेत? जेणेकरुन ते आरोग्यासाठी लाभकारक असेन.  तर एक गोष्ट याठिकाणी आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. काजू खाण्याचे निश्चित असे कुठले प्रमाण नाही. मात्र दिवसातुन ४ ते   ५ काजुचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. निरोगी माणसाने यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास हरकत नाही.

हेही वाचा: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..

कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष.. 

हे व्हिडिओ पहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून.. 

brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो, ब्रेन टुमर, जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

Health Tips: गरम पाणी पिण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही असतील; पण तोटे जाणुन तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.