Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..
Ayushman Card: सर्व सामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार ( central government) अनेक योजना राबवत असतं. मात्र प्रत्येकाला या योजनेविषयी माहिती असेलच असं नाही. आज आपण अशाच एका योजनेविषयी सांगणार आहोत, ज्याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी (health) निगडित आहे. हातावर पोट असणाऱ्यांना दवाखान्याचा अगदी किरकोळ खर्च देखील देणं शक्य नसतं. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र आता सर्वसामान्यांना दवाखान्याच्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण कोणत्याही वैद्यकीय खर्चाची तब्बल पाच लाखापर्यंत रक्कम केंद्र आणि राज्य सरकार या योजेअंतर्गत देणार आहे. खरंतर ही योजना जुनीच आहे. पूर्वी या योजनेचे नाव ‘आयुष्मान भारत योजना’ (ABY) असं होतं. मात्र आता या योजनेचे नाव ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य मुख्यमंत्री योजना’ असं करण्यात आले आहे. सर्वप्रथम आपण या योजनेचा उद्देश जाणून घेऊ.
योजनेचा उद्देश
आरोग्य हा प्रत्येकासाठीच फार महत्वाचा विषय आहे. आर्थिक चणचण असणार्या कुटुंबियांना आरोग्यावरील खर्च अनेकदा परवडेनासा होतो. वैद्यकीय खर्च म्हणलं की अनेकांच टेंशन वाढतं. मात्र हेच टेंशन कमी व्हावं आणि प्रत्येक गरजुपर्यंत योग्य ती वैद्यकीय सुविधा पोहचावी या ऊद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत जनआरोग्य योजना सुरु केली. आज आपण या योजनेविषयी सविस्तर जाणुन घेऊयात.
काय आहे? आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
महागड्या शस्त्रक्रिया आणि अपुर्या वैद्यकीय सुविधांमुळे आजसुद्धा भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. मात्र या परिस्थितीत बदल घडवुन आणण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले ऊचलली. २३ सप्टेंबर २०१९ पासून आयुष्मान भारत योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाखापर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे, या विम्याचे प्रिमीयम हे सरकारकडून भरले जाणार आहे. याचाच अर्थ योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणार्या कुठल्याही शासकीय व खाजगी रुग्णालयात ५ लाखापर्यंचा वैद्यकीय खर्च तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ
आयुष्मान भारत या योजेअंतर्गत महिला, लहान मुले, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा या योजनेत विशेष समावेश करण्यात आला आहे. आयुष्मान भारत योजनेचा (ABY) लाभ घेण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही. लाभार्थी या योजनेचा लाभ कॅशलेस त्याचबरोबर पेपरलेस, सरकारी रुग्णालय त्याचबरोबर पॅलेस केलेल्या रुग्णालयामध्ये देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आयुष्मान भारत या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भातली पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांमधील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 श्रेणीचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. याविषयी विस्तृत सांगायचं झालं तर, ग्रामीण भागामध्ये ज्यांचं कच्चं घर आहे, अशांचा या योजनेत समावेश करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या वयाची संख्या १६ ते ५९ दरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंब प्रमुख ‘स्त्री’ असणे देखील आवश्यक आहे. कुटुंबातील एखादा व्यक्ती दिव्यांग असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती त्याचबरोबर भूमीहीन व्यक्ती, अशांचा या योजनेत विशेष सहभाग करण्यात आला आहे.
आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ घरगुती कामगार त्याचबरोबर रस्त्यावरील विक्रेते, भिकारी, फेरीवाले, बांधकाम करणारे कामगार, त्याचबरोबर रस्त्यावरील काम करणारे, गवंडी, प्लंबर, मजूर, पेंटर, वेल्डर, त्याचबरोबर सुरक्षारक्षक, हमारीचे काम करणारे, सफाई कामगार त्याचबरोबर घरकामगार, हस्तकला कामगार, शिंपी, रिक्षा चालक, छोट्या-मोठ्या दुकानातील कामगार, अशा अनेक कामगारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत वैद्यकीय लाभ घेणाऱ्या पेशंटची काळजी करण्यासंदर्भात दहा हजार नोकऱ्या देखील उपलब्ध केल्या गेल्या आहेत.
हॉस्पिटलायझेशनची प्रक्रिया
या योजनेच्या लाभार्थींना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. लाभार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यापासून ते उपचारापर्यंत सर्व खर्च या योजनेअंतर्गत दिले जातात. ज्या हॉस्पिटलच्या वार्डामध्ये लाभार्थ्यांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे, त्या हॉस्पिटलमध्ये एक आयुष्यमान मित्र असणार आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लाभार्थ्यांची सर्व मदत आयुष्यमान मित्र करतो. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये असणारा आयुष्यमान भारत योजनेचा मित्र करतो. दवाखान्यात एक हेल्प डेक्स देखील असणार आहे. जो कागदपत्राची तपासणी करून, योजनेअंतर्गत नोदणी करण्यास मदत केली जाईल.
या योजनेत कोणते आजार समाविष्ट आहेत?
आयुष्मान भारत योजनेमध्ये जवळपास प्रत्येक आजाराांसाठी वैद्यकीय त्याचबरोबर हॉस्पिटलायझेशनचा देखील खर्च दिला जातो. आरोग्य मंत्रालयाने या योजनेत 1354 पॅकेजेसचा समावेश केला आहे. यामध्ये कोरोनरी बायपास, त्याचबरोबर गुडघा बदलणे, स्टेंट घालणे यासारख्या उपचारांचा समावेश देखील समावेश करण्यात आला आहे.
आयुष्मान कार्ड कसे आणि कुठे बनवायचे
जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आयुष्मान कार्ड बनवता येते. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) याठिकाणीसुद्धा आयुष्मान कार्ड बनवले जाते. काही नोंदनीकृत अशासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सुलभतेने आयुष्मान कार्ड बनवु शकतो. आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेबाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी pmjay.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
फायदे
आयुष्मान योजनेअंतर्गत पात्र लोकांचे आयुष्मान कार्ड बनवल्यानंतर, कार्डधारक पॅनेलमधील हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे सर्व उपचार मोफत दिले जातात. मात्र आता आयुष्मान योजनेंतर्गत काही राज्यांमध्ये 5 लाख रुपयांहून अधिकचा लाभ देखील दिला जाणार आहे. याचे कारण म्हणजे, आता केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकार देखील 5 लाखाव्यतिरीक्त अधिक मदत करणार आहे.
ट्रान्सजेंडरला देखील मिळणार लाभ
आयुष्यमान भारत या योजनेत यापूर्वी ट्रांसजेंडरला सामील करण्यात आलं नव्हतं. मात्र आता ट्रान्सजेंडरला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय त्याचबरोबर गृहमंत्रालय यांच्यामध्ये या संदर्भात एक करार झाला. या करारामध्ये पाच लाख कुटुंबाचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रान्सजेंडरचा देखील समावेश करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरला या योजनेअंतर्गत पाच लाखांची मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या विम्याचा हप्ता हा सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागामार्फत भरला जाणार आहे.
हे देखील वाचा Pm kisan update: पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार या तारखेला; नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती..
snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.