drinking injurious to health: दारू पित असाल आणि ही लक्षणं जाणवल्यास समजून जा ‘लिव्हर’ होत चाललंय खराब..

drinking injurious to health: शरीरातील अवयव निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आहार खूप आवश्यक असतो. आपली लाईफस्टाईल आणि खाण्या पिण्याच्या सवयींवर आपल्या शरीराचे आरोग्य अवलंबून असते. आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर एक ना दिवस त्याचे गंभीर परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. अनेकांना मद्यपान करण्याची सवय असते. मात्र त्याचे गंभीर परिणाम शरीरातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या लिव्हरवर होतात. शरिरामधील निर्माण होणारी अतिरिक्त चरबी त्याचबरोबर अनेक प्रकारचे विटामिन्स साठवून ठेवण्याचे काम देखील लिव्हर करत असते. साहजिकच यामुळे लिव्हर व्यवस्थित ठेवणे खूप आवश्यक आहे.

अनेकांना आपल्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे खूप कमी वयात हे जग सोडून जावं लागतं. अलीकडच्या काळात तरुणाई मोठ्या प्रमाणात मद्याच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळतं. आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपले आयुष्य कमी करून घेत आहोत, याची जराही कल्पना या तरुणांना नसते. वारंवार मद्यपान केल्याने याचे गंभीर परिणाम लिव्हरवर होतात. हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग असल्याने लिव्हर सदृढ ठेवणे खूप महत्वाचे आहे. सतत मद्यपान केल्याने लिव्हरवर काय परिणाम होतात? लिव्हरवर परिणाम झाल्याने, कोणत्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते? हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

तसं पाहायला गेलं, तर लिव्हर खराब होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र यामधील महत्त्वाचे कारण हे दारूचा अतिरेक असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. चुकीच्या लाइफस्टाइलमुळे देखील लिव्हर लवकर खराब होतो. नॉन व्हेजचे अतिसेवन झाले तरी देखील लिव्हर खराब होत असल्याचे समोर आले आहे. तुमची पचनक्रिया वेवस्थित असेल, तर तुम्हाला लिव्हर संबंधी आजार होत नसल्याचे समोर आले आहे. परंतु जर तुमच्या आहारात नॉन व्हेजचे प्रमाण जास्त असेल, तर मात्र तुम्हाला लिव्हर संबंधी आजार होण्याची शक्यता अधिक असते. आता आपण लिव्हर खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे काय असतात? हे जाणून घेऊ.

लिव्हर शरीरातील अल्कोहोल बाहेर काढण्याचे काम करते. 

शरीरामध्ये असणारे विषारी पदार्थांना बाहेर काढण्याचे काम हे लिव्हर करत असते. तुम्ही दारूचे सेवन करत असाल, तर लिव्हर हे तुमच्या शरीरामधील असणारे अल्कोहोल बाहेर काढण्याचे काम करते. मात्र जर तुम्ही अति प्रमाणात आणि सतत दारूचे सेवन केलं, तर मात्र लिव्हरवर याचा ताण पडतो. आणि लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. जास्त आणि नेहमी मद्यपान केल्याने लिव्हर मधील फॅट्स वाढण्यास मदत होते. लिव्हरवर असणाऱ्या चांगल्या पेशी देखील कमी होतात. साहजिकच यामुळे तुमचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला तुमचं लिव्हर खराब होत असल्याची लक्षणे तुम्हाला जाणवणार नाही. मात्र ही प्रक्रिया हळूहळू होत असते.

दारूमुळे लिव्हर खराब होण्याची ही आहेत लक्षणे 

आपल्या शरीरातील विषारी पदार्थ त्याचबरोबर अल्कोहोल बाहेर काढण्याचे काम लिव्हर करत असते. हे आपण व्यवस्थितरित्या जाऊन घेतलं. आता आपण दारूमुळे लिव्हरवर काय परिणाम होतो? याची लक्षणे काय आहेत? हे सविस्तर जाणून घेऊ. दारूच्या अतिसेवनामुळे लिव्हरवर सूज येण्याचे प्रकार देखील घडतात. त्याचबरोबर तुमच्या पोटाच्या उजव्या साईटला अचानक दुखू लागू शकतं. जर तुम्ही दारूचे अतिसेवन करत असाल, आणि तुमचं अचानकपणे वजन कमी झालं, तर समजून जा, तुमचे लिव्हर खराब होत चाललं आहे. अचानक भूक कमी होणे, नेहमी मळमळ होत असेल, तर लिव्हर खराब होण्याची ही लक्षणे आहेत.

जास्त दारू पिण्याने लिव्हरवर होतो हा परिणाम 

तुम्ही वारंवार दारू पीत असाल, तर तुमच्या लिव्हरवर मोठ्या प्रमाणामध्ये फॅट्स तयार होतात. साहजिकच जास्त फॅट तुमच्या लिव्हरवर जमा झाल्याने, लिव्हरमध्ये असणारे एन्झाइम्स दारूमुळे वाढणाऱ्या फॅटला शरीराबाहेर काढण्यास समर्थ ठरत नाही. जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हरसारखी समस्या अधिक प्रमाणात असते. मात्र ही समस्या असली तरी देखील तुम्ही दारू बंद केल्यास लिव्हरची रिकवरी होऊ शकते. मात्र तुमचं लिव्हर किती खराब झाला आहे यावर देखील ही रिकव्हरी अवलंबून असल्याचे डॉक्टर सांगतात.

Alcoholic Hepatitis 

तुम्ही सतत दारूचे सेवन करत राहिला, तर तुम्हीला Alcoholic Hepatitis हा आजार होतो. जर का हा आजार झाला, तर यातून तुम्ही बाहेर पडू शकता. मात्र यासाठी तुम्हाला पूर्णपणे दारू सोडावी लागेल. दारू बरोबरच तुम्हाला तुमची लाइफस्टाइल देखील बदलावी लागेल. या आजारामुळे तुमच्या लिव्हरवर सूज येते. सोबतच तुम्हाला थोडा वेळ चालले तरीदेखील थकवा येण्याचे प्रकार होतात. जेवण देखील कमी होते. अचानक ताप मळमळ व इत्यादी लक्षणे तुम्हाला जाणवतात. तुम्हाला अशा प्रकारची काही लक्षणे असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचातळीरामांनो दारु पिताना चकना म्हणून हे चार पदार्थ टाळा, नाहीतर एकाच पेकमध्ये व्हाल फुल टल्ली

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Relationship tips: या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..

Second hand bike: 15, 22 आणि 28 हजारांच्या तीन Honda CB Shine विकल्या जात आहेत या ठिकाणी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.