तळीरामांनो दारु पिताना चकना म्हणून हे चार पदार्थ टाळा, नाहीतर एकाच ‘पेक’मध्ये व्हाल फुल टल्ली

0

अलिकडच्या काळात तळीरामांची संख्या अधिक वाढल्याचे पाहायला मिळते. काही तळीरामांना आठवड्यातून दोन तीन वेळा तर काहीजणांना रोज दारू प्यावी लागते. रोज दारू पिणाऱ्या तळीरामांना दारू मिळाली नाही, तर त्यांची अवस्था काय होते, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दारू पिण्याची अनेकांची वेगवेगळी पद्धत असते. खेडेगावात देशी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते, त्यांचीही दारु पिण्याची एक पद्धत आहे. ग्लास तोंडाला लावला की ते संपेपर्यंत खालीलच ठेवत नाहीत. खेडेगावात अशा लोकांना अस्सल ‘बेवडा’ म्हणतात.

मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार केला तर, अनेक जण दारू पिताना मित्रांना सोबत घेऊन दारू पिताना पाहायला मिळतात. २,३ पॅक घेणारा तळीराम असला तरी, अख्खा दिवस तो त्यात घालवतो. दारू पीत असताना मित्रांसोबत इकडच्या-तिकडच्या गप्पा, दारू बरोबरच चकना म्हणून असणारे विविध पदार्थ याची मज्जा घेणाऱ्या तळीरामांचा हा एक गट आपल्याला सर्रास पाहायला मिळतो. मात्र दारू बरोबरच ‘चकना’ म्हणून कोणकोणते पदार्थ असायला हवे, याचा आपण कधी विचार केला आहात का?

आजच्या लेखामधून आपण दारू बरोबर चकणा म्हणून कोणकोणते पदार्थ घेऊ नये, आणि कोणकोणते पदार्थ घ्यावे हेच पाहणार आहोत. जर तुम्ही तळीराम असाल तर, तुमच्यासाठी ही माहिती एक पर्वणीच ठरू शकते.  

 

माणसाच्या शरीरात अल्कोहल प्रमाण अधिक असले तर अल्कोहल हे शरीरातील पाणी नष्ट करण्याचं काम करतं. त्यामुळे दारू ही शरीरासाठी अपायकारकच आहे. त्यामुळे दारू न पिलेलं कधीही चांगलंच. आता तुम्ही म्हणाल, दारू बरोबर चकणा म्हणून काय खावे? आणि काय खाऊ नये? यासाठी तुम्ही आम्हाला माहिती देणार होता, आणि आता दारू पिऊ नये, असा तुम्ही आम्हाला उपदेश करण्याचं ज्ञान नका पाजळू. तर चला तुम्ही आमचं ऐकणारच नसाल तर, दारू बरोबर चकणा म्हणून कोणते चार पदार्थ खाऊ नये, यांची माहिती घेऊ.

१) तुम्ही ज्या वेळेस दारू पीत असता त्या वेळेस तुमच्या शरीरात अम्लाचे प्रमाण वाढत असतं. दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये देखील अम्लाचे प्रमाण अधिक असतं. आणि म्हणून दारू पीत असताना दुधापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. दारू पिताना आपण अल्कलीयुक्त पदार्थ खाल्ले तर आपल्याला पित्त होते, आणि अपचनाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

२) बऱ्याच वेळा आपण पाहतो दारू पीत असताना आपण हलके-फुलके पदार्थ खातो जसे की चिप्स, या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण अधिक असते. मिठाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते. आणि म्हणून दारू पित असताना हे धोकादायक आहे. दारू पीत असल्यामुळे आपल्या शरीरात अल्कोहलचे प्रमाण वाढतं. एकीकडे अल्कोहलचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे आपल्या शहरात पाणी असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे कॉम्बिनेशन योग्य नाही. आणि म्हणून दारू पिताना चकना म्हणून असे हलके फुलके पदार्थच टाळलेलं अधिक चांगलं.

३) दारू पीत असताना, चकणा म्हणून आपण तिखट आणि तेलकट पदार्थ टाळणे खूप गरजेचं आहे. आम्हाला माहित आहे, हे पदार्थ टाळणं जरा जास्त अवघड आहे. मात्र हे पदार्थ टाळणं आपल्या शहराच्या फायद्यासाठी योग्य असल्याचं, अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. तेलकट पदार्थ म्हणजे, जसे की आपण पाहतो बटाट्या पासून बनवलेले चिप्स,चकली,शेव,

४) दारू पिताना आपण पाहतो, चकणा म्हणून अनेकजण विविध पदार्थ आवडीने खातात, मात्र सकाळी उठल्यावर त्यांचं कमालीचं डोकं दुखल्याचे पाहायला मिळते. हे कशामुळे होते, तर आपण दारू पिताना नको ते पदार्थ खाल्यामुळे होते. काय खायचं नाही, हे आपण वरती पाहिलेच आहे. यात आणखी एक महत्वाचा पदार्थ आहे, तो म्हणजे पिझ्झा. आपण अनेक वेळा पाहतो, पिझ्झा हा अनेकजण आवडीने खातात. मात्र पिझ्झा हा पचनक्रियेस खूपच त्रासदायक असतो. अणि म्हणून पिझ्झा खाणे टाळले पाहिजे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.