Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..
Relationship Tips: आपल्याही आयुष्यात एखादी प्रेमळ आणि सुंदर मुलगी असावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकाला स्वप्नातली राजकुमारी भेटेलच असं नाही. अनेकांना याविषयी तरजोड करावी लागते. अनेकजण आपल्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदारांवर जीवापाड प्रेम करून सुखाचा संसार थाटतात. आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखांचा सामना करून वैवाहिक जीवनाचा गाडा हाकतात. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी, दुसरीकडे मात्र अनेक जण आयुष्यात सिंगल राहणंच पसंत करतात. सिंगल राहणं, हे अनेकांना आव्हानात्मक वाटत असलं, तरी सिंगल आयुष्यात (single life) ते खूप आनंदी (happy) आणि समाधानी देखील असतात.
आज आपण रिलेशनशिप (relationship) आणि सिंगल (relationship and single) राहण्याचे फायदे आणि तोटे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. माणूस हा समाजशील प्राणी असल्याने, समाजाच्या आवडीनिवडी जोपासतच त्याला आपलं आयुष्य जगावं लागते. हे तुम्ही देखील मान्य कराल. समाजाने घालून दिलेल्या रूढी परंपरा जोपासल्या तरच समाजामध्ये स्थान मिळत असतं. याविषयी देखील तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र या पलीकडे देखील आपले आयुष्य जगणाऱ्यांची मोठी संख्या पाहायला मिळते. अनेकजण आयुष्यात सिंगल राहणे पसंत करतात. आज आपण सिंगल राहण्याचे फायदे आणि तोडे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सिंगल राहण्याचे फायदे जाणून घेऊ.
फिटनेसकडे लक्ष
सिंगल आयुष्य जगण्याचे काही फायदे निश्चित आहेत, मात्र सर्वाधिक जास्त तोटे असल्याचे एका सर्वेतून समोर आलं आहे. जर तुम्ही सिंगल असाल, तर तुम्ही तुमच्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकता. नियमित व्यायाम, जिम इत्यादींचा वापर करून तुमचे शरीर सदृढ आणि निरोगी ठेवू शकता. सिंगल असल्यामुळे साहजिकच वेळेची बचत होत असल्याने, तुम्ही अधिक वेळ फिटनेसकडे लक्ष देऊ शकता.
तणावमुक्त आयुष्य
सिंगल आयुष्य जर तुम्ही जगत असाल, तर तुमचे आयुष्य तणावमुक्त असू शकतं. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा सिंगल राहणाऱ्या लोकांच्या खांद्यांवर कौटुंबिक जबाबदारी तुलनेने कमी असते. साहजिकच यामुळे त्यांच्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा कमी तणावाला सामोरे जावे लागते. याचा फायदा आरोग्याला देखील होऊन निरोगी राहता येऊ शकते.
एकाग्रता
रिलेशनशिप आणि सिंगल राहणाऱ्या लोकांच्या एकाग्रतेचा विचार करायचा झाल्यास, सिंगल रासणाऱ्या लोकांची एकाग्रता खूप उत्तम असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. त्याचे कारण म्हणजे, सिंगल राहणाऱ्या लोकांना झोप खूप उत्तमरीत्या लागते. झोप व्यवस्थित लागण्याचे कारण देखील एका सर्वेतून समोर आलं आहे. सिंगल राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात लक्ष विचलित करणारं कोणीही नसल्याने, या लोकांची झोप खूप उत्तम पूर्ण होते. आता आपण सिंगल राहणाऱ्या लोकांचे कोणते तोटे आहेत? हे देखील जाणून घेऊ.
मानसिक आरोग्य ढासळते:
सिंगल राहणाऱ्या लोकांचे आपण काही फायदे जाणून घेतले. मात्र सिंगल राहणाऱ्या लोकांच्या तोट्याचा विचार करायचा झाल्यास, तोट्याची यादी खूप मोठी असल्याचं पाहायला मिळतं. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा सिंगल राहणाऱ्या लोकांचे मानसिक संतुलन नेहमी ढासळत असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. अनेक भावनिक विषयांवर बोलण्यासाठी सिंगल राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कोणीही नसतं. साहजीकच याचा फटका त्यांच्या मानसिक संतुलनाला भोगावा लागतो. आयुष्यात यशस्वी वाटचाल करायची असेल, तर तुमचे मानसिक आरोग्य स्थिर असणं फार आवश्यक असतं.
जर तुमचं मानसिक आरोग्य स्थिर नसेल, तर तुम्ही आयुष्यात गरुड झेप घेऊ शकत नाही. असं देखील एका सर्वेतून समोर आलं आहे. आणि म्हणून नेहमी रिलेशनशिपमध्ये असणं खूप गरजेचं असतं. असं देखील सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. मोटिवेशन करणारी अनेक लोक आयुष्यात असू शकतात. मात्र आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी तुम्हाला भावनिक आधार देणारी माणसं देखील सोबत असणं गरजेचं असतं. सिंगल राहणाऱ्या लोकांमध्ये ही कमतरता भासते. आणि याचा परिणाम त्यांच्या यशस्वी वाटचालीवर होतो.
नैराश्य
रिलेशनशिप आणि सिंगल राहणाऱ्या लोकांचा एका संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. यामध्ये सिंगल राहणाऱ्या लोकांमध्ये अधिक नैराश्य असल्याचं सर्वेतून समोर आलं. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा सिंगल राहणाऱ्या लोकांमध्ये अधिक नैराश्य असल्याने सिंगल राहणारी लोकं आत्मघाती वर्तन करत असल्याचं समोर आलं.
सिंगल राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कमी: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांचा आयुष्यमान कमी असल्याचे देखील एका संशोधनातून समोर आलं आहे. आपल्या मनात असणाऱ्या अनेक गोष्टी मनमोकळ्या बोलण्यासाठी हक्काची माणसं नसल्याने, आयुमानावर परिणाम होत असल्याचं देखील समोर आलं आहे.
नातेसंबंध जपण्यात अपयश
सिंगल राहणाऱ्या लोकांकडून नातं व्यवस्थित जोपासलं जात नसल्याचं देखील समोर आलं आहे. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सिंगल राहणाऱ्या लोकांना नवीन नातेसंबंध जोडणं खूप कठीण असतं. साहजिकच यामुळे एकवेळ अनेक लोकांचा सहवास असावा असं वाटत असतं, नेमकं त्याचवेळी सिंगल राहणारी लोकं ही एकाकी पडतात. अशाप्रकारे सिंगल राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात फायद्यापेक्षा तोटे जास्त असल्याचं पाहायला मिळतं.
हे देखील वाचा Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..
Pregnancy Tips: गरोदर स्त्रियांना आंबट खाण्याची इच्छा का होते? कारण जाणून तुम्हीही व्हाल अचंबित..
Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.