खोकला उपाय: खोकल्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत रामबाण औषध..
खोकला उपाय: लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत अनेकांना कोरड्या खोकल्याची समस्या उद्भवते. मात्र कोरडा खोकला (Dry cough) कशामुळे होतो, याविषयी तुम्हाला माहीत आहे का? कोरडा खोकला अनेक कारणामुळे होऊ शकतो. ऍलर्जीमुळे त्याचबरोबर ऍसिड रिफ्लक्समुळे देखील कोरडा खोकला होतो. अनेकदा कोरड्या कोणत्याही कारणाशिवाय कोरडा खोकला होऊ शकतो. कारण कोणतही असो, मात्र कोरड्या खोकल्यामुळे आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
कोरडा खोकला किती काळ येऊ शकतो.
जसं की कोरडा खोकला येण्याची अनेक कारणे आहेत, त्याच प्रमाणे कोणत्या कारणामुळे खोकला येतो त्यावर त्याची उपलब्धता टिकून असते. तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येत असेल तर साधारण 8 आठवड्यांपर्यंत खोकला येऊ शकतो. साहजिकच यामुळे याचे परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात होतात. लहान मुलांविषयी बोलायचं, झालं तर लहान मुलांना ४ आठवडे हा खोकला राहू शकतो. मात्र जर यापेक्षा जास्त काळ खोकला राहिल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण देखील असण्याची शकता असते. विशेषतः रात्री कोरडा खोकला येत असेल तर, तो अधिक त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतो. या सगळ्या समस्या असतील तरी देखील तुम्ही घरगुती उपाय करून या सगळ्या पासून आराम मिळवू शकता.
NCBI ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, वयोवृद्ध, त्याचबरोबर एका वर्षाहून अधिक वय असणाऱ्या मुलांसाठी, मध हे कोरड्या खोकल्यापासून रामबाण उपाय ठरू शकते. मधामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म पदार्थ असल्याने घशाची होणारी खवखव कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळा एक चमच्या मधाचे सेवन केले तर कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते. कोरडा खोकला नाहीसा होणाऱ्या पाच पदार्था विषयी जाणून घेऊया सविस्तर.
हळद आणि काळे मिरे
हळद आणि काळे मिरे याचे सेवन केल्यास खोकला जाऊ शकतो. हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक असतो. ज्यात अँटीव्हायरल त्याचबरोबर अँटी-बॅक्टेरियल यासारखे अनेक गुणधर्म पाहायला मिळतात. साहजिकच यामुळे कोरडा खोकला मुळासकट दूर होण्याचे काम देखील होते. काळी मिरीमध्ये कर्क्युमिन घटक असल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते. जर तुम्हाला हळद आणि मिरी पाण्यामध्ये पिण्यास काही अडचण येत असेल, तर तुम्ही संत्र्या सासारख्या पेयामध्ये देखील हे मिश्रण पिऊ शकता.
आले आणि मीठ
एका संशोधनातून आलेल्या माहितीनुसार, आले आणि मिठात अँटीमायक्रोबियल हा गुणधर्म आढळतो. हा गुणधर्म घशात असणाऱ्या बॅक्टेरियाशी सामना करण्याचे काम करते. साहजिक यामुळे कोरड्या खोकल्यापासून मुक्तता मिळते. आल्याच्या छोट्याश्या तुकड्यावर थोडेसे मीठ घेऊन तो तुकडा आपल्या दाताखाली दाबून त्याचा रस गिळल्याने आपल्याला सतत येणारा कोरडा खोकला दूर होण्यास मदत होते. हा प्रयोग सुमारे पाच ते सात मिनिटे करणे आवश्यक आहे.
तूप आणि काळी मिरी
तूप हे खूप गुणकारी असते, याविषयी आपल्याला देखील माहिती असेल. तूप हे कोरड्या खोकल्यावर रामबाण उपाय आहे. तुपामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक त्याचबरोबर अँटी-इंफ्लेमेटरी हा घटक देखील आढळतो. घसा मऊ होण्याचे काम या गुणधर्मामुळे होते. तूप आणि केली मिरी हे मिश्रण एकत्र खाल्ल्यास कोरड्या खोकल्यापसून आराम मुक्तता मिळते. मिठाचे पाणी: बॅक्टेरियाशी सामना करण्याचे काम खारट पाणी करत असते. कोमट पाण्यात मीठ टाकून घसा शेकल्यास घशातील बॅक्टेरिया मरण पावतात. साहजिकच यामुळे घशातील होणारी खवखव थांबते. आणि आपली होणारी चीडचीड देखील दूर होते.
हे देखील वाचा. WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.