दुःखद! चंद्रकांत पाटील यांच्या कुटुंबातील अत्यंत महत्वाची व्यक्तीचे निधन, पाटील कुटुंबीयांवर शोककळा..

0

राज्यातील वजनदार नेते, माजी महसूलमंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीमती सरस्वती पाटील यांनी कोल्हापुरातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 91 वर्ष एवढे होते. त्यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. चंद्रकांत पाटील राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा होता. त्या नेहमी चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी उभ्या असायच्या.

हेही वाचा: Wedding Tips: लग्न करण्यासाठी मुली मुलांमध्ये बघतात या पाच गोष्टी, जाणून घ्या लगेच नाहीतर पुन्हा लग्नाला अडचण..

चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी आई म्हणून त्या कायमस्वरूपी उभ्या असायच्या. जन्मदाती आई सोडून गेल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांनी अत्यंत संघर्ष करत कुटुंबाचा गाडा हाकला. चंद्रकांत पाटील यांचे वडील बच्चू पाटील कापड गिरणीमध्ये काम करत असताना, त्याकाळी त्यांना पगार खूप कमी मिळायचा. परंतु अशा परिस्थितीत देखील त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थित हाकला. आपल्या पतीला तर कठीण काळात साथ दिलीच, परंतु चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांनी साथ दिली.

त्यांनी चंद्रकांत पाटील यांना शिक्षण दिलं, राजकारणात प्रवेश केल्यानंतर साथ दिली. आपल्या आयुष्यात, राजकीय प्रवासात आपल्या मातोश्रींचा मोठा वाटा असल्याचे चंद्रकांत पाटील वारंवार बोलून दाखवायचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी आपल्या सर्व मुलांना स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार दिले. याच्याच आधारावर आपण इथपर्यंत पोहोचल्याचे चंद्रकांत पाटील वारंवार सांगायचे. आपल्या कुटुंबावर आपल्या मातोश्रींच्या विचारांचा प्रभाव असल्याचे ते नेहमी बोलायचे. सरस्वती पाटील यांच्यावर आज दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स.. 

Marriage tips: या पाच गोष्टींमुळे महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टी . 

Wedding Tips: लग्न करण्यासाठी मुली मुलांमध्ये बघतात या पाच गोष्टी, जाणून घ्या लगेच नाहीतर पुन्हा लग्नाला अडचण.. 

Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स.. 

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.