Wedding Tips: लग्न करण्यासाठी मुली मुलांमध्ये बघतात ‘या’ पाच गोष्टी, जाणून घ्या लगेच नाहीतर पुन्हा लग्नाला अडचण..

0

Wedding Tips: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. लग्न आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. लग्न म्हणजे नाजूक नात्यांची वीण असे बोलले जाते. मुला मुलींचे लग्न झाले की त्यांचे नवीन जीवन चालू होते. बरीच मुलं लग्नानंतर बदलतात आपल्या कामात मग्न होतात. मुली संसाराला लागतात. लग्न झालं की एकमेकांच्या जबाबदाऱ्या सांभाळून पुढे चालायला लागते. लग्न म्हणजे मुलीसाठी नवीन कुटुंब असते. जे तिच्या ओळखीचे नसतात, परंतु ते तिचे नवीन नातेवाईक झालेले असतात. त्या सगळ्यांना तिला आपलं करून घ्यायचे असते.

 

लग्न करण्यासाठी शासनाने काही वयाची बंधने घालून दिलेली आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी मुला मुलींना लग्न करण्यास कायद्याने परवानगी दिली आहे. अजूनही बऱ्याच कुटुंबात मुलांची लवकर लग्न लावून देण्यात येतात. मुलींच्या लग्नाची तर पालकांना आधीच घाई झालेली असते. कारण मुलगी हे परक्याचे धन समजले जाते. सध्याच्या काळात बऱ्याच कुटुंबात मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचा नाही म्हणून देखील मुलींची लवकर लग्न लावून दिली जातात. असा देखील मुलामुलींमध्ये भेदभाव केल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मुलींच्या लग्नाची घाई आजकाल सर्वत्र पाहायला मिळते. असे असले तरी देखील मुली लग्नासाठी मुलांमध्ये मुली या पाच गोष्टी पहात असतात. (Wedding Tips)

 

१. निर्व्यसनी मुलगा: तसे पाहायला गेले तर मुलीचे लग्न करतेवेळी मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. परंतु आपला होणारा नवरा निर्व्यसनी असावा, असे प्रत्येक मुलीला आणि तिच्या पालकांना वाटत असते. त्यामुळे जर तुम्ही काही व्यसने करत असाल तर तुमच्या लग्नाला अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच मुलांचे वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या खाऊन दात मलकटलेले असतात. अशा प्रकारच्या सुपाऱ्यामध्ये विविध घटक वापरलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे दात कळकटलेले पाहायला मिळतात. त्यामुळे निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करा. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे लग्नाचे वय निघून गेल्याचे देखील आपण पाहिले असेल.

 

२. मुलाचा पेहराव: मुलाच्या त्वचेचा रंग कसाही असला तरी बरीच मुले त्यांच्या पेहरावामुळे उठून दिसतात. आपला होणारा नवरा टापटीप असावा असं प्रत्येक मुलीला वाटत असतेच. त्यात प्रत्येक मुलीची आवड वेगवेगळी असते. म्हणजे काही मुलींना साधी राहणीमान असलेली मुले आवडतात, तर काहींना थोडेसे हटके मुलं आवडतात. आपला पेहराव आपले व्यक्तिमत्व सिद्ध करत असते. त्यामुळे तुमचा पेहराव चांगला असायला हवा. जर समजा तुम्ही मुलगी बघायला गेला असाल तर तुम्ही फार काहीतरी वेगळा पेहराव करू नका. तुम्हाला जसे आवडते त्याच पद्धतीचे कपडे घालून जायला हवे. आपला पेहराव आपले बाह्यरूप प्रदर्शित करत असतो.

हेही वाचा: दररोज सेक्सके काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

३. मुलांमधील समंजसपणा: मुलगी लग्न करून येते तेव्हा तिने खूप काही त्याग केलेला असतो. जरी निसर्गाने तशी रचना केलेली असेल तरीदेखील मुलींचा त्याग हा मोठा असतो, हेही तितकंच खरं आहे. मुली त्यांच्या कुटुंबियांना सोडून नवीन ठिकाणी येत असतात. लग्न झाल्यानंतर तिचे हक्काचं ठिकाण म्हणजे तिचा नवरा असतो. सासू सासरे देखील मुलीच्या आईवडिलांप्रमाणेच असतात. परंतु ती प्रत्येक गोष्ट आपल्या पतीसोबतच बोलू शकते. त्यामुळे तिची एकच अपेक्षा असते, माझा नवरा मला समजून घेणारा असावा, माझी एखादी चूक झाली तर ती मला सर्वांसमोर न सांगता एकट्यात सांगाव्यात. त्यामुळे मुलामधला समजूतदारपणा अत्यंत गरजेचा असतो.

हेही वाचा:  शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

४. मुलगा काय करतो? : मुलगा नोकरी करतो की व्यवसाय करतो, हे मुलगी आणि तिचे पालक पाहतात. मुलगा नोकरी करत असेल तर कुठल्या क्षेत्रात नोकरी करतो. त्या क्षेत्राला भवितव्य आहे का? जर मुलगा व्यवसाय करत असेल तर मग तो कुठला व्यवसाय करतो? त्याचे उत्पन्न किती आहे. या गोष्टींचा प्रामुख्याने विचार होत असतो. कारण मुलगा दिवसभर राजकीय कार्यकर्ते म्हणून कुठल्या तरी नेत्याच्या मागे मागे विनाकारण फिरत असेल तर कुठली मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार होणार? तिच्या घरचे देखील मुलगी अशा ठिकाणी देणार नाहीत. तुमच्या आर्थिक उत्पन्नावर तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे त्याचा देखील प्रामुख्याने विचार केला जातो.

 

५. मुलांची शरीरयष्टी: तुमची शरीरयष्टी तुमचे व्यक्तीमत्व आकर्षक बनवते. जर एखादा मुलगा व्यायाम वगैरे करत असेल, त्याचे शरीर मजबूत दिसत असेल तर अशा मुलांना समाजात देखील किंमत असते. याउलट बरीच मुलं आळशी असतात, त्यांच्या पोटाची चरबी वाढलेली असते. त्यांना मग लोक नेबळट, कुचकामी समजत असतात. अशा मुलांची मानसिकता देखील कमजोर झालेली असते. त्यामुळे मुली नेहमी उत्तम शरीरयष्टी असलेल्या मुलांना प्राधान्य देत असतात. त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्ही गांभीर्याने घ्यायला हवी. त्यामुळे नेहमी व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले स्वास्थ्य देखील तंदुरुस्त रहात असते.

हेही वाचा: Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून.. 

Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात?  ही  कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

Kissing benefits: Kiss आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत दहा आश्चर्यकारक कारणे   

Men Health Tips: शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत.. 

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.