Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..
Marriage tips: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकजण जॉबच्या शोधात असतात. शिक्षणानंतर खऱ्या अर्थाने भविष्याची चिंता सतावू लागते. चांगल्या पगाराची नोकरी लागली, तरी अनेकांना वैवाहिक जीवनाचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. अनेकांना लग्न इतक्यात करायचं नसलं, तरीदेखील घरच्यांचा प्रेशर असल्याने लग्नासाठी तयार व्हावेच लागते. अनेकांपुढे लग्न करण्यासंदर्भात अनेक आव्हान उभी असतात. लग्नानंतर आपला वैवाहिक जोडीदार आपल्याला समजून घेईल की नाही? आपला पार्टनर कसा असेल? अशी अनेक आव्हाने असतात.
लग्नानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा, या संदर्भात अनेक वडीलधारी मंडळी मार्गदर्शन देखील करतात. मात्र काही गोष्टी उघडपणे बोलल्या जात नाहीत. अर्थात या गोष्टींची काळजी आपल्यालाच घ्यायची असते. लग्नानंतर पहिली रात्र हे प्रत्येक जोडप्यांच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची रात्र असते. लग्नानंतरची पहिली रात्र अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरावी, असं प्रत्येकाला वाटत असतं.
शारीरिक संबंधाबरोबरच मनोमिलनही या दिवशी होत असते. मात्र या दिवशी तुम्ही भावनेच्या भरात अशा काही गोष्टी करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या पहिल्याच दिवशी मनातून उतराल, आणि आयुष्यभर त्याचा पश्चाताप करत बसाल. आणि म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्री चार गोष्टी टाळणं फार आवश्यक आहे. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पहिल्याच रात्री भूतकाळाविषयी सांगू नका.
लग्नापूर्वीचं आयुष्य हे खूप वेगळं असतं. उच्च शिक्षण घेत असताना, आपण अनेक मित्र-मैत्रिणीसोबत आयुष्य जगत असतो. यामध्ये आपल्याला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड देखील असू शकतो. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल तुमच्या जोडीदाराला सांगणं उचित राहत नाही. लग्न हे विश्वासाचा नातं असतं, असं बोललं जात असलं तरी, जोडीदाराला पहिल्याच रात्री भूतकाळाबद्दल सांगणं हे कधीही योग्य राहणार नाही.
जोडीदाराला विश्वासात घेऊन तुम्ही तुमच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा उलगडा करू शकता. मात्र त्यासाठी योग्य वेळ देखील महत्त्वाची आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री दोघांशिवाय तुमच्यामध्ये तिसरी व्यक्ती येणं अजिबात योग्य नाही. अनेकांना वाटतं, भूतकाळ अंधारात ठेवून आपण भविष्याची सुरुवात करू नये. मात्र तुम्ही भूतकाळाबद्दल लग्नाच्या पहिल्याच रात्री तुमच्या जोडीदाराला अनेक गोष्टींचा उलगडा केला, तर तुमचा भविष्यकाळ देखील अंधारात जाऊ शकतो.
जोडीदाराच्या सौंदर्यची स्तुती करा
लग्नाची पहिली रात्र ही आपल्या जोडीदाराची असते. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडीदाराला विश्वासात घेऊन जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारणे, तिच्या सौंदर्याचे कौतुक करणं फार आवश्यक आहे. दोघांनीही एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणं, या दिवशी फार आवश्यक असतं. या दिवशी मुलापेक्षा मुलगी अधिक तणावात असते. आपल्या घरच्यांना सोडून ती एक नवीन आयुष्य सुरू करत असते. या गोष्टीचा विचार करून आपण तिला मानसिक समाधान देणं देखील फार आवश्यक असतं.
जोडीदाराला कमीपणा वाटू देऊ नका
या जगात कोणीही परिपूर्ण नाही, सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपल्या मनासारखा जोडीदार भेटेलच असे नाही. मात्र लग्नानंतर आपला जोडीदार हा परफेक्ट आहे. याच भावनेतून पुढे जाणं आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराला तुम्ही परफेक्ट बनवू शकता. आपल्या जोडीदारांमध्ये अनेक त्रुटी असल्या तरी देखील, तुम्ही सामावून घेणं फार आवश्यक आहे. तुम्ही चुकूनही समोरच्या व्यक्तीला कमीपणा वाटेल असं वर्तन करता कामा नये. अन्यथा तुमचा वैवाहिक जोडीदार तुमच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारणारा नाही. साहजिकच तुमचा वैवाहिक जोडीदार आनंदी नसेल, तर तुमचं नातं हे फक्त तडजोड आहे, असे वाटू लागते.
शक्यतो शारीरिक संबंध टाळा
अनेकांना वाटत असतं, लग्नाच्या पहिल्याच रात्री शारीरिक संबंध करणे आवश्यक आहे. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री से क्स करणं मोठी चूक ठरू शकते. लग्न झाल्यानंतर अनेकांना या संदर्भात एक्साईटमेंट असते. लग्न जमल्यापासून लग्न होईपर्यंत, अनेक जण या गोष्टीचा विचार करत असतो. यात गैर देखील काही नाही. मात्र लग्नाच्या पहिल्या दिवशी दोघेही मोठ्या प्रमाणात तणावत असतात. आपलं लग्न व्यवस्थित पार पडेल, की नाही याची देखील चिंता असते. लग्नासाठी मित्र मैत्रिणी आल्या होत्या का? अशा अनेक गोष्टींचा विचार दिवसभर आपल्या मनामध्ये असतो.
लग्नाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर शारीरिक थकवा देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो. यामुळे बहुतेकदा तुमचा जोडीदार शारीरिक संबंधासाठी तयार असेलच असे नाही. शारीरिक संबंधा बरोबर मानसिक समाधान देखील महत्वाचे आहे. कोणत्याही गरजेपेक्षा मानसिक गरज ही फार महत्त्वाची गरज असते. तुमच्या पार्टनरला तुम्ही लग्न फक्त शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठीच केलं आहे, असं कदापिही वाटता कामा नये. शारीरिक गरजांसाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
हे देखील वाचाMarriage tips: लग्नानंतर वैवाहिक जीवनात हवा असेल भरपूर आनंद, तर लग्नाअगोदर टाळाव्या लागतील या गोष्टी..
Marriage tip या चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..
Married Life Problem: हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.