Whatsapp update: व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलं अनेक भन्नाट फीचर्स; वाचा सविस्तर..
Whatsapp update: इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत व्हाट्सअपचा (whatsapp) सर्वाधिक वापर भारतात केला जातो. स्मार्टफोन (smartphone) असणाऱ्या प्रत्येकाकडे व्हाट्सअप पाहायला मिळते. स्मार्टफोन असून देखील व्हाट्सअप वापरत नाही, असा शोधूनही सापडणार नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. व्हाट्सअप आता फक्त मेसेजिंग ऍप (messaging app) पुरतं मर्यादित राहिलं नाही. तर व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेकांना व्हिडिओ कॉल, त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या PDF देखील पाठवता येतात. व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत आहे. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फिचर्स आणले आहेत. (WhatsApp new feature)
काळ जसजसा बदलत चालला आहे, तसं व्हाट्सअप देखील आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. पूर्वी व्हाट्सअपग्रुप मध्ये 256 सदस्यांनाच अॅड करता येत होतं. या नियमात बदल करून व्हाट्सअपने व्हाट्सअप ग्रुपला तब्बल 512 सदस्यांना ऍड करता येणार असल्याचे नवीन फीचर्स उपलब्ध केलं. यानंतर आता व्हाट्सअपने आणखी एक नवीन फीचर्स आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केलं आहे. यापूर्वी ग्राहकांना आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर फोटो, व्हिडिओ क्लिप, मेसेज ठेवता येत होता. आता यात आणखी भर पडली आहे. ग्राहकांना आता ‘ऑडिओ नोट्स’ (audio notes) देखील आपल्या स्टेटस ठेवता येणार आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. यामध्ये ऑडिओ नोट्स हे देखील एक फिचर्स आहे. यापूर्वी ग्राहक व्हाट्सअपवर स्टेटस टाकायला गेल्यानंतर, त्यांना फोनच्या गॅलरीमधील फोटो, व्हिडिओ इत्यादी पर्याय दिसत होते. मात्र आता यात ऑडिओ नोट्सचा देखील पर्याय पाहायला मिळणार आहे. व्हाट्सअप ग्राहकांसाठी हा पर्याय खूप उपयुक्त मानला जात आहे. अनेकांना आता फोटो बरोबरच आपला स्वतःचा ऑडिओ रेकॉर्ड देखील स्टेटसवर ठेवता येणार आहे.
व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवता येणार ऑडिओ क्लिप
व्हाट्सअप या फीचर्सवर काम करत असून, लवकरच हे फीचर्स ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. साधारण पुढच्या आठवड्यात ग्राहकांना हे फीचर्स उपलब्ध असणार असल्याची माहिती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्हाट्सअपवर टेटस ठेवायला जाचाल, तेव्हा तुम्हाला व्हाट्सअपवर स्टेटस ठेवताना फोटो, व्हिडिओ याबरोबरच ऑडिओ नोट्स हा पर्याय देखील दिसणार आहे. सध्या फक्त फोटो आणि व्हिडिओ हाच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.
नवीन फिचर्स ‘या’ पद्धतीने करणार काम
ग्राहकांच्या भेटीला येणारे हे व्हाट्सअपचे नवीन फीचर्स कशा पद्धतीने काम करणाऱ्या संदर्भात WABetaInfo ने सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आपल्या स्टेटस या पर्यायाच्या शेवटी म्हणजेच तळाला नवीन आयकॉन पर्याय पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमचा ऑडिओ नोट स्टेटस म्हणून ठेवू शकणार आहे. ग्राहकांना आता या फीचर्समुळे आपला ऑडिओ रेकॉर्ड करून स्टेटसला ठेवता येणार आहे. यामध्ये तुम्ही अनेक मोटिवेशनल ऑडिओ क्लिप देखील ठेवू शकता.
हे देखील वाचा Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..
लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..
Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.