Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा…

Healthy lifestyle: अनेकांना तळलेले पदार्थ खाणे पसंत असते. आहारामध्ये तळलेले पदार्थ नसतील, तर अनेकांना जेवण देखील जात नसल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. तळलेल्या पदार्थांमध्ये समोसा,(samosa) बटाटा वडा, (vada) त्याचबरोबर भज्जी (bhajiya) हे पदार्थ अनेकांच्या आहारामध्ये असतातच असतात. साधारणपणे खेडेगावात हे पदार्थ नेहमी आवडीने खाल्ले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या पदार्थाच्या अतिसेवनामुळे तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात घालत आहात. अनेकांना याची कल्पना देखील नसेल, मात्र या पदार्थांचे सेवन तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (Edible oil)

बटाटा वडा, भजी, समोसा यासारखे तळलेले पदार्थ खूप चविष्ट असतात. मात्र या पदार्थाचे अतिसेवन केल्याने, तुमच्यामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेहमी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. यामध्ये खास करून तळलेल्या पदार्थांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. नेहमी शिजवलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या त्याचबरोबर कमी तेलकट असणारे पदार्थांचे सेवन करणे कधीही उत्तम राहते. जास्त तेलकट, आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर होण्याची देखील शक्यता आहे. तेलकट पदार्थ खाल्लाने जे चार आजार होतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

कर्करोग होण्याची शक्यता

अनेकांना बाहेर वडापाव, समोसे, तसेच भजी खाण्याची सवय असते. दिवसभरात हे पदार्थ खाल्ले नाही, तर अनेकांना जेवण केल्यासारखे देखील वाटत नाही. अशी देखील काही मंडळी आपल्या आसपास अनेक पाहायला मिळतील. मात्र बाहेर तळले जाणारे, हे पदार्थ नेहमी त्याच तेलात तळले जातात. याचा तुम्ही कधी विचारलेला आहे का? अनेकांना हे माहीत असून देखील, अनेक जण त्याच तेलात वारंवार तळलेले पदार्थ खातात.

मात्र तुम्हाला याचे परिणाम माहित आहेत का?

तेच तेल सतत वापरल्याने त्या तेलामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होते. आणि त्यामुळे रोग पसरण्याची दाट शक्यता असते. एकदा गरम केलेले तेल पुन्हा गरम केल्याने त्या तेलाचा असणारा वास नाहीसा होतो. आणि त्यामध्ये अँटिऑक्सिडंटही शिल्लक राहत नाही. म्हणून या पासून कॅन्सर देखील होण्याची असते.

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका

एकाच तेलात नेहमी तळलेले पदार्थ, त्याचबरोबर पुन्हा पुन्हा शिजवलेले अन्न विषारी पदार्थां प्रमाणेच असते. नेहमी त्याच तेलात पदार्थ गरम केल्याने, त्या तेलामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण कमालीचे वाढते. ट्रान्स फॅट हे सर्वात धोकादायक कोलेस्टेरॉल असते. हे तुमच्यापैकी अनेकांना माहीतही असेल. या कोलेस्टेरॉलमुळे हृदयाशी संबंधित असणारे आजार उद्भवण्याची शक्यता असते. आणि म्हणून, भविष्यात आणखी हृदयाशी संबंधित काही आजार जडू नयेत, यासाठी आपण शक्य होईल तेवढे तळलेले पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे.

रक्तभिसरणची समस्या

एकच तेल नेहमी गरम केल्यामुळे, त्या तेलाचे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले जाते. सोबतच फॅट देखील वाढते. यामुळे रक्तभिसरणाची समस्या उद्भवते. रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यास अडचणी निर्माण होतात. एकच तेल नेहमी गरम केल्यामुळे, कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे या तेलात आपण जे अन्नपदार्थ तळतो, त्याला कोलेस्टेरॉलचे घटक चिकटून राहतात. यामुळे अॅसिडिटीचे आजार उद्भवतात. एवढंच नाही, तर हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता असते.

एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका

एकदा गरम केलेल्या तेलात पुन्हा कोणतेही पदार्थ तळू नका. याबरोबरच तेल हे नेहमी ब्रँडेड कंपनीचेच वापरणे आवश्यक आहे. जे तेल लवकर गरम होते, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. कोणतेही तेल गरम केल्यानंतर, त्याचा जर फेस होत असेल, तर ते तेल भेसळयुक्त तेल असते. हे तेल तुमच्या शरीरासाठी फार हानिकारक आहे.

हे देखील वाचा  Police Bharti Update: पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल? शिंदे सरकारचा पोलीस भरती करणाऱ्या पोरांना दणका..

Flipkart Electronics Sale: हेडफोन, स्मार्टवॉच, पावरबँकसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल ८० टक्के डिस्काउंट..

USSD Code: हा कोड वापरून मोबाईल नंबर ट्रॅक झाला आहे, की नाही हे चेक करा; हरवलेला मोबाइल देखील करू शकता ट्रॅक..

Kissing benefits: kiss आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे..

India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.