Registered Mobile Numbers: या सोप्या पद्धतीने चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत; आणि या अडचणींपासून स्वतःला वाचवा..
Registered Mobile Numbers: अनेकांना अनेक सिम कार्ड खरेदी करायची सवय असते. एवढच नाही तर अनेकजण आपल्या नावावर आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तीना सिम कार्ड घेऊन देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? दूरसंचार विभागाच्या TAFCOP म्हणजेच टेलीकॉम ऑनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन’ नूसार एका व्यक्तीच्या नावावर फक्त नऊच सिमकार्ड घेता येतात. हा झाला सिमकार्ड घेण्याच्या मर्यादेचा प्रश्न. मात्र तुम्ही कोणा-कोणाला सिमकार्ड घेऊन दिले आहेत? हे माहिती नसेल, तर आता तुम्हाला ते पाहता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देणार आहोत.
अलीकडच्या काळात फसवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. आपल्या सोबत चालणारी माणसे देखील चाली-चाली आपल्याला कसे फसवतात, हे देखील आपल्याला कळत नाही. आपल्या जवळची माणसं देखील आपल्याला अनेक वेळा फसवत असल्याचे अनुभव तुम्हाला देखील आले असतील. खासकरून सिम कार्डच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा पहिल्या असतील. हा प्रकार तुमच्या बाबतीत देखील घडू शकतो.
तुम्ही तुमच्या मित्र कंपनी तसेच जवळच्या माणसांना तुमच्या नावावर सिमकार्ड घेऊन दिले असेल, तर ही माणसं तुमच्या नावावर घेतलेल्या सिमकार्डचा उपयोग कशासाठी करतायत याची तुम्हाला कल्पना नसते. साहजिकच यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अगदी तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते. आणि म्हणून वेळीच तुम्ही सावध होणे आवश्यक आहे तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, तुम्ही हे चेक करून तुम्ही वापरत नसलेली सिमकार्ड तुम्हाला आता बंद करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ, तुमचा नावावर किती सिम कार्ड आहेत, हे कसं चेक करायचं.
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स म्हणजेच DoT या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, ते आधारच्या माध्यमातून चेक करू शकता. भविष्यात तुम्हाला तुमच्या नावावर असणाऱ्या अनेक सिमकार्डमुळे तुम्ही अडचणीत येण्यापासून स्वतःला वेळीच वाचवायचे असेल तर, तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे जाणून घेऊ शकता. आणि जे सिम कार्ड तुम्ही तुमच्या नावावर कोणासाठी घेतलं आहे, हे आठवत नसेल किंवा माहीत नसेल, तर ते सिम कार्ड तुम्ही बंद करू शकता. आता आपण तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, ते कसं पाहायचं हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊ.
तुमच्या आधार कार्डशी किती सिम कार्ड Registered? घ्या जाणून
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जाऊन https://tafcop.dgtelecom.gov.in/. असं सर्च करायचं आहे. तुम्ही तुमच्या क्रोमवर जाऊन असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर TAFCOP ची अधिकृत वेबसाइट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या रकान्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तुम्ही तुमचा मोबाईल टाकल्यानंतर, तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, हा ओटीपी तुम्ही समोर असणाऱ्या रकान्यात टाकायचा आहे. तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला साइन-इन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
साइन-इन ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमच्या समोर दुसरं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल, यावर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर लिंक असलेले सर्व मोबाईल क्रमांक पाहता येणार आहेत. आता तुम्हाला यामध्ये जो मोबाईल क्रमांक तुम्ही कोणाला घेऊन दिला आहे, हे आठवत नसेल तर तुम्हाला कंपनीला फोन करून हा मोबाईल क्रमांक बंद करता येणार आहे. यामुळे सहाजिकच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम