India vs Australia BGT: विराट कोहली खेळाला ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी सामना; काय आहे रोहित विराटची आगामी रणनीती..

0

India vs Australia BGT: बॉर्डर गावस्कर (border gavskar trophy) कसोटी मालिका आता निर्णायक मोडवर आली असून, भारतीय संघ (Indian team) काहीसा अडचणीत सापडला आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. यावेळी देखील भारतीय संघाकडे मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) ऋषभ पंत (rishabh pant) केएल राहुल (kl Rahul) यासारख्या दिग्गज आणि सिनियर खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी झाल्याने भारतीय संघ आता ही मालिका जिंकू शकत नाही.

भारतीय संघ बॉर्डर गावस्कर मालिका जिंकू शकत नसला तरी, सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney cricket ground) सुरू असलेला सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवू शकतो. आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (world test championship final) पोहचण्याचा आशा जिवंत ठेवू शकतो. एकीकडे या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असली तरी, दुसरीकडे यापेक्षा जास्त चर्चा विराट कोहलीच्या कसोटी करिअर विषयी होताना दिसत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी फारच निराशाजनक कामगिरी केली. खासकरून विराट कोहली कडून क्रिकेट दिग्गज आणि चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र सगळ्यांच्या अपेक्षा विराट कोहलीनं भंग केला आहेत. विराट कोहलीने महान क्रिकेटर म्हणून नावलौकिक मिळविला असला तरी, त्याने आपल्या करिअरचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा निराशाजनक कामगिरीकरता नोंद केला आहे.

विराट कोहलीचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. विराट कोहली आता यापुढे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळताना चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. कारण विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्म नाही. याशिवाय तो आता 36 वर्षाचा आहे. जरी त्याचा फिटनेस उत्तम असला तरी बॉर्डर गावस्कर मालिका यानंतर आता 4 वर्षांनी होणार आहे, त्यामुळे वयाच्या चाळिसाव्या वर्षी विराट कोहली खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साहजिकच विराट कोहली आपल्या करिअरचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला आहे.

रोहित शर्माने स्टार स्पोर्टशी बोलताना मी इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. मात्र विराट कोहली पेक्षा रोहित शर्माचं फॉर्म आणि फिटनेस खराब असल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. रोहित शर्माने निवृत्ती घ्यायला हवी, असा सूर उमटला आहे. त्यामुळे रोहित कधीपर्यंत कसोटी क्रिकेट खेळणार हे अद्याप सांगता येणं अशक्य आहे. मात्र विराट आणखी दोन, अडीच वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना चाहत्यांना पाहायला मिळू शकतो.

सिडनी कसोटीमध्ये सध्या विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. जसप्रीत बुमराहला आज दुखापत झाल्याने त्याला सामन्यातून बाहेर जावे लागले आहे. तिसऱ्या दिवशी बुमराह मैदानात उतरणार का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जर बुमराह मैदानात आला नाही, तर विराट कोहलीच या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे मालिका बरोबरीत सोडवण्याची मोठी संधी देखील असणार आहे.

हे देखील वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.