WhatsApp: चुकीचा मेसेज सेंड झाला? काळजी करू नका, सेंड केलेला मेसेज आता एडीट करता येणार; WhatsApp ने आणले भन्नाट फीचर..

0

WhatsApp: व्हाट्सअप (whatsapp) हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप (messaging app) आहे. व्हाट्सअप वापरायला खूप साधं आणि सोप्पं असल्याने, याचे जगभरात असंख्य युजर्स (users) असल्याचे पाहायला मिळते. व्हाट्सअप फेसबुकने (Facebook) खरेदी केल्यानंतर, आता व्हाट्सअपमध्ये अनेक फिचर ऍड होताना पाहायला मिळत आहेत. यापूर्वी एखाद्याला मेसेज चुकीचा टाईप करून पाठवला तर, तो डिलीट व्हायचा नाही. याचा मोठा धोका लक्षात घेऊन व्हाट्सअपने सेंड केलेला मेसेज काही काळानंपर्यंत डिलीट करता येऊ लागला. आता यात अपडेट करून सेंड केलेला मेसेज डिलीट न करता एडीट करता येणार आहे. व्हाट्सअपने नवीन पिक्चर्स आपल्या व्हाट्सअपमध्ये ऍड केले आहे.

व्हाट्सअपवरून अनेक जण चॅटींग तसेच अनेक डॉक्युमेंट सेंड करताना पाहायला मिळतात. व्हाट्सअपचा वापर आता फक्त चॅटिंग करण्यासाठी नाही, तर अनेक डॉक्युमेंट्स व्हिडिओ फोटो पाठवण्यासाठी देखील होतो. अनेकदा पाठवलेले संदेश चुकीचे असतील, तर ते युझर्सना डिलीट करावे लागत होते. मात्र आता चुकीचे संदेश पाठवले असतील, तर ते डिलीट न करता एडीट करता येणार आहे. व्हाट्सअपचे नवीन फिचर लवकरच व्हाट्सअपमध्ये ऍड करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअपमधील चॅट अ‍ॅपमध्ये मेसेज रिअ‍ॅक्शनकरीता स्किन टोन सपोर्ट दिला जाणार असल्याची माहिती आहे. हे फिचर्स लवकरच ग्राहकांना वापरासाठी मिळू शकते. WABetaInfo ने सादर केलेल्या अहवालानुसार, आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी हे नवीन फीचर्स उपलब्ध करणार आहे. व्हाट्सअपमध्ये संदेश पाठवल्यानंतर आपण त्यावर टाईप करून इन्फो आणि कॉपी हा पर्याय निवडू शकतो, त्यात आता आणखी एडीट हा नवीन पर्याय ॲड होणार आहे.

व्हाट्सअपच्या एडिट पिक्चर संदर्भात WABetaInfo कडून या संदर्भातले काही स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहेत. या स्क्रीन शॉटची माहिती घेतल्यानंतर, टेक्स्ट मेसेज अधिक वेळ दाबल्यानंतर, तुम्हाला पॉप-अप मेनूमध्ये एडीत बटन निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर यूजर्सने जो जुना संदेश पाठवला आहे, तो संदेश एडिट केल्यानंतर, पुन्हा पाहता येणार नाही. एडिट केलेला संदेश ज्या व्यक्तीला पोहोचला आहे, तो व्यक्ती हा संदेश एडिट झाला आहे, की नाही, हे त्याला समजणार आहे की नाही, याविषयी अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

व्हाट्सअपचे हे नवीन फीचर्स हे अँड्रॉइड, डेस्कटॉप तसेच आयओएसवर उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, या पर्यायांची चर्चा 2016 मध्ये देखील झाली होती, मात्र नंतर कंपनीने आपल्या यूजर्सकरीता डिलीट फॉर एव्हरीवन हा पिक्चर उपलब्ध करून दिला. व्हाट्सअपच्या नवीन फिचरची उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मेसेज टाईप करताना अनेकांची स्पेलिंग मिस्टेक तसेच इतरही काही त्रुटी पाहायला मिळत होत्या, अशावेळेस अनेकांना त्यांनी सेंड केलेला मेसेज डिलीट करावा लागत होता. मात्र आता या फिचरमुळे चुकीचा मेसेज टाईप झाला तरी, तो एडीट करता येणार आहे.

हे देखील वाचा Marriage tips: लग्न उशिरा झाल्यास मुलींना उद्भवतात या चार समस्या; पुरुषांनाही भोगावे लागतील याचे परिणाम..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेस लेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! कंटेनर पलटी होऊनही वाचला हा तरुण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Viral video: किती ही मस्ती! शांत बसलेल्या कुत्र्याला माकडाने डिवचले; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.