Marriage tips: लग्न उशिरा झाल्यास मुलींना उद्भवतात ‘या’ चार समस्या; पुरुषांनाही भोगावे लागतील याचे परिणाम..

0

Marriage tips: कुठलीही गोष्ट वेळेत होणे फार आवश्यक आहे. त्यात जर लग्न असेल, तर उशीर करून अजिबात चालत नाही. आता आणि पूर्वीच्या तुलनेचा विचार करायचा झाल्यास, पुर्वी मुलींची लग्न खूप लवकर व्हायची. आता मात्र मुली स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकल्या आहेत. मुली अनेक क्षेत्रात मुलांपेक्षा जास्त सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात मुलांपेक्षा जास्त उच्च शिक्षण ह्या मुली घेताना पाहायला मिळतात. सहाजिकच या सगळ्या गोष्टींमुळे मुलींची लग्न देखील उशिरा होताना पाहायला मिळतात. किंवा मुली जाणून-बुजून लग्न उशिरा करतात. मात्र उशिरा लग्न केल्याने अनेक समस्यांना मुलींना सामोरं जावं लागू शकतं, आज आपण यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

मुलींचे लग्न हे वीस ते पंचवीस दरम्यान होणे आवश्यक असल्याचं बोललं जातं. मात्र आता शिक्षणामुळे, नोकरीमुळे मुलीं उशिरा लग्न करताना पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात फक्त मुलीच नाही तर मुले देखील उशिरा लग्न करताना आपण पाहतो, मात्र मुलांच्या तुलनेत मुलींना उशिरा लग्न केल्यामुळे अधिक फटका बसू शकतो. साहजिकच याचा परिणाम मुलींच्या वैवाहिक जीवनावर देखील होऊ शकतो. त्याचे परिणाम आपल्या जोडीदाराला देखील भोगावे लागतात. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.

जोडीदाराशी जुळवून घेणे अवघड

पूर्वजांपासून वडीलधारी मंडळी देखील आपल्या मुला-मुलींचे लग्न वयातच व्हावं यासाठी धडपड करताना पाहायला मिळतात. मुला-मुलींपेक्षा त्यांच्या लग्नाची काळजी त्यांच्या आई-वडिलांना जास्त असते. सहाजिकच याला अनेक कारणे आहेत. वडीलधाऱ्या वडीलधाऱ्या माणसांना अनेक अनुभव आले असल्याने, आपल्या मुलींसोबत अडचण येऊ नये, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. शिवाय समाजाचा प्रेशर देखील त्यांच्यावर असतो. असो, तर मुलींचे लहान वयात लग्न झाले तर मुली लग्नानंतर आपल्या जोडीदाराशी जुळवून घेताना पाहायला मिळतात. याउलट जर उशिरा लग्न झालं, तर मुली आपल्या जोडीदाराशी जुळवून घेत नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

जेव्हा तुम्ही अधिक काळ अविवाहित असता, तेव्हा तुमची मानसिकता वेगळी असते. मोठ्या वयात तुमचं लग्न झाल्यानंतर, तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडी आणि गरजांची एकरूपता आणि मेळ घालणं तुम्हाला खूप कठीण होऊन बसतं. जोडीदाराशी जुळवून घ्यावं यासाठी तुमची मानसिकता देखील नसते. असे देखील संशोधनातून समोर आलं आहे. आणि म्हणून, मग अशा वेळी तुमच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून मुलींचं वेळेतच लग्न होणं आवश्यक आहे.

मोठ्या वयात मुली एंजॉय करत नाहीत

लहान वयात माणसाला अनेक छंद असतात. मुलींचं देखील असंच असतं. मुलींना लहान वयात अनेक छंद असतात. मुलींचं वय जसजसे वाढत जाते, तसतसा त्यांचा उत्साह आणि छंद कमी होत जातो. त्यामुळे मुली या वयात सहाजिकच वैवाहिक जीवनातील प्रवासाला एन्जॉय करत नाहीत. कोणतीही गोष्ट तुम्ही एन्जॉय करत असाल, तरच तुमचे आयुष्य आनंदी जात असतं. मोठ्या वयाच्या मुलीमध्ये हे सहसा पाहायला मिळत नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. आणि म्हणून मुलींचे लग्न तरुण वयातच करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.

 ग रो द र राहण्याच्या अडचणी

माणसाचं वय जसं वाढत जातं, तसतसे माणसाच्या शरीरातील अवयवांची प्रजनन क्षमता कमी होत जाते. महिलांच्या बाबतीत देखील असंच असतं. या उलट पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा मोठा फटका देखील बसतो. वाढत्या वयाबरोबर महिलांची प्रजनन क्षमता देखील कमी होत जात असल्याने, अशा मुलींना गरोदर राहण्यासाठी अडचणी येतात. एवढेच नाही तर, एका संशोधनानुसार, अधिक वय असणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या पोटी जन्मणारे मूल हे निरोगी जन्माला येईलच असे, सांगता येत नाही. किंवा निरोगी मूल जन्मण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तरुण वयाच्या तुलनेत वाढत्या वयात या महिलांचा विचार करायचा झाल्यास या महिलांना गर्भधारणेसाठी जास्त कालावधी लागतो. या महिलांमध्ये ग र्भ पा त होण्याच्या देखील समस्या येऊ शकतात. तसेच प्रसूतीमध्ये देखील अडचणी येऊ शकतात.

हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

Viral video: भल्यामोठ्या सिंहावर कुत्र्याने पाठलाग करून केला हल्ला; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Lifestyle: पुरुषांच्या ya चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.