Rohit Sharma PR: सिंपत्ती मिळवायला गेला, अन् तोंडावर आपटला; रोहित शर्माला पत्नीनेच आणला गोत्यात..
Rohit Sharma PR: नुकतीच बॉर्डर गावस्कर (border gavskar trophy) कसोटी मालिका पार पडली. (भारतीय संघाची Indian team) या मालिकेत फारच निराशाजनक कामगिरी राहिली. खास करून भारतीय भारताच्या सीनियर फलंदाजांना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने एका दशकानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका कमालीची चर्चेत राहिली. भारतीय संघाला या मालिकेत पराभव पहावा लागला असला तरी याची फारशी चर्चा होताना पाहायला मिळत नाही. जितकी चर्चा रोहित शर्मा आणि विराट कोहली ( virat kohli) या दोघांची होताना दिसतेय. या दोघांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा रोहित शर्माची होत असून, एक प्रकारे रोहित शर्माची चांगलीच नाचक्की झाल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, रोहित शर्माची नाचक्की त्याची पत्नी रितिकामुळे झाल्याने सोशल मीडियावर याचे तुफान मीन्स बनत आहेत.
त्याचं झालं असं, पाचव्या आणि अखेरच्या सिडनी कसोटी सामन्यात रोहित शर्माने न खेळण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान लंच ब्रेकमध्ये रोहित शर्माने स्टार स्पोर्टशी संवाद साधत बाहेर बसण्याचे कारण स्पष्ट केले. या मुलाखतीमध्ये रोहित शर्मा म्हणाला, माझा फॉर्म नव्हता, एक चांगला खेळाडू बाहेर बसवणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी बाहेर बसून, शुभमनला खेळवण्याचा निर्णय घेतला.
या इंटरव्यूमध्ये तो अधिक आक्रमक देखील दिसला. जी लोक हातामध्ये पेन घेऊन किंवा माइक, लॅपटॉप घेऊन बसली आहेत, ते ठरवू शकत नाहीत, मी कधी निवृत्ती घ्यायची. मी दोन मुलाचा बाप आहे. मला सगळं कळतं, अशा प्रकारच्या भावना त्याने स्टार स्पोर्ट्स बोलताना व्यक्त केल्या. साहजिकच रोहित शर्माला बाहेर बसून एक सिंपत्ती तयार करायची होती. मात्र त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटा पडला असून, रोहित शर्माची अधिक नाचक्की झाल्याचं पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, रोहित शर्माची ही नाचक्की त्याची पत्नी रितिका सजदेहमुळे (ritika sajdeh) झाली असल्याचं, आता सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे. एकाच दिवशी स्टार स्पोर्टशी संवाद आणि त्याच दिवशी सोशल मीडियावर ट्वीट आणि इंस्टाग्रामवर रोहित शर्मा सुपरस्टार असल्याचा संदेश ट्रेड करवण्यात आला. एकाच प्रकारचे ट्विट बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी केल्याने, हा पेंड PR असल्याचं एकप्रकारे स्पष्ट झाले आहे.
रोहित शर्माच्या PR कंपनीकडून बॉलीवूड सेलिब्रिटींना एक मेसेज पाठवण्यात आला. हाच मॅसेज त्यांना स्टोरी आणि ट्विट करायला सांगितले गेले. याचं कारण म्हणजे, विद्या बालनने (vidya Balan) केलेले ट्विट आणि इंस्टाग्राम अकाउंटला ठेवलेली स्टोरी रोहित शर्माला एक्सपोज करून गेली. यापूर्वी विद्या बालनने मी क्रिकेट पाहत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता मात्र रोहित शर्माच्या समर्थनार्थ तिने जे ट्विट केले, ते अनेकांना आश्चर्यचकित करणार होते. विद्या बालनने इंस्टाग्रामवर ठेवलेली स्टोरी, ही व्हाट्सअपचा स्क्रीनशॉट होता. काही सेकंदानंतर तिने ही स्टोरी डिलीट देखील केली. यामुळे देखील रोहित शर्मा एक्सपोज झाल्याचं बोललं जात आहे.
रोहित शर्माची पत्नी रितिका एक PR कंपनी चालवते. जी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना मॅनेज देखील करते. साहजिक त्यामुळेच बॉलीवूडच्या अनेक सुपरस्टारने रोहित शर्माच्या समर्थनार्थ ट्विट केले. हे देखील आता स्पष्ट झाले आहे. या सगळ्याचा निष्कर्ष म्हणजे, रोहित शर्मा पाचवा कसोटी सामना बाहेर बसून स्वतःभोवती एक सिंपत्ती तयार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा हा डाव फसला असून, पत्निनुळेच त्याची नाचक्की झाली आहे.
हे देखील वाचा Yuzvendra chahal dhanashree verma: अखेर चहल धनश्री वर्माचा घटस्फोट; त्या व्यक्तीसाठी चहलला दिला डच्चू..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम