Yuzvendra chahal dhanashree verma: अखेर चहल धनश्री वर्माचा घटस्फोट; त्या व्यक्तीसाठी चहलला दिला डच्चू..
Yuzvendra chahal dhanashree verma: भारतीय संघाचा दमदार लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) सध्या भारतीय संघापासून दूर आहे. जरी तो दूर असला तरी सोशल मीडियावर या ना त्या कारणाने तो कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा चहल चर्चेत आला असून, यावेळी त्याचं चर्चेत येणं हे त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांचा घटस्फोट (Yuzvendra chahal dhanashree verma divorce) झाल्याच्या बातम्या सातत्याने प्रसारित झाल्या आहेत. या बातम्या प्रसारित झाल्यानंतर, धनश्री वर्माने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला असून, यावेळी मात्र या दोघांचा घटस्फोट झाल्याचं एकप्रकारे निश्चित झाले आहे.
चहल आणि त्याची पत्ती धनश्री वर्मा गेल्या काही महिन्यांपासून एकत्र पाहायला मिळाले नाहीत. त्यातच आता दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकच नाही, तर चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून धनश्रीचे सगळे फोटो डिलीट देखील केले आहेत. दुसरीकडे धनश्रीने मात्र चहलचे फोटो डिलीट केले नाहीत.
एकीकडे जरी धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम वरून चहलचे फोटो डिलीट केले नसले तरी, unfollow मात्र केले आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. खरंतर तेव्हापासूनच या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं पाहायला मिळाले आहे.
अधिकृरित्या दोघांकडूनही आपल्या रिलेशनशिप विषयी स्पष्टीकरण देण्यात आलं नसलं तरी, दोघेही आता वेगळे झाले असल्याचं एकप्रकारे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर धनश्री वर्माला आता ट्रोल करण्यात येत असून, तिच्यामुळेच हे नातं संपुष्टात आले असल्याचे बोलले जात आहे. अनेकजण धनश्री वर्माने श्रेयस अय्यरसाठी चहलला सोडल्याचे म्हंटले आहे.
हे देखील वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम