Video Game – व्हिडीओ गेम खेळता खेळता गेला टॉयलेटला, सापाचे दात अशा ठिकाणी घुसले की..
Video Game: आजकाल मोबाईलचा जमाना असल्यामुळे मोबाईल वापरत नाही, असा शोधून सापडायचा नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल म्हणजे खेळणं म्हणून आहे. जिथे तिथे बरेच लोक मोबाईल वापरत आणि व्हिडिओ गेम – Video Game खेळत बसलेले असतात. अगदी जेवण करत असताना सुद्धा हातातला मोबाईल चालूच असतो. हे वाचायला जरी तुम्हाला सोपं वाटत असले, तरीदेखील खूप भयानक आहे. अगदी मोबाईल मध्ये लक्ष असल्याने रस्त्यावर कितीतरी अपघात घडत असतात. कितीतरी जीव या गोष्टींमुळे गेले आहेत. अगदी बाथरूमला जाताना सुध्दा आजकाल मोबाईल लागतो. टॉयलेटमध्ये सुध्दा मोबाईल घेऊन बसतात.
मोबाईल टॉयलेटमध्ये व्हिडिओ गेम Video Game खेळत बसणं एका तरुणाला एवढं महागात पडले आहे की, तो तरूण तर विसरणार तर नाहीच. परंतु तुम्हीदेखील हे वाचल्यावर बाथरूम मध्ये मोबाईल घेऊन जाणार नाही. कारण घटना पण तशीच आहे. कदाचित तुमच्या बाबतीत असे घडू नये. मलेशियातील एका 28 वर्षीय तरुणाला टॉयलेटला मोबाईल घेऊन बसणं महागात पडले आहे. त्या तरुणाला आयुष्यभर लक्षात राहील अशी घटना त्याच्यासोबत घडली आहे. त्याचं झालं असं की, व्हिडिओ गेम खेळता खेळता तो टॉयलेटला गेला. आता ते टॉयलेटचे भांडे पाश्चिमात्य पद्धतीचे. त्यावर हा टॉयलेटचे भांडे न पाहता डायरेक्ट बसला. तेवढ्याच सापाने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला.
सापाने एवढा जबरदस्त हल्ला तरुणाच्या पार्श्वभागावर केला की, सापाचे दात त्याच्या पार्श्वभागात घुसले होते. तरूण सांगतो की, जेव्हा तो टॉयलेट सीटवरून उठला तेव्हा सापाचे दात त्याच्या पार्श्वभागात अडकून पडले होते. अचानक एवढा भयंकर प्रसंग घडल्याने तरूण गडबडला. त्याने घाबरलेल्या अवस्थेत सापाला झटकून बाजूला केले आणि तो बाहेर निघाला. हे सगळं एवढं भयानक आहे की, विचार न केलेलाच बरा. ही घटना घडल्यानंतर त्या तरुणाने तात्काळ तेथील बचाव पथकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सापाला बाहेर काढण्यात त्यांना यश आले.
Dua bulan lepas bontot aku kena gigit dengan ular time aku berak. Ular tu keluar dari lubang jamban. Nasib dia tak gigit telur aku. pic.twitter.com/ABDjDkSe2Q
— Sabri Bey (@sabritazali) May 22, 2022
सुदैवाने चावा घेतलेला साप विषारी नव्हता. त्यामुळे पुढील धोका टळला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. दोन आठवडे झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा तपासणी केली असता, त्याच्या पार्श्वभागात चावा घेतलेल्या सापाचे दोन दात सापडले. त्याने ते फोटो देखील त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ही घटना तरुणासाठी एवढी भयानक आहे की, ज्यामुळे तरूण दोन आठवडे त्याच्या बाथरूममध्ये गेला नाही. आपल्याकडे देखील अशा घटना बऱ्याचदा घडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे काळजी घ्यावी व असा प्रकार घडलाच, तर काय करायचे हे जाणून घेऊया.
सापाने चावा घेतल्यावर काय करावे?
साप चावण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आपल्याकडे देखील अजूनही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो. कुठल्यातरी महाराजांकडे, देवृषीकडे घेऊन जातात, तर हे एकदम चुकीचे आहे. तुम्हाला जर यातून वाचायचे असेल तर तुम्हाला उपचारच करावे लागतील. जर कधी असे तुमच्या बाबतीत घडले तर कृपया चालायचे नाही. कारण चालल्यामुळे विष पटकन शरीरात पसरते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे तुम्हाला साप चावला आहे, त्या भागाला घट्ट बांधून घ्यावे. त्यामुळे विष वरती शरीरात पसरणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.
महत्वाच्या बातम्या:
Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम