RCBvPBKS: बंगलोरच्या दारुण पराभवानंतर IPL 2022 चे समीकरण झाले स्पष्ट; ‘हे’ चार संघ जाणार ‘प्ले ऑफ’मध्ये..
RCBvPBKS: आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला असून, ‘प्ले ऑफ’मध्ये (playoffs) कोणते चार संघ जाणार याची उत्सुकता आता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले. आत्तापर्यंत अधिकृतरीत्या फक्त एकाच संघाने ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे. तो संघ या स्पर्धेत पहिल्यांदा खेळणारा गुजरात टायटन (Gujarat Titan) आहे. गुजरात टायटन, लखनऊ सुपर जॉईंट, (Lucknow super giants) राजस्थान रॉयल, (Rajasthan royals) आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर, (Challenger Bangalore) हे चार संघ आयपीएलच्या या हंगामात ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र दिल्लीकडून (Delhi capital) राजस्थान रॉयल आणि काल पंजाब (Punjab king’s ) कडून रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा पराभव झाल्याने, या स्पर्धेचे समीकरण बदलले आहे. आता या स्पर्धेत नेमके कोणते चार संघ प्रवेश करतील? याविषयी आढावा घेऊया.
आयपीएल २०२२ चा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला असून, ही स्पर्धा आता अधिक रोमांचक स्थितीत येऊन पोहचली आहे. काल मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियवर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग संघाने बेंगलोर संघाचा तब्बल 54 धावांनी पराभव केल्याने या स्पर्धेचे समीकरण बदलून गेलं आहे. गुजरात टायटन संघाने नऊ विजयासह 18 गुण मिळवत या स्पर्धेत ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याचा पहिला मान मिळवला आहे. तर दुसरीकडे लखनऊ या संघाने देखील १२ सामन्यात सोळा गुण मिळवले असून, हा संघ देखील ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
राजस्थान रॉयल्स पोहोचणार ‘प्ले ऑफ’मध्ये
दुसरीकडे या स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसर्या क्रमांकावर असणार्या राजस्थान रॉयल्स संघ देखील ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी थोडीशी धोक्याची घंटी असली तरी, जर या संघाने दोन सामन्यापैकी एक विजय मिळवला तरीदेखील हा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतो. राजस्थान रॉयल्स संघाचे या स्पर्धेतील दोन सामने शिल्लक असून, लखनऊ आणि चेन्नई सुपर किंग या संघाशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. मात्र या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्सने एक विजय मिळवला तरी देखील, त्यांच्या ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यामुळे सहाजिकच राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या या हंगामात ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करू शकतो. मात्र जर राजस्थान रॉयल्स संघ चेन्नई सुपर किंग आणि लखनऊ सुपर जॉईंट संघाविरुद्ध पराभूत झाला, तर मात्र राजस्थानला ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचता येणार नाही.
उर्वरित दोन्हीं सामने पराभूत होऊनही लखनऊ पोहचणार ‘प्ले ऑफ’मध्ये
या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनऊ संघाच्या ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या शक्यतेचा विचार करायचा झाल्यास, हा संघ दोन्हीं सामने पराभूत झाला तरीदेखील, ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचू शकतो. कारण लखनऊ संघाव्यतिरिक्त या स्पर्धेतील कोणताही संघ 18 गुणांवर पोहोचू शकणार नाही. आणि लखनऊ सुपर जॉईंट संघाचे ऑलरेडी सोळा गुण आहेत. याशिवाय त्यांचा रनरेट देखील इतर संघाच्या तुलनेत चांगला असल्याने, उर्वरित दोन्हीं सामने लखनऊचा संघ पराभूत झाला तरीदेखील ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचू शकतो. मात्र लखनऊ सुपर जॉईन संघाला दोन्हीं सामने कमी फरकाने पराभूत व्हावे लागतील.
रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा मावळल्या
रॉयल चॅलेंजर संघाच्या ‘प्ले ऑफ’मध्ये जाण्याच्या शक्यता आता धूसर झाल्याचं पाहायला मिळतं. याचा अर्थ रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचणार नाही, असं नाही. मात्र शक्यता फार कमी आहेत. कारण या संघाचा रनरेट मायनसमध्ये आहे. या स्पर्धेततील रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने त्यांचा शिल्लक असलेला एक सामना जिंकला तरी देखील त्यांना इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. या संघाचा रनरेट -0.323 आहे. शिवाय बेंगलोरचा उर्वरित सामना बलाढ्य गुजरातशी असल्याने, हा संघ या स्पर्धेतून जवळपास संपुष्टात आला असल्याचं, सध्या तरी म्हणावे लागेल.
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग या दोन संघांपैकी एकच संघ ‘प्ले ऑफ’मध्ये जाणार
दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांच्या प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या शक्यतेवर बोलायचं झाल्यास, या दोन्हीं संघापैकी एकच संघ प्ले ऑफ’मध्ये पोहोचू शकतो. याचं कारण म्हणजे, या दोन्हीं संघांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना या दोघांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. याचा अर्थ हे दोन्ही संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या दोचांपू एकच संघ १६ अंकावर पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे साहजिकच या दोन संघापैकी एकच संघ ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचू शकतो. यात ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याचे जास्त चान्सेस ‘दिल्ली कॅपिटल’ संघाला असणार आहे. कारण या संघाचे रनरेट पंजाब किंग संघापेक्षा सरस आहे. त्याचबरोबर दिल्लीचा संघ पंजाब किंग संघापेक्षा अधिक बलशाली आहे.
दिल्ली कॅपिटल संघाचे या स्पर्धेतील उर्वरित शिल्लक असलेले दोन सामने, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघाबरोबर होणार आहेत. तर पंजाब किंग संघाचे दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.
हैदराबाद संघाला देखील आहे संधी पण..
‘प्ले ऑफ’मध्ये जाण्याच्या रेसमध्ये सनरायझर्स हैदराबाद हा संघ देखील आहे. मात्र या संघाला उर्वरित तिन्हीं सामने मोठ्या फरकाने विजयी व्हावे लागणार आहेत. या संघाने उर्वरित तिन्हीं सामने जिंकले तरी, देखील त्यांना इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. पंजाब किंग, मुंबई इंडियन्स, आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाविरुद्ध सनरायझर्स संघाला प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी खूप मोठ्या फरकाने विजय प्राप्त करावा लागणार आहे. मात्र तरीदेखील ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी या संघाला इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
हे देखील वाचा Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम