IPL 2022: मोठी बातमी! पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याल्यामुळे ‘हा’ सामना रद्द..

0

IPL 2022: आयपीएल २०२२चा हंगाम रंगतदार अवस्थेत आला असतानाच, आता या स्पर्धेला गालबोट लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या हंगामात नवीन दोन संघ सहभागी झाले असल्याने, ही स्पर्धा आणखीन रोमांचक होणार असल्याचं बोललं जात होतं. नवीन दोन संघानी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे ही स्पर्धा आणखीन रोमांचक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं असताना, क्रिकेट चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे.

या हंगामात दोन नवीन संघ उतरले असून, एकूण 10 संघ आमने-सामने लढत आहेत. या स्पर्धेची तयारी म्हणून यावर्षी मेगा ऑक्शन देखील झाला. आयपीएलमध्ये नवीन दोन संघ सहभागी झाल्याने, अनेकांना या स्पर्धेविषयीची आणखीन उत्सुकता वाढली होती. नवीन संघांनी या हंगामात दमदार सुरुवात देखील केली. अनेक बड्या संघांना पराभवाची धूळ चारत गुजरात टायटनने अव्वल स्थान पटकावले. तर लखनऊ सुपर जॉईंट संघ देखील सहा सामन्यांत चार विजयासह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

मात्र आता दिल्ली कॅपिटल संघातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने, मागणीनुसार बीसीसीआयने पुण्यात होणारा सामना रद्द केला आहे. 20 तारखेला दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गेहुंजे मैदानावर रंगणारा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अशी माहिती आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर, दिल्ली संघाच्या फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना 15 एप्रिल रोजी करुणाची लागण झाली होती.

फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांच्यानंतर १६ एप्रिलला दिल्ली संघाचे मसाज थेरेपिस्ट चेतन कुमार यांनादेखील 16 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. यानंतर १८ एप्रिलला मिशेल मार्श आणि दिल्ली संघाचे डॉक्टर अभिजित साळवी तसेच सोशल मीडिया कंटेट टीमचे सदस्य आकाश माने या तिघांना देखील को रो णा ची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या संघाचा पुण्याच्या मैदानावर पंजाब विरुद्ध सामना होणार होता. मात्र पुण्यात होणारा सामना आता बेब्रॉनवरच खेळविण्यात येणार आहे.

संपूर्ण टिमची टेस्ट होवूनच सामना

20 तारखेला पंजाब विरुद्ध दिल्लीचा होणारा सामना ठरलेल्या वेळेतच होणार आहे. मात्र या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आलं आहे. नियोजित वेळेचा सामना पुण्याच्या गेहुंजे मैदानावर न होता, हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मात्र हा सामना संपूर्ण टीमची कोरणा चाचणी केल्यानंतरच होणार आहे. क्रिकेट चाहते आता आणखीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येऊ नयेत, अशी प्रार्थना करत आहेत.

क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

दिल्लीच्या संघातील एकूण पाच जणांना कोरोना झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, त्यासोबतच बीसीसीआयने पुण्यात होणारा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवल्यावरनंतर, क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. ऐन भरात आलेली ही स्पर्धा रद्द होतेय की, काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा IPL 2022: मोक्याच्या क्षणी हॅट्रिकसह चहलने टिपले चार बळी, पण चर्चा नवरा बायकोच्या सेलिब्रेशनची; पहा व्हिडिओ..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही असा घ्या लाभ..

Viral video: पाठलाग करून सापाने भल्यामोठ्या घोरपडीची शिकार केली; हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ एकदा पहाच..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.