IPL 2022: मोक्याच्या क्षणी हॅट्रिकसह चहलने टिपले चार बळी, पण चर्चा नवरा बायकोच्या सेलिब्रेशनची; पहा व्हिडिओ..

0

IPL 2022: कोलकत्ता आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएल 2022 च्या हंगामात पहिली हॅट्ट्रिक नोंदवत चहलने ऐतिहासिक कामगिरी केली. एकाच षटकात तब्बल चार बळी घेत, चहलने कोलकत्ता संघाच्या तोंडातला घास हिरावून घेतला, आणि राजस्थान संघाला सामना जिंकून दिला. युजवेंद्र चहलने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, चहलने केलेले सेलिब्रेशन देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आयपीएल 2022 च्या हंगामाचा ३०वा सामना काल ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकत्ता आणि राजस्थान यांच्यामध्ये खेळवण्यात आला. रोमहर्षक झालेला लढतीत मोक्याच्या क्षणी युजवेंद्र चहलने केलेल्या हॅट्रिमुळे राजस्थान संघाने कोलकता नाईट रायडर्सला चारी मुंड्या चित केले. एकाच षटकात तब्बल चार बळी घेत, युजवेंद्र चहलने कोलकत्याच्या नांग्या ठेचल्या. मात्र या कामगिरी बरोबरच सोशल मीडियावर ‘मिस्टर अँड मिसेस चहल’चे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले आहे.

सुरुवातीच्या तीन षटकांत चहलने तब्बल 38 धावा दिल्या होत्या. मात्र सतरावे षटक टाकण्यासाठी आलेला चहलने, एकच षटकात वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स या फलंदाजांना बाद केले. कोलकत्याला चार षटकात केवळ चाळीस धावांची आवश्यकता होती. विशेष म्हणजे तब्बल सहा खेळाडू बाकी होते. खेळपट्टीवर श्रेयस आय्यर ८५ धावांवर नाबाद होता. साहजिकच यामुळे हा सामना कोलकत्याच्या बाजूने झुकला होता.

कोलकत्ता हा सामना सहज जिंकेल असं वाटत असताना युजवेंद्र चहलने सतराव्या षटकांत कोलकत्ता संघाचे कंबरडं मोडून काढले. या षटकाच्या चहलने केवळ दोन धावा देत अनुक्रमे व्यंकटेश अय्यर, श्रेयश अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद करत हॅट्रिकची नोंद केली. महत्त्वाच्या क्षणी केलेल्या हॅट्रिकमुळे चहलचे एकीकडे जोरदार कौतुक होत असले तरी, दुसरीकडे त्याने केलेल्या सेलिब्रेशनचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

सामना पाहण्यासाठी फॅमिली होती उपस्थित

कोलकाता आणि राजस्थान यांचा सामना पाहण्यासाठी युजवेंद्र चहलची फॅमिली देखील उपस्थित होती. युजवेंद्रने केलेल्या हॅट्रिकनंतर चहलची पत्नी धनश्री वर्माने केलेले सेलिब्रेशन देखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. हा सामना पाहण्यासाठी चहलचे वडील देखील उपस्थित होते. संपूर्ण फॅमिली सामना पाहण्यासाठी आली असताना चहलने केलेली कामगिरी खास मानली जात आहे.

चहल आणि त्याच्या पत्नीचे सेलिब्रेशन चर्चेत

पॅट कमिन्सला बाद केल्यानंतर चहलने हॅट्रिकची नोंद केली. या सामन्यात युजवेंद्र चहलला दोन वेळा हॅट्रिक करण्याची संधी आली होती. या सामन्यात आपल्या तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर नितीश राणाला चहलने बाद केले होते. त्यानंतर आपल्या चौथ्या षटकात पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यरला बाद केले. मात्र पुढच्या चेंडूवर चहलला हॅट्रिक करता आली नाही. मात्र त्यानंतच्या सलग तीन चेंडूंवर तीन बळी टिपत चहलने हॅट्रिकची नोंद केली.

पॅट कमिन्सला बाद करून चहलने केलेल्या हॅट्रिकनंतर केलेले सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. चहलबरोबर त्याची पत्नी धनश्री वर्माने देखील आपला जल्लोष साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओंना नेटकऱ्यांकडून देखील चांगली पसंती मिळत असून, अनेकांनी या हॅट्रिकला ‘लेडी लक’ असंही म्हटलं आहे.

हे देखील वाचा IPL 2022: ” कारणामुळे महेंद्रसिंग धोनीने दिला चेन्नई संघाच्या कॅप्टन पदाचा राजीनामा; धोनीचा हा शेवटचा हंगाम, वाचा सविस्तर..

Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला चित्त्या च्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

Gas cylinder: सर्वात मोठी ब्रेकिंग! भाजपचा ऐतिहासिक निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर..

तुम्ही हे करत राहिला तर भारताची देखील श्रीलंकेसारखी अवस्था; नरेंद्र मोदींना तोंडावरच अधिकाऱ्याने झापलं..

Raj Thackeray: शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यात येत असतानाच राज ठाकरे यांनी खाल्ली मटनाची उकड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.