Fuel price: गॅस घेऊन रस्त्यावर बसणाऱ्या स्मृती इराणीची आता सर्वसामान्यही उडवू लागले अजब-गजब थट्टा; तुम्हीच पहा हा व्हिडिओ..

0

Fuel price: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने आता सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने, आता सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. एकीकडे महागाई बेरोजगारीने त्रस्त असणारी जनता आता इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने, संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या इंधन दर विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. विरोधकांकडून जोरदार टीका होऊन देखील सरकार याकडे लक्ष देत नाही. आता या संदर्भातलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

महागाई,बेरोजगारी, आणि इंधन दरवाढ विरोधात मोठ-मोठे आंदोलने करून भारतीय जनता पार्टी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आली. 2014 पूर्वी काँग्रेस सत्तेवर असताना गॅस ४१० रुपये होता, तर पेट्रोल ७१, आणि डिझेल ५७ रुपये लिटर मिळत होते. मात्र तरीदेखील भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांनी सिलेंडरच्या टाक्या रस्त्यावर घेऊन आंदोलन केली होती. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील होत्या. आता मात्र या इंधनाच्या किंमती दुप्पट होऊन देखील, भारतीय जनता पार्टीचे नेते या संदर्भात एक शब्द बोलायला तयार नसल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातोय. चारशे रुपये गॅस मिळत असताना गॅसच्या टाक्या घेवून रस्त्यावर बसणार्‍या स्मृती इराणी आता इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या असतानाही मूग गिळून गप्प आहेत.

इंधन दरवाढ विरोधात आणि महागाई विरोधात काँग्रेसने आता अनेक ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. सोबतच महागाईचा निषेध म्हणून, अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर देखील काँग्रेस लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच महागाईविरोधात आणि दिवसेंदिवस इंधनाच्या किंमती वाढत असल्याने, महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईत आंदोलन केलं. यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वसामान्य देखील या महागाईची थट्टा उडवत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

इंधन दरवाढ संदर्भातला काँग्रेसने एक पोस्टर लावला आहे. काँग्रेसने लावलेला पोस्टर 2014 ला गॅस काय किंमतीने मिळत होता, आणि 2022 पर्यंत गॅसच्या किंमतीत कशी वाढ होत गेली, याबाबतचा एक आलेख तयार करून या पोस्टवर लावण्यात आला आहे. काँग्रेसने लावलेल्या या पोस्टर संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ या पोस्टर पासून जात असणारी सर्वसामान्य लोकं स्मृती इराणीला दंडवत घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन महिला आणि एक छोटा मुलगा रस्त्याने जात असताना त्यांच्या हा पोस्टर निदर्शनास येतो. 2014 पासून 2024 पर्यंत गॅसच्या किंमतीत कशी वाढ झाली, हे दर्शविणारा हा पोस्टर पाहून, हे तिघेही स्मृती इराणीला साक्षात दंडवत घालत असल्याचे दिसत आहे. या तिघानंतर भांडी विकणारी तीन मायलेकरांची देखील रस्त्याने जात असताना या पोस्टरवर नजर पडते. हे तिघेही या पोस्टरवर दिसणाऱ्या स्मृती इराणीला दंडवत करत आहेत.

हा व्हिडीओ महाराष्ट्राच्या युथ काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ खूपच मजेशीर असून, स्मृती इराणीला रस्त्याने जात असणाऱ्या लोकांनी घातलेला दंडवत खूपच मजेशीर असल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्वी आपण पेट्रोल पंपावर मोदींच्या असणाऱ्या फोटोला अनेकांनी दंडवत केल्याचं पाहिलं. मात्र आता स्मृती इराणीला दंडवत घालत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ अनेकांनी शेअरही केला आहे.

हे देखील वाचा  Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Fab Phone Fest: Amazon चा धुमधडाका! नवीन लॉन्च झालेल्या सर्वच स्मार्टफोनवर ४० टक्के डिस्काउंट..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ

lifestyle: दुधात हा पदार्थ मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात येईल जोश आणि बरंच काही; जाणून घ्या अधिक..

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

Pixel self repair Features: आता मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही, घरच्याघरी करता येणार दुरुस्ती; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.