Pixel self repair Features: आता मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही, घरच्याघरी करता येणार दुरुस्ती; जाणून घ्या सविस्तर..

0

Pixel self repair Features: ग्राहकांना मोबाईल रिपेरिंगवाले मोठ्या प्रमाणात लुटल्याचे आपण पाहतो. मोबाईलचा किरकोळ घोटाळा असला तरी, मोबाईल रिपेरिंग करणारे मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. या संदर्भातले आपली आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण देखील दुकानदार मागेल तेवढे पैसे देतो. मात्र आता मोबाईल रिपेरिंग करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही जर तुमचा मोबाईल खराब झाला असेल आणि मोबाईल रिपेरिंग करायचा असेल तर तुम्ही स्वतः घरात रिपेरिंग करू शकता. या संदर्भातले एक फिचर्स गुगलने लॉंच केले असून, त्याद्वारे आता ग्राहकांना आपला मोबाईल रिपेरिंग करता येणार आहे.

गूगलने आता iFixit या ऑनलाइन दुरुस्ती करणाऱ्या कंपनीशी करार केला असून, या फीचरवर आपल्या ग्राहकांना मोबाईल फोन दुरुस्ती करण्याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. या फीचर्स मुळे तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप तुमचा मोबाईल कसा दुरुस्ती करायचा आहे सांगितलं जाणार आहे. तसेच ifixit.com या वेबसाईटवर मोबाईलचे सर्व पार्ट ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

         काय काय दुरुस्त करता येणार?

गुगलने यासंदर्भात माहिती देताना, म्हंटले आहे, बॅटरी रिपेअरिंग, रिप्लेसमेंट डिस्प्ले, कॅमेरा या सर्व गोष्टी ग्राहकांना घरच्याघरी दुरुस्ती करता येणार आहेत. गुगलने आपल्या सामान्य पिक्सेलच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण स्पेअर पार्ट्सची माहिती प्रदान केली आहे. गुगलने आपला पिक्सेल फोन दुरुस्ती करण्यासाठी लागणारे किट iFixit किटमध्ये उपलब्ध असणार आहे. यात स्क्रू ड्रायव्हर बिट्स आणि स्पडर्स सारख्या साधनांचा समावेश असेल.

पिक्सेल रिपेअर किट टूलमध्ये या गोष्टी

iFixit माध्यमातून Pixel Repair Kit tool मध्ये अँगल ट्विजर्स iOpener, रिप्लेसमेंट, प्री-कट अॅडहेसिव्ह, iFixit ओपनिंग टूल, iFixit ओपनिंग पिक्स, सक्शन हँडल, यासंदर्भात लागणारे सर्व टूल्स, गुगल आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

दुरुस्ती करण्याचे मार्गदर्शक केले जाणार

गुगलने आपल्या ग्राहकांसाठी हा नवा फीचर्स उपलब्ध केला असून यामध्ये ग्राहकांना घरच्याघरी मोबाईल दुरुस्ती करता येणार आहे. ग्राहकांना स्टेप-बाय-स्टेप मोबाईल दुरुस्ती करण्याचे मार्गदर्शन देखील गूगल करणार आहे. ग्राहकांना कोणता पिक्सेल फोन दुरुस्त करायचा आहे त्यानुसार फोन दुरुस्ती करण्याचे मार्गदर्शन केले जाईल.

या फिचर नुसार तुम्ही, Pixel 5a, Pixel 6 आणि Pixel 6 Pro इत्यादी स्मार्टफोन दुरुस्त करण्याच्या मार्गदर्शक सूचना ग्राहकांना केल्या जाणार आहेत. तसेच गुगल फिक्सेलचे आणखी स्मार्टफोन कसे दुरुस्ती करायचे यासंदर्भात देखील खरच मार्गदर्शन केले जाणार असल्याचा कंपनीला स्पष्ट केलं आहे.

हे देखील वाचाViral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी zunj तुम्हीच पहा..

Fab Phone Fest: Amazon चा धुमधडाका! नवीन लॉन्च झालेल्या सर्वच स्मार्टफोनवर ४० टक्के डिस्काउंट..

lifestyle: दुधात ‘हा’ पदार्थ मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात येईल जोश आणि बरंच काही; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.