मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं; आक्रमक ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी..

0

पातूर प्रतिनिधी: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील गावंडगांवमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनियमीतता आढळून आली आहे. नियमानुसार एका दिवसांत 200 मिटर पेक्षा जास्त गिट्टीची बिछाई करता येत नसतानाही, सदरहू डांबरीकरण रस्त्याच्या कामामध्ये 1000 मिटर पेक्षा जास्त गिट्टीची (खडी) बिछाई करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामामध्ये मनमानी कारभार होत असून, गावकरी चांगलेच संतापले आहेत.

वसाली झरंडी, पहाडसिंगी पांगरताटी येथील नागरीक व बाहेरगावातून गावात शाळेमध्ये येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने आता विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातमध्ये पायपीट करावी लागत आहे. तसेच बिछाईसाठी वापरण्यात आलेली गिट्टी ही माती मिश्रीत आहे. साहजिकच यामुळे डांबरीकरण निकृष्ट दर्ज्याचे होणार आहे. सदर गिट्टी नियमीत आकारपेक्षा मोठ्या आकारची वापरण्यात आली असून, यामध्ये मोठ्या दगडांचा देखील समावेश आहे.

सदर नित्कृष्ट दर्जाच्या गिट्टीची गावातील शाळेजवळ पहाडसिंगी ते गावंडगांव रस्त्यावर बिछाई करण्यात आली असून, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला विचारणा केली असता, बिछाई करण्यात आलेल्या गिट्टीला फोडायचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असं काहीही होत नसून हा सगळा मनमानी कारभार सुरू आहे. सदर काम दिरंगाईने सुरु असल्याने, बिछाईच्या आधी करण्यात आलेला मुरुमाचा थर सुध्दा २-३ महीन्याआधी केल्याने फुटला होता. परंतू आपली चुक लपविण्यासाठी कंत्राटदाराने १००० मिटरपेक्षा जास्त गिट्टीची बिछाई केली असल्याचा आरोप गावातील संतप्त नागरिकांनी केला आहे.

सदर प्रकरण गांभिर्याने घेत गावातील युवक,श्यामकुमार राठोड, संदिप राठोड, संदिप चव्हाण, आणि शेकडो गावकऱ्यांनी शासन दरबारी न्याय मागत रस्त्याची चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कामाची चौकशी होऊन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही तहसीलदार कार्यालयावर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स  क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.