Gopichand padalkar: धक्कादायक खुलासा! नागल फाट्यावर गोपीचंद पडळकर हातभट्टी विकतात; तुम्हीच वाचा..

0

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे (bjp) नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीलावर (NCP) सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषद ही फक्त पवार यांच्यावर टीका करण्यासाठीच मिळाली असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो. राष्ट्रवादीकडून देखील गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोरी असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे. मात्र आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विषयी धक्कादायक माहिती समोर आली असून, राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

गोपीचंद पडळकर यांची राजकीय कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिल्याचे पाहायला मिळते. गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर असल्याचा आरोप देखील अनेकांकडून करण्यात येतो. मात्र या सगळ्यांना न जुमानता गोपीचंद पडळकर विरोधकांवर जोरदार हल्ला करताना पाहिला मिळतात. धनगर समाजाची मते आपल्याकडे वळविण्यातसाठी गोपीचंद पडळकर यांना पुढे आणल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जातो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी थेट भाजपा विरुद्ध आपले दंड थोपाटले, आणि वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवली.

या निवडणुकीत गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक देखील होते. भारतीय जनता पार्टीवर टीका करताना गोपीचंद पडळकरांनी धनगरांना आरक्षण देतो म्हणून, भारतीय जनता पार्टीने धनगरांची मतं घेतली. मात्र त्यांनी आरक्षण दिलं नाही. इथून पुढे भारतीय जनता पार्टीला कधीही मतदान करू नका. मी आता भारतीय जनता पार्टीत कधीही जाणार नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाची शपथ देखील घेतली होती.

मात्र त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत बारामती विधानसभा निवडणूक लढवली, त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषद दिली. गोपीचंद पडळकर यांना दिलेली विधानपरिषद फक्त राष्ट्रवादी आणि खासकरून पवारांवर टीका करण्यासाठी दिली गेली असल्याचं बोललं गेलं. गोपीचंद पडळकर देखील विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर, शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना दिसून आले.

गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीकडून देखील गोपीचंद पडळकर यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, ते एक मंगळसूत्र चोर आहेत. असे देखील आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर केले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गोपीचंद पडळकर यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली.  आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्यावर थेट हातभट्टी विकल्याचा आरोप करण्यात आला असून, आता राज्याचे राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महादेव बालगुडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करताना गोपीचंद पडळकर यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अहिल्याबाई होळकर यांचे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांचा एक फोटो ट्विट करत महादेव बालगुडे यांनी, हे आहेत अहिल्याबाई होळकरांचे थेट वंशज, युवराज यशवंतराव होळकर. बिरोबाची खोटी शपथ खाऊन नागल फाट्यावर हातभट्टी विकणाऱ्या गोपीचंद पडळकरांना ते दारातही उभा करत नाहीत. अशा आशयाचे एक ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

                   कोण आहेत महादेव बालगुडे

सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक जण सोशल मीडियावर आपले अकाऊंट काढून अनेक विषयांवर भाष्य करताना पाहायला मिळतात. असंच एक प्रकरण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना घडलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकारवर परखडपणे आणि निर्भीड  लिखाणामुळे देव गायकवाड नावाचे फेसबुक अकाउंट चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या OSD निधी कामदार यांच्याकडून या अकाउंटविषयी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. चौकशीनंतर महादेव बालगुडे या तरुणाला अटक करण्यात आली. नंतर जामिनावर सुटल्यावरही महादेव बालगुडे या तरुणाने आपलं लिखाण तसंच सुरू ठेवलं.

महादेव बालगुडे नावाच्या तरुणाने पुढे भाजपविरोधात शासकीय कागदपत्रे, बातम्यांची कात्रणे आणि शासकीय वेवसाईटवरचे अनेक दावे पुराव्यानिशी खोडून काढल्याचं पाहायला मिळाले. याचा परिणाम देवेंद्र फडणवीस सरकारवर देखील झाल्याचा पहिला मिळाला. तत्कालीन फडणवीस सरकारला शासकीय वेबसाईट आणि ट्विटरवरुन योजना संदर्भात केलेल्या अनेक पोस्ट डिलीट कराव्या लागल्या. आता पुन्हा एकदा या तरुणाने गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

हे देखील वाचा 

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका;असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

E Shram Card:केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये..

अजित पवार झुकले! या कारणांमुळे करतायत मोदींचं कौतुक; लवकरच होणार धमाका

Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

मंत्रीपदाची आठवण करुन देताना घंट्याचा उल्लेख; पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापलं, व्हिडिओ व्हायरल..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवरअसा पहा फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.