अजित पवार झुकले! या कारणांमुळे करतायत मोदींचं कौतुक; लवकरच होणार धमाका…

0

दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. तळजाई टेकडीवर झालेल्या घाणीवरून पुणेकरांना अजित पवारांनी मारलेले टोमणे चांगलेच चर्चेत राहिले. मात्र आता राज्याच्या राजकारणात चर्चा होतेय, ती अजित पवार यांनी नरेंद्र मोदींच्या केलेल्या कौतुकीची. नरेंद्र मोदींविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, मोदीं पंतप्रधान झाल्यानंतर, विकास कामांमधून जनतेची मने जिंकली आहेत. अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे सर्वस्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत असताना, अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे केलेलं कौतुक विशेष मानले जात आहे. काही वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर सातत्याने टीका होताना पाहायला मिळते. एवढेच नाही तर नरेंद्र मोदींची अनेक वक्तव्य पाहिली तर देशाच्या पंतप्रधान पदावर असणारी व्यक्ती असं कसं काय बोलू शकते? असा अनेकांना प्रश्न पडतो. उदाहरणच द्यायचे झाले तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेश आणि बिहारच्या मजुरांना आपल्या राज्यात जाऊन कोरोणा वाढवा म्हणून, महाराष्ट्राने हाकलून दिल्याचं,निंदनीय वक्तव्य केलं.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात तब्बल दोन वर्ष शेतकरी आंदोलन करत असल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी हे आंदोलनजीवी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केलं असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या. शेतकरी मागे हटायला तयार नाहीत, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, निवडणूक जवळ आली की नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे माघारी घेतले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय, आपण देशाच्या समस्यांपेक्षा प्रचारालाच जास्त महत्त्व देतो, हे दाखवून देता आहे, अशी टीकाही देशातून व्हायला लागली.

एकीकडे देशात अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे केलेले कौतुक हे फार विशेष मानले जात आहे. एवढेच नाही तर अजित पवारांच्या मनात नक्की काय शिजत आहे, या विषयी अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांच्या या विधानाचे अनेक राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस देखील नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वावर जोरदार टीका करत असताना अजित पवार यांनी केलेले हे विधान सगळ्यांना अडचणीत आणतं की काय? अशी शंका देखील अनेकांनी उपस्थित केली आहे.

अजित पवार ‘ईडी’च्या रडारवर असल्याचे भाजपचे नेते अजूनही बोलताना पाहायला मिळतात. एकीकडे केंद्रीय यंत्रणांची टांगती तलवार अजित पवार यांच्या डोक्यावर असल्याने अजित पवार आता नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना पाहायला मिळत असावेत, असा देखील तर्क अनेकांनी लावायला सुरुवात केली आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरू असतानाच, अजित पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर पहाटे शपथविधी घेतला. हे महाराष्ट्र अजूनही विसरला नाही.

अजित पवारांनी बीजेपी सोबत सत्ता स्थापन करण्याचा हा प्रयोग एकदा केला आहे. याची पुन्हा पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटणार नाही. पवारांना बीजेपी सोबत सत्ता स्थापन करण्यात का रस आहे? याची अनेक कारणे आहेत, यात केंद्रीय यंत्रणा यांचा दबाव हे देखील कारण असू शकतं. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी देखील संसदेत शरद पवारांचे कौतुक करताना काँग्रेसला पवारांकडून शिकण्याचा सल्ला दिला होता. यावरून देखील आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शरद पवार आणि मोदी यांचे चांगले संबंध आहेत. कदाचित येणाऱ्या काळात राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल. पवार राष्ट्रपती होतील, तर सुप्रियांना केंद्रात मंत्रीपद मिळेल, अशा देखील चर्चा आता सोशल मिडियावर होताना पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे याची शक्यता फारच धूसर असल्याचे देखील बोलले जात आहे. त्याचे कारण म्हणजे शरद पवार यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. देशात आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठा रोष असल्याचं पाहायला मिळतं. एवढंच नाहीतर 2024 ला सत्ता बदल होण्याची दाट शक्यता देखील आहे.

2024 ला भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार असं सध्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने, पवार असा निर्णय घेतील, याची शक्यता फार दुसर असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे अलीकडच्या काळात अनेकांनी अनुभव असल्यामुळे याची देखील शक्यता नाकारता येणार नाही, असं देखील बोलत जाऊ लागलं आहे. आणि म्हणूनच अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाचं कौतुक केलं, असल्याचं बोललं जात आहे. लवकरच नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असून पालकमंत्री या नात्याने अजित पवार मोदींचे स्वागत देखील करणार असल्याचं कळतंय.

राजकारणामध्ये चर्चेला फारसं महत्त्व नसलं तरी, चर्चेकडे दुर्लक्ष करून देखील चालत नाही, हा इतिहास आहे. राजकारणात चर्चा रंगतात भविष्यात त्याच सत्यात उतरताना आपण पाहत आलो आहोत. अलीकडच्या काळात तर हा पायंडाच पडला असल्याचे दिसून येतं. त्यामुळं अजित पवार नेमकं असं का बोलले? याविषयी चर्चा होत असली तरी, प्रत्यक्षात अजित पवारांच्या डोक्यात काय शिजतंय याचा अंदाज लावणं सध्यातरी घाईचं होईल.

हेही वाचा-.  सर्वात मोठी ब्रेकिंग! युक्रेनला पाठिंबा म्हणून आपल्या संसदेवर युक्रेनचा झेंडा फडकला…

सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार? वाचा सविस्तर..

समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; भगत सिंग कोश्यारी यांनी खाल्लं शेण; मोदी म्हणाले..

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू…

पोलिसांच्या हालचाली वाढल्या; राणे पिता पुत्रांबरोबर भाजपच्या या बड्या नेत्यालाही संध्याकाळपर्यंत होणार अटक..

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात सोडले साप; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ..

पुणे पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून रचला कट; नाना पटोले आणि बच्चूकडू ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं भासवलं, गृहमंत्री म्हणाले...

व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा पहाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.