सर्वात मोठी ब्रेकिंग! युक्रेनला पाठिंबा म्हणून आपल्या संसदेवर युक्रेनचा झेंडा फडकला…

0

24 तारखेला रशिया युक्रेनवर हल्ला केला. या लष्करी कारवाईत पहिल्याच दिवशी यूक्रेनचे नागरिक आणि सैनिक मिळून १३७ जणांचा मृत्यू झाल्याचं युक्रेननं सांगितलं. यूक्रेनच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्वतः सैन्याची वर्दी चढवत युद्धात सहभागी झाले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अनेक देशांच्या पंतप्रधानांना मदतीची हाक दिली. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील फोन करून मदत मागितली, मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतली.

जगभरातून युक्रेनचं समर्थन केले जात असून, त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. एवढेच काय तर रशियाचे नागरिक देखील युद्ध नको म्हणून रस्त्यावर उतरत आपल्याच देशाचा निषेध करत आहेत. हे सगळं असताना देखील रशियाने मात्र युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला. आता युक्रेनच्या मदतीला अनेक देश पुढे सरसावले असून, अनेकांनी मदत केली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) UNGA मध्ये युक्रेन-रशिया युद्धावर आपत्कालीन विशेष सत्र घेण्यात आले. यामध्ये 15 सदस्यांनी सहभाग घेतला यातील 11 सदस्यांनी यूक्रेनच्या बाजूने मतदान केले. रशियाच्या बाजूने केवळ एक मतदान रशियाच्या बाजूने झालं. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने या सत्रात भाग घेतला मात्र तटस्थ भूमिका बजावली.

युक्रेन आणि रशियात सुरु असलेल्या युद्धाचा निषेध म्हणून आता विविध देशांनी वेगवेगळ्या पद्धतींनी या युद्धाचा निषेध करत युक्रेनियन लोकांनं समर्थन दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता युक्रेनियन लोकांचे न्यूझीलंड या छोट्याशा देशाने देखील समर्थन केले आहे. या युद्धाचा निषेध आणि युक्रेनियन लोकांचे समर्थन म्हणून, न्युझीलंड सरकारने वेलिंग्टनमध्ये आपल्या संसदेवर युक्रेनचा ध्वज फडकवला आहे. फक्त समर्थनच नाही तर या देशाने युक्रेनच्या मूलभूत गरजांसाठी २ दशलक्ष डॉलर्सची मदत देखील केली आहे.

हेही वाचा-.  सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार? वाचा सविस्तर…

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू..

पोलिसांच्या हालचाली वाढल्या; राणे पिता पुत्रांबरोबर भाजपच्या या बड्या नेत्यालाही उद्यापर्यंत होणार अटक..

समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; भगत सिंग कोश्यारी यांनी खाल्लं शेण; मोदी म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.