व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा ऐकाच….

0

पुण्याचे पालकमंत्री मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. विविध विकास कामांचा लेखाजोखा घेत असताना, आज झालेल्या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा रंगली आहे. विशिष्ट शैली साठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी आज पुणेकरांना चांगलेच टोमणे मालल्याचे पाहायला मिळाले. तळजाई टेकडीवर झालेल्या घाणीबद्दल अजित पवार चांगलेच संतापल्याचे देखील दिसून आले.

पुणेकर तळजाई टेकडीवर रोज सकाळ कुत्री घेऊन फिरायला येतात. आणि त्यामुळे याठिकाणी प्रचंड घाण होत असल्याचे पाहायला मिळते. पुणेकरांना माझं आवाहन आहे. बाबांनो कुत्री घेऊन येत जाऊ नका. कुत्र्यांचे लाड घरात करा. हवंतर त्यांना गादीवर झोपवा. माझी काही हरकत नाही. नाहीतर मी चार बिबटे याठिकाणी सोडेन, मग कुत्र्यांना ते खाऊन टाकतील. मग कसं होईल? असं गमतीशीर विधानही त्यांनी केलं.

तळजाई टेकडी बरोबरच पत्रकारांनी राज्यातील इतर घडामोडींवर देखील अजित पवार यांना प्रश्न विचारले, मात्र अजित पवार या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. त्यामुळे अशा प्रश्नांकडे तुम्ही देखील दुर्लक्ष केलं पाहिजे. असं अजित पवार म्हणाले. नवाब मलिक यांच्या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, हे सूडबुद्धीने सुरू असल्याचं प्रत्येकालाच माहीत आहे. यावर पुन्हा बोलून काही होणार नाही.

दरम्यान आज तळजाई टेकडी या ठिकाणी बोलत असताना अजित पवार यांनी पुणेकरांना चागलेच टोमणे मारल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवडला सत्ता असताना मी धडाधड निर्णय घ्यायचो मला तिथे कोणीही काही बोलत नव्हते. काही अडचणी असल्या तर लोक भेटायला यायची. मात्र पुण्यात निर्णय घेताना, खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. नाहीतर पुणेकर लगेच कोर्टात धाव घेतात.

तळजाई टेकडीवर प्रचंड मोठ्या प्रमाणत गाड्या येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गाड्यांचे एक रुपया तिकीट ठेवण्यावर चर्चा झाली तर लगेच आंदोलन झाले. एकीकडे शंभर रुपयाचे पेट्रोल गाडीत टाकून गडी येतो, पण दुसरीकडे मात्र एक रुपयाचं तिकीट नको म्हणतो. आता काय बोलायचं. असा टोमणा अजित पवार यांनी पुणेकरांना मारल्याच पाहायला मिळाले. जर याठिकाणी मी सांगून देखील काही बदल झाला नाही, तर मी शुक्रवार शनिवारी पुण्यात असतो. मग मला भेटा. मी देखील तुम्ही उठता तेव्हाच उठतो, पुणे पाहिजे असेल तर एवढं करावेच लागेल, असही अजित पवार म्हणाले.

हे आवश्य वाचा.  तास उलटून गेले तरी अजूनही छापेमारी सुरूच; इन्कम टॅक्सच्या हाती काय काय लागलं? किशोरी पेडणेकर अडचणीत…

केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…

मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

अजित पवार संभाजीराजे यांना उद्देशून म्हणाले..”घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही..

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या या नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक..

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.