48तास उलटून गेले तरी अजूनही छापेमारी सुरूच; ‘इन्कम टॅक्स’च्या हाती काय काय लागलं? किशोरी पेडणेकर अडचणीत..

0

महाराष्ट्रात सध्या ईडी आणि इन्कम टॅक्सक्या धाडी सुरू असून, महाविकास आघाडीचे अनेक नेते या यंत्रणांच्या रडारवर असल्याचे बोललं जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या नेत्यांची यादी देखील आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करून टाकली आहे. आणि बरोबर याच नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांची कारवाई होत असल्याने, राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी देखील इन्कम टॅक्सची धाड पडली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे इन्कमटॅक्स विभागाने शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या, माजगाव येथील घरावर शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. (Income Tax department raid) इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

यशवंत जाधव यांच्या घराखाली मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तिथे हजेरी लावली. दरम्यान माध्यमांशी बोलताना किशोर पेडणेकर म्हणाल्या, शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्यामुळे, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मी मुद्दामहून उपस्थित राहिले. आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. पोलिसांना आणि यंत्रणांना आम्ही पूर्ण सहकार्य करत करणार आहे.

एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याचं बोललं जात असलं तरी, यशवंत जाधव यांच्या घरावर जवळपास ४८ तास उलटून गेले तरी, अजूनही इन्कम टॅक्स विभाग यशवंत जाधव यांच्या घरावर टाकलेली धाड सुरूच असल्याचं कळतंय. या प्रकरणात मुंबईमध्ये तब्बल ३३ ठिकाणी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मिळते आहे. यशवंत जाधव हे मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असून, ते शिवसेनेचे उपनेते देखील आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच इन्कम टॅक्स विभागाकडून झालेली ही कारवाई म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून झाली असल्याच आता स्पष्ट होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जाधव अत्यंत जवळचे मानले जातात. आणि महानगरपालिकेत सर्वात महत्वाचे नेते देखील असल्याने, त्यांच्यावर झालेली ही कारवाई विशेष मानली जात आहे.

इन्कम टॅक्सच्या धाडीत आतापर्यंत काय काय समोर आले आहे, हे अद्याप समोर आहे नाही, मात्र गेल्या ४८ तासापासून चौकशी सुरू असल्याने, आणि ३३ ठिकाणी शोध मोहीम सुरू असल्याने, आता यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं बोललं जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदार संघातून आमदार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी किरीट सोमय्या यांनी देखील यशवंत जाधवांनी भष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा-.   केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…

मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.