मराठा आरक्षण: अजित पवार संभाजी राजेंना म्हणाले, “घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ..
पुण्याचे पालकमंत्री मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांचा लेखाजोखा घेत असताना, आज झालेल्या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा रंगली आहे. विशिष्ट शैली साठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी आज पुणेकरांना चांगलेच टोमणे मालल्याचे पाहायला मिळाले. तळजाई टेकडीवर झालेल्या घाणीबद्दल अजित पवार चांगलेच संतापल्याचे देखील दिसून आले.
पुणेकर तळजाई टेकडीवर (taljai tekadi) रोज सकाळी कुत्री घेऊन फिरायला येतात. आणि त्यामुळे याठिकाणी प्रचंड घाण होत असल्याचे पाहायला मिळते. पुणेकरांना माझं आवाहन आहे. बाबांनो कुत्री घेऊन येत जाऊ नका. कुत्र्यांचे लाड घरात करा. हवंतर त्यांना गादीवर झोपवा. माझी काही हरकत नाही. नाहीतर मी चार बिबटे याठिकाणी सोडेन, मग कुत्र्यांना ते खाऊन टाकतील. मग कसं होईल? असं गमतीशीर विधानही त्यांनी केलं.
तळजाई टेकडी बरोबरच पत्रकारांनी राज्यातील इतर घडामोडींवर देखील अजित पवार यांना प्रश्न विचारले, मात्र अजित पवार या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. त्यामुळे अशा प्रश्नांकडे तुम्ही देखील दुर्लक्ष केलं पाहिजे. असं अजित पवार म्हणाले. नवाब मलिक यांच्या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, हे सूडबुद्धीने सुरू असल्याचं प्रत्येकालाच माहीत आहे. यावर पुन्हा बोलून काही होणार नाही.
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) आज पासून आझाद मैदानावर (aazad maidan) मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण करणार आहेत. संभाजीराजे यांनी 26 तारखेपासून आपण उपोषण करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केले आहे. साडेअकरा वाजता आझाद मैदानवर ते उपोषणाला बसणार आहेत. पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी फारच गमतीशीर वक्तव्य केल्याचा पाहिला मिळाला.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पवार म्हणाले, “घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात…” पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, हे वक्तव्य कमालीचं व्हायरल देखील झालं आहे. अजित पवारांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. एखाद्या कार्यक्रमात किंवा प्रचारात त्यांनी वापरलेली काही वाक्ये खूपच मजेशीर आणि गंमतीशीर असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं असेल.
हेही वाचा-. प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…
पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान..
कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम