‘या’ चूकीच्या ठिकाणी ‘तुळस’ ठेवल्यास घरात कटकट आणि अशांती पसरते; याविषयी जाणून घ्या सविस्तर..

0

हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खासकरून ग्रामीण भागात तुळशीची दररोज पूजा देखील केली जाते. तुळशीला ज्याप्रमाणे धार्मिक कारणांमुळे पुजले जाते, तेवढंच तुळशीला आयुर्वेदाद देखील महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीचे वृंदावन हे प्रत्येकाच्या घरासमोर पाहायला मिळते, खासकरून खेडेगावात. आज आपण वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे किती महत्व आणि महात्म्य आहे हे जाणून घेऊया.

खेडेगावात जवळपास सर्वच घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा तुळशीच्या रोपाची पूजा ही केली जाते. आयुर्वेदात तुळस ही अनेक आजारांवर रामबाण उपाय असली तरी, वास्तुशास्त्रात तिला अनन्य साधारण महत्व आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप समजले जाते. तिची पूजा करण्यामुळे आपल्या घरातील सगळे दोष नष्ट होतात, असंही बोललं जात. तुळस दारापुढे असल्याने, आणि तिची पूजा केल्याने, घरातील दोष, संकटे दूर होतात, असंही वास्तुशास्त्रात बोललं जातं. त्याचबरोबर तुळशीमुळे घरात सकारात्मक उर्जा देखील, मिळत असल्याचं सांगण्यात येतं.

मात्र, ज्या प्रमाणे तुळशीची पूजा केल्याने सुख समृध्दी येते. त्याच प्रमाणे, तुळश अचानक सुकल्याने किंवा तुळशीच्या झाडाची पाने गळली तर, ते अशुभ मानले जाते. तुळस अचानक सुकली असेल तर, घरात संकटं येण्याचे संकेत देखील मानले जातात. विष्णू भगवान तुळशीवर प्रचंड प्रसन्न असतात. आणि म्हणून जर आपण तुळशीची पूजा केली तर विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात. मात्र जर तुळस अचानक सुकूनन गेली, पाने झडली, तर मात्र ‘पितृदोषामुळे’ हे घडलं असं समजल जातं. याचा अर्थ विष्णू आपल्यावर कोपले आहेत, असंही समजलं जातं.

पितृदोषामुळे घरासमोर असणारी, तुळस वाळते, आणि मग आपल्या आयुष्यात संघर्ष सुरू होता. आयुष्यात सतत अडचणी निर्माण होतात. एवढंच नाही तर, घरात एकमेकांबरोबर नेहमी कटकट होत असते. असही मानलं जातं. म्हणून तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीच्या पूजेने ज्या प्रमाणे सुख समृद्धी घरी नांदते, त्याच प्रमाणे तुळस घरात काही अडचणी, दोष असतील तर ते सांगण्याचं काम देखील तुळस करते असंही वास्तुशास्त्र सांगते.

हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र जर तिची व्यवस्थित निगा राखण्यात आली नाही, तर त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात. असं सांगितले जाते की, जर तुमच्या दारापुढे असणाऱ्या तुळशीपशी पक्षांनी घरटे केली, तर तुमच्या आयुष्यातला केतू योग्य काम करत नसल्याचं बोललं जात. आणि नंतर मग केतूची स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबरच आपल्या घराच्या छतावर तुळशीचे रोप ठेवल्यास आपल्या जीवनातला,बुध कमजोर होत असतो. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे बुध हा धनाचा ग्रह त्याचबरोबर व्यवसायाचा स्वामी देखील मानला जातो.

हे देखील वाचा Skin Caउन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल?    तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती

Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने बाजारात केलाय कहर..

Maharashtra Budget 2022:अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार

रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल कीस; व्हिडिओ व्हायरल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.