डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू…
भारत हा कृषिप्रधान देश आहे, बहुतांश लोकं ही शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. भारतात जवळपास सत्तर टक्के लोकं शेतीवरच अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. भारतात अनेकजण शेतीवर अवलंबून असले तरी या लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, असं अजिबात नाही. आता त्याला अनेक कारणे देखील आहेत. मात्र सगळ्यात महत्वाचे कारण काय असेल तर, ते पिकांवर, फळाबागांवर न होणारी निर्यात, हे एक महत्वाचे कारण असल्याचे स्पष्ट होते.
मात्र आता महाराष्ट्र राज्यातून डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी डाळिंब विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर्षी राज्यातून डाळिंबाची निर्यात करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातून अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शेतीवर अवलंबून असणाऱ्या भारताचा, कृषी उत्पन्नात जगात दुसरा क्रमांक लागतो. आंबा, डाळिंब,द्राक्षे केळी,सीताफळ या फळांच्या उत्पन्नात भारताने मोठी प्रगती केली आहे. शेतकरी या बागांकडे वळण्याला सरकारचे धोरण देखील महत्वाचे ठरले आहे. हे आपल्याला मान्यच करावे लागेल. मनरेगा या योजनेच्या माध्यमातून फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फक्त लागवडच झपाट्याने वाढली अस नाही तर, उत्पादन व विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाल्याचं पहायला मिळतं.
जागतिक बाजारपेठेत टिकून राहायचे असेल तर, शेतकऱ्यांना आपल्या पिकाची गुणवत्ता वाढवावी लागेल, हे आता सगळ्यांनाच माहीत झाले असून, शेतकरी देखील या वाटेने पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. या बरोबरच निर्यात करत असताना दलालांचा सहभाग कमी करून डाळिंब उत्पादकांचा थेट निर्यातीमध्ये सहभाग वाढवण्याचे काम, महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठानकडून सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
एवढंच नाही तर, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस यावेत यासाठी परदेशातील विविध बाजारपेठ भारतातील डाळिंबांना उपलब्ध करून देण्याचं ऐतिहासिक काम विविध संघटना तसेच राज्य सरकारने देखील केल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ, राज्याचे कृषी विभाग, फलोत्पादन संचालनालय, आणि राज्य कृषि पणन मंडळ पुणे, यांचेकडून परदेशात देखील डाळिंबाना बाजारपेठा खुल्या करून दिल्याने हा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे.
डाळिंबाची निर्यात महाराष्ट्रासह, गुजरात,कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्यावर्षी जवळपास दोन हजार पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. यावर्षी देशातून डाळिंब निर्यात करण्याबाबत आतापर्यंत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षी तीन हजार शेतकरी नोदणी करणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील पिकांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान आले. अचानक होणाऱ्या अवकाळी पावसाने आणि वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोज पडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. यात डाळिंब उत्पादन शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. यामुळे राज्यातून डाळिंबाच्या निर्यातीला फटका बसला. तरी देखील आता डाळिंब निर्यातीसाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे यावे, अशी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात सोडले साप; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ..
पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…
कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान…
उस उत्पादक शेतकऱ्यांचा गोडवा या सरकारनं पुन्हा हिरावून घेतला; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..
मोठी बातमी! १०० कोटींसाठी अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केल्याचं उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम