राष्ट्रवादी एकवटली; सगळे मंत्री सिल्वर ओकवर! मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शरद पवारांनी उचलले ‘हे’ पाऊल..

0

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर येताना नावाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात केला. चौकशी संपल्यानंतर कोर्टात जात असताना नवाब मलिक यांनी “लढेंगे जितेंगे एक्सपोज करेंगे” म्हणत ईडीला आणि भाजपला एक प्रकारे आव्हानच दिलं आहे.

कोणतीही नोटीस न पाठवता भल्या पहाटे नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने आपल्या कार्यालयात नेल्याने, ईडीवर अनेकांनी जोरदार हल्ला चढवला. ईडीने आठ तास कसून चौकशी केल्यानंतर, नवाब मलिक यांना अटक केली असून, न्यायालयात ईडीने मलिक यांना चौदा दिवसांची कोठडी मागितली आहे. मात्र दुसरीकडे नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना, नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

14 दिवसांच्या कोठडी संदर्भात सध्या न्यायालयात युक्तिवाद सुरू असून, न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले असून, आता राष्ट्रवादीने हालचाली करायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे जयंत पाटील नुकतेच मुंबईला रवाना झाले असून, शरद पवार देखील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. एवढंच नाही तर, राष्ट्रवादीने या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून, आपल्या सगळ्याच मंत्र्यांना मुंबईत सिल्वर ओक बंगल्यावर बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीवर खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे, भविष्यात नवाब यांच्या अडचणी वाढणार असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. आज नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने हे सिद्ध देखील झाल्याचं बोललं जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना भल्या पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेलं आहे.

नवाब मलिक यांची चौकशीही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात असल्याचं बोलले जात असून, जाणीवपूर्वक त्यांना अडकवण्यात आले आहे. असं देखल आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून बोलण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून, जाणून-बुजून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणाऱ्या मंडळींना टार्गेट करत कारवाई करण्याचा धडाका सुरू असल्याचं, बोललं जात आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. एकीकडे दररोज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक आर्यन खान ड्रग्स प्रकरण किती फेक आहे, हे सांगत होते. तर दुसरीकडे, समीर वानखेडे आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचे थेट संबंध असल्याचा खुलासा करत होते. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक जवळच्या लोकांनीच हे प्रकरण घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप देखील नवाब मलिक यांनी केला होता.

एकीकडे नवाब मलिक रोज पत्रकार परिषद घेत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील नवाब मलिक आता सुतळी बॉम्ब फोडत आहेत, मी मोठा धमाका करणार असल्याचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता सूडबुद्धीने नवाब मलिक यांच्यावर एका जून्या मालमत्ता व्यवहार प्रकरणात. अंमलबजावणी संचालनालयाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

ईडीने केलेली ही कारवाई नियमानुसार झाली नसल्याचे, देखील बोलले जात आहे. कोणतीही नोटीस न काढता, अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भल्यापहाटे नवाब मलिक यांच्या घरी धाड टाकली. आणि नवाब मलिक यांना कार्यालयात घेऊन गेले. नवाब मलिक यांच्या एका जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी सात वाजलेपासून सुरू होती.

हेही वाचा नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

आपली रॅली सोडून भाजपचे हजारो कार्यकर्ते प्रियंका गांधींच्या रॅलीत; भर रस्त्यात असं काय घडलं

सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचा धुमाकूळ; डोक्यावर जठा,हातात त्रिशूल! काय आहे प्रकरण

मोठी बातमी! १०० कोटींसाठी अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केल्याचं उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

हे फक्त पवारांचा नातूच करू शकतो; रोहित पवारांच्या ‘या’ कृत्याचं देशभरातून कौतुक…

नारायण राणेंवर गुन्हा दाखल; केव्हाही होऊ शकते अटक, ‘हे’ आहे कारण...

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.