Petrol Price Today: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, इंधन दरात मोठी घट, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

0

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना (Petrol Price Today) आता ब्रेक लागून दरात अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होईल, असे पेट्रोलियम तज्ज्ञ नरेंद्र तनेजा म्हणाले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. (Petrol Price Today: Petrol-diesel will be cheaper, big reduction in fuel prices)

ऑक्टोबरमध्ये एलपीजीच्या किमतीत वाढ झाली होती त्यांनतर मात्र आता वातावरण बदलू लागल्याचे असेदेखील पेट्रोलियम तझ नरेंद्र तनेजा म्हणाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे भाव वाढणार नसून कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली.

यावर नरेंद्र तनेजा म्हणतात की, आता कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपेक्षा कमी होण्याची वाट पाहत आहे. याबाबत त्यांनी दोन करणेही सांगितली.  नुकत्याच ग्लासगो येथे एक बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व देशांच्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Price Today) वाढत्या किमतीबाबत चिंता व्यक्त करणे आणि त्याच बैठकीत भविष्यात इंधनाच्या पर्यायी वापरावर चर्चा होणे आहे.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांना पसंती: जगभरात इंधनाच्या वाढत्या  किमतींमुळे बऱ्याच देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेलला पर्याय निर्माण करण्याचा आग्रह धरला. जर भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचा दुसरा पर्याय या तेल उत्पादक देशांना खूप हानिकारक ठरेल.

यामुळे तेल उत्पादक देशांच्या व्यापारावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्याच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता त्यांनी हळूहळू कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुध्दा चर्चेदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यास सांगितले होते. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती अशी माहिती मिळाली आहे.

वाढते इंधनदर अमेरिकेची ठरतेय डोकेदुखी:
पेट्रोलियम तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी इंधन दर कमी होण्याच्या करणातील सर्वात मोठे कारण म्हणजे इंधन दरवाढीचा अमेरिकवर दबाव आहे. जो बायडेन यांच्या हातात अमेरिकेची सूत्रे आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचसोबत अमेरिकेतील महागाईचा दर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता इंधन दरवाढ
अमेरिकेची डोकेदुखी ठरत आहे.

अमेरिकेमध्ये बरेचसे लोक आपल्या वयक्तिक वाहनांवर प्रवास करत असतात. तेथे सार्वजानिक वाहनाने प्रवास करण्याचे प्रमाण कमी आहे. तेथील जनतेने इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर दबाव वाढवला आहे. आणि त्यामुळेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी जो बायडेन यांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे.

23 नोव्हेंबर 2021 पेट्रोल डिझेल दर (प्रति लिटर): औरंगाबाद पेट्रोल 111.64 रुपये, तर डिझेल 95.79 रुपये,  कोल्हापूर पेट्रोल 110.09 रुपये तर डिझेल 92.89 रुपये, मुंबई पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेल 94.14 रुपये, नागपूर पेट्रोल 109.71 रुपये तर डिझेल 92.53 रुपये, नाशिक पेट्रोल 110.40 रुपये तर डिझेल 93.16 रुपये, पुणे पेट्रोल 109.52 रुपये tr डिझेल 92.31 रुपये, ठाणे पेट्रोल 110.12रुपये तर डिझेल 94.28 असे दर आहेत.

महत्वाच्या बातम्या: मी मर्दानी स्त्री मी सहन करणार नाही; रूपाली ठोंबरे यांचा राज ठाकरेंना इशारा!राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार हाती 

नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली.. 

या कारणामुळे मध्य प्रदेशात एकाने आपल्या पत्नीसाठी बांधला ताजमहल, फोटो पाहून वेडे व्हाल.. 

Maruti ने डिझेल गाड्यांबाबत केली मोठी घोषणा, 2023 मध्ये होणार डिझेल गाड्या..

Ajit Pawar: नगरकरांनी थेट पालकमंत्रीच बदलून टाकला; नगरकरांच्या या कृत्यामुळे अजित पवारांनी डोकंच बडवून घेतलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.