‘या’ कारणामुळे मध्य प्रदेशात एकाने आपल्या पत्नीसाठी बांधला ताजमहल, फोटो पाहून वेडे व्हाल..

0

हौसेला मोल नाही असे म्हणतात. असाच एक प्रकार मध्य प्रदेश मध्ये पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील आनंद प्रकाश चोकेसे या गृहस्थाने त्यांच्या पत्नीला हुबेहूब ताजमहलसारखी रचना असलेलं घर भेटवस्तू म्हणुन दिले आहे. ते घर जणूकाही ताजमहल आहे असेच दिसत आहे.

आनंद प्रकाश हे बऱ्याच दिवसांपासून आपल्या पत्नीसाठी असे घर बांधण्याचा विचारात होते. आज त्यांचें हे स्वप्न सत्यात उतरले आहे. हे घर त्यांची पत्नी मंजूषा यांच्यासाठी त्यांनी हौसेने बांधून घेतले आहे. या घरामध्ये ४ बेडरूम १ स्वयंपाकघर, १ लायब्ररी आणि १ ध्यान कक्ष आहे. हे घर पुर्णपणे तयार व्हायला तब्बल 3 वर्षे एवढा कालावधी गेला आहे.

त्यांनी हे घर बांधण्यासाठी अनेक राज्यांतून करागिरांना बोलावले होते. हे घर बनवण्याआधी आनंद चोकेसे आणि त्यांची पत्नी ताजमहाल पहायला त्यांच्या पत्नीबरोबर गेले होते. तिथे त्यांनी बारकाईने ताजमहालाच्या रचनेचा अभ्यास केला. यानंतर आनंद प्रकाश चोकेसे यांनी हे घर बनवण्याचे कंत्राट कंसलटिंग इंजिनियर प्रवीण चौकसे यांना दिले.

आनंद चौकसे यांनी एक अतिशय आव्हानात्मक व कठीण असे काम माझ्यावर सोपवले आणि ताजमहालसारखे दिसणारे घर बांधण्यास मला सांगितले. अशी प्रतिक्रिया इंजिनियर आनंद चौकसे यांनी दिली आहे. ते स्वतः आणि त्यांची पत्नी मंजुषा चौकसे आग्रा येथे गेले होते आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ताजमहाल पाहिला. त्यानंतर अभियंत्यांना ताजमहालसारखे घर बांधण्यास सांगितले .

स्वत: अभियंता प्रवीण चौकसे यांनीही आग्रा येथे जाऊन ताजमहालच्या रचनेचा, कोरीव काम, परिसर या ठिकाणचा सविस्तर अभ्यास केला. तेथील सगळी सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. घराचे कोरीव काम करण्यासाठी बंगाल व इंदूर येथील कारागिरांना आणले होते. घराचे फ्लोअरिंग चे काम राजस्थानमधील मकराना येथील कारागिरांनी केले आहे.

घरातील फर्निचरचे काम मुंबई आणि सुरतच्या कारागिरांनी केले आहे. हे घर बांधण्यासाठी आग्रा येथील उत्कृष्ट कारागिरांचीही मदत घेतली आहे. प्रवीण चौकसे यांच्या मते, घराचे क्षेत्रफळ 90X90 आहे. मूळ रचना 60X60 आहे. घरातली साधारण घुमट 29 फूट एवढी उंच आहे. या घराला अल्ट्राटेकने इंडियन कन्स्ट्रक्टिंग अल्ट्राटेक आउट स्टँडिंग स्ट्रक्चर ऑफ एमपीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात आले आहे.

बुरहानपूरला येणारे पर्यटक आवर्जुन आनंद प्रकाश चौकसे यांचे हे ताजमहाल सारखे हुबेहूब दिसणारे घर पाहण्यासाठी नक्कीच येतात. हे घर पाहिल्यानंतर पाहणारा या घराच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आजकाल घटस्फोटाचे वाढते प्रमाण पाहता आनंद यांचे आपल्या पत्नीवरील प्रेम कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्त्रीला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाल्यास नवलच ते.

हेही वाचा: Nawab Malik: यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे, मलिक यांनी रात्री १२लाच केला फोटोहल्ला 

समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी 

महागाईवरून पंतप्रधानांना सवाल उपस्थित करूनही फरक पडत नसेल तर,लोकांनी कुठे जायचं? स्मृती इराणीच कडाडल्या 

मोठी बातमी! महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक 

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.