Nawab Malik: ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक यांनी रात्री १२लाच केला फोटोहल्ला

0

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांची रोज नवनवीन दावे आणि पुरावे सादर करून झोप उडवत आहेत. आत्तापर्यंत नवाब मलिक रोज सकाळी ९, १० वाजता पत्रकार परिषदा घेऊन हल्लाबोल करत होते. त्यांनी आता चक्क रात्री बारालाच वानखेडे यांचे बारा वाजवले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा एक जुना फोटो ट्वीट केला आहे. (Nawab Malik VS Sameer Wankhede)

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ‘ हा ‘ फोटो ट्विट करून समीर वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी कालच समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित लग्नाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर  केली होती. तर नवाब मलिक यांनी मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटांनी फोटो पोस्ट केला आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) शासकीय दौऱ्यावर आहेत. ते दुबईला गेले आहेत. परंतु दुबईतून समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या तोफा सोडत आहेत. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करून आता नवीन बॉम्ब फोडला आहेत. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि अजून एक मुस्लिम पेहराव केलेली व्यक्ती पाहायला मिळत आहे. समीर वानखेडे यांनीदेखील मुस्लिम पेहराव केला आहे.

समीर वानखेडे यांच्या निकाहच्या (लग्नाच्या) वेळचा हा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हा फोटो कुठला आहे, हे नवाब मलिक यांनी सांगितले नाही. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ असा कॅप्शन पोस्टमध्ये टाकला आहे. त्यामुळे या फोटोवरून अजून पुढे काय होणार आहे हे पाहणं औस्तुक्याच ठरणार आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे मागासवर्गीयांच्या आरक्षणातून नोकरी मिळवल्याचा असा आरोप मलिक मलिक करत आहेत. हा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत  गेला आहे.  नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला देखील सादर केला होता.

समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर म्हणून मुंबई महापालिकेने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या नोंदणीनुसार समीर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे आणि त्यांचा धर्म मुस्लिम आहे. ते प्रमाणपत्र त्यांनी न्यायालयात सदर केले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर पडणार आहे. जर समीर वानखेडे हे धर्माने मुस्लिम असल्याचे उघड झाल्यास त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे.

हेही वाचा: समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी 

मोदींचा बुरखा फाटला टराटरा; शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे मागे घेतलेच नाहीत! धक्कादायक बाब आली समोर 

मोठी बातमी! महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक 

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.