समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी

0

जवळपास दोन महिने होत आले, मात्र आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जाणून बुजून अडकवण्यात आल्याचं हळूहळू आता स्पष्ट होत चाललं असल्याचे पाहायला मिळत असून, समीर वानखेडे यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. काल न्यायालयाने देखील एनसीबीने आर्यन खानला केलेली अटक, आणि या प्रकरणाचा केलेला तपासात उपस्थित करत एनसीपी ला चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. एवढंच नाही तर ड्रग्स प्रकरणाशी आणि ड्रग्स माफीयांशी आर्यन खानचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असल्याने समीर वानखडे पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सुरुवातीपासूनच हे प्रकरण फेक असून हा माणूस देखील फिरत असल्याचे सातत्याने माध्यमांसमोर येऊन सांगत होते. मात्र राजकारणाशी संबंधित असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र न्यायालयानेच ड्रग्स प्रकरणाशी आर्यन खानचा काही संबंध नाही. त्याचबरोबर ड्रग्स माफियाशी देखील आर्यन खानचा संबंध असल्याचे आढळत नाही, असं न्यायालयाने म्हटल्याने, आता हे प्रकरण समीर वानखेडे आणि त्याच्या टीमने खंडणी गोळा करण्यासाठीच, घडवून आणल्याचं जवळपास उघड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्डिलिया’क्रूज’वर छापा टाकत आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर, समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईचे अनेकांकडून कौतुक देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. किरण गोसावी हा एनसीबीचा कुठलाही अधिकार नसल्याचे समोर आल्यानंतर, त्याचबरोबर तो आर्यन खानला ज्या पद्धतीने हाताला पकडून पळवत एनसीबी ऑफिसला घेऊन गेला, यावरून अनेकांनी शंका व्यक्त केली. आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. तसेच किरण गोसावी यांचा पर्सनल बॉडीगार्ड असणारा प्रभाकर साईल याने देखील धक्कादायक खुलासा केल्याने, एनसीबीने केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सगळीकडून अडचणीत आल्याचे पाहायला मिळत असून, आता त्यांना लवकरच जेलवारी देखील होऊ शकते, अशी चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रमाणपत्र वरून समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत तर दुसरीकडे आता न्यायालयाने देखील समीर वानखेडे यांच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एकप्रकारे आर्यन खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तताच केली आहे.

कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत ड्रग्स प्रकरणात झालेल्या कारवाईत ड्रग्सशी आणि ड्रग्स माफीयांशी आर्यन खानचा काहीही संबंध नाही,असं तर न्यायालयाने म्हणत असेल,तर नक्की ही कशासाठी केली गेली? अशा अनेक प्रश्न उपस्थित राहत असल्यामुळे समीर वानखेडे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एवढंच नाहीतर प्रभाकर साईल या प्रकरणात समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये मिळणार असल्याचा केलेला खुलासा देखील आता खरा असल्याचे अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे. आर्यन खायला या प्रकरणात पैशासाठी जाणीवपूर्वक अडकलेलं गेलं, असं जवळपास उघड होताना पाहायला मिळत आहे, अशी चर्चा सध्या जोरदार रंगत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.