नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा ‘क्रांती रेडकर’ला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली..

0

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहिला मिळत आहे. समीर वानखेडे( Sameer wankhede) यांच्या पत्नी ‘क्रांति रेडकर'(Kranti redkar) या समीर वानखेडे यांची बाजू मांडताना नेहमी दिसून आल्या आहेत. नवाब मलिक(Nawab Malik) यांच्या विरोधात न्यायालयात देखील त्यांनी धाव घेतली. मात्र कोर्टाने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. आणि पुन्हा एकदा वानखेडे कुटुंब अडचणीत आले. आज पुन्हा एकदा क्रांती रेडकर देखील चांगल्याच अडचणीत आल्या असून सोशल मीडियावर ट्रोलही होत आहेत.

२ आक्टोंबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात( Aryan Khan Drug case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली. आणि समीर वानखेडे हे नाव देशभर गाजल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला या प्रकरणात समीर वानखेडे यांचा जय-जयकार होताना पाहिला मिळाला, मात्र या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने (Prabhakar sahil)या प्रकरणात समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये मिळणार असल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले.

तसं पाहायला गेलं तर या प्रकरणात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे(ncp) नेते नवाब मलिक हे समीर वानखेडे यांनी केलेली ही कारवाई फेक असून, हा माणूस देखील फेक असल्याचं म्हटलं होतं. त्यातच या प्रकरणाचा एक साक्षीदार प्रभाकर साईलने केलेल्या खुलाशामुळे नवाब मलिक समीर वानखेडेंवर करत असलेल्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असल्याचं बोललं जाऊ लागलं. आर्यन खानकडून ड्रग्स प्रकरणाचा सगळा फोकस ‘समीर वानखेडें’कडे वळल्यानंतर वानखेडेंचं सगळं कुटुंब देखील प्रकाश झोकात आल्याचे पाहायला मिळाळे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा खुलासा केल्यानंतर राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र देखील सादर केले. समीर वानखेडे यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवली असल्याचा, गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. आणि एका दलित कुटुंबाला नोकरीपासून समीर वानखेडे यांनी दूर ठेवलं. असा घणाघात नवाब मलिक यांनी केल्याने समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले.

मलिक समीर वानखेडे यांच्या विरोधात रोज नवनवीन खुलासे आणि आरोप करत असल्यामुळे, समीर वानखेडे यांच्या कुटुंबाने अखेर संतापून नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केली. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात याचिका दाखल करत म्हटले, नवाब मलिक यांना ट्विटरवरून आमच्यावर आरोप करण्यापासून रोखले जावं, असं म्हटलं. मात्र या प्रकरणात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने असं करता येणे शक्य नसून, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असं प्रथमदर्शनी जाणवत नसल्याचंही म्हटलं. आणि पुन्हा एकदा वानखेडे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

समीर वानखेडे यांची बाजू मांडण्यासाठी अनेक वेळा माध्यमांसमोर येत पत्नी क्रांती रेडकर यांनी अनेकवेळा पत्रकार परिषदा घेतल्या. एवढेच नाही तर, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा देखील सहारा घेत, कांती रेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, मात्र या पत्रकार परिषदेत कांती रेडकर ह्या चांगल्याच भडल्याचे पाहायला मिळाले होते. क्रांती रेडकर नवाब मलिक यांच्याविरोधात कसल्याही प्रकारचा पुरावा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

@sajed4srk या आयडीसोबत क्रांती रेडकर यांनी चॅट केलेले स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. @sajed4srk आणि क्रांती रेडकर या दोघांचं झालेलं संभाषण वाचलं तर, प्रत्येकजण हसून हसून लोट पोट झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र दुसरीकडे काही जणांनी क्रांती रेडकर यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा देखील सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे हे स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली.

@sajed4srk या नावाच्या एका व्यक्तीने क्रांति रेडकर यांच्याशी ट्विट करून चॅट केले आहे. त्यात म्हटले आहे, मॅडम माझ्याकडे नवाब मलिक यांचे दाऊद यांच्याशी मोठं कनेक्शन असल्याचे पुरावे आहेत. यावर क्रांती रेडकर म्हणतायत, तुमच्याकडे काय पुरावे आहेत? यावर तो म्हणतोय,माझ्याकडे दाऊद आणि नवाब मलिक यांचा एकत्र फोटो आहे. पुढे यानंतर क्रांती रेडकर म्हणतायत, मला हा फोटो पाठवा तुम्हाला याचे बक्षीस मिळेल.

एवढी सगळी चॅटिंग झाल्यानंतर @sajed4srk या नावाच्या व्यक्तीने नवाब मलिक आणि राज बब्बर यांचा एक फोटो पाठवा. क्रांती रेडेकर म्हणतात, हे तर राज बब्बर आहेत. दाऊद कुठे आहे? यावर sajed4srk हा व्यक्ती म्हणतोय, राज बब्बर यांना त्यांची पत्नी प्रेमाने ‘दाऊद’ म्हणते. विशेष म्हणजे या दोघांमध्ये झालेले हे संभाषण नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केले असल्याने, एकच खळबळ उडाली. आणि क्रांती रेडेकर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.