Maruti ने डिझेल गाड्यांबाबत केली मोठी घोषणा, 2023 मध्ये होणार डिझेल गाड्या..
Maruti: देशातील सर्वात मोठ्या कार (Car) निर्मात्याचा असा विश्वास आहे की उत्सर्जन मानदंडांच्या पुढच्या टप्प्यामुळे डिझेल वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडिया (MSI) मधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की वाहनांच्या विक्रीत आणखी घट होऊ शकेल. या पाठीमागचे कारण म्हणजे 2023 मध्ये उत्सर्जन नियमांचा पुढचा टप्पा लागू झाल्यानंतरअशी परिस्थिती होऊ शकते.
त्यामुळे वाहनांची बाजारातील विक्री आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल कार घेण्याकडे लोंकाचा कल वाढत आहे.सी व्ही रमण मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडियाचे मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणाले “आम्ही डिझेल विभागात जात नाही, हे आम्ही या अगोदरच नमूद केले आहे. आम्ही त्याचा विचार करू आणि जर ग्राहकांची जर तशी मागणी असेल तर आम्ही पुन्हा डिझेल कारकडे येऊ शकतो.
परंतु आम्ही सध्यातरी त्या क्षेत्राकडे पुन्हा जाणार नाही. ते म्हणाले की आणखी काही कठोर उत्सर्जन नियम लागू केले जाणार आहेत.यामूळे सध्या कंपनी डिझेल कार ‘टाळण्याचा’ प्रयत्न करत असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. डिझेल वाहनांची टक्केवारी आणखी खाली येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 2023 मध्ये उत्सर्जन मानदंडांचा एक नवीन टप्पा येईल, ज्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.
आम्हाला या स्पर्धेची माहिती नाही, परंतु मारुतीचा त्यात भाग घेण्याचा कोणताही विचार नाही. असे मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणाले आहेत. उद्योगाच्या अंदाजानुसार, सध्या एकूण प्रवासी वाहनांच्या (PV) विक्रीमध्ये डिझेल वाहनांचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2013 14 च्या तुलनेत ही मोठी घसरण आहे, त्यावेळी एकूण विक्रीत डिझेल कारचा वाटा 60 टक्के होता.
पोर्टफोलिओमधील डिझेल मॉडेल बंद केले आहेत.व मारुतीने भारत फेज-VI स्टँडर्ड लागू केले. कंपनीच्या संपूर्ण मॉडेल रेंजमध्ये सध्या BS-VI अनुरूप एक-लीटर, 1.2 लीटर आणि 1.5 लीटर पेट्रोल मॉडेल आहेत. कंपनी आपल्या सात मॉडेल्समध्ये या व्यतिरिक्त, सीएनजी प्रकार देखील ऑफर करते.
रमन म्हणाले की कंपनी इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीने सध्याच्या पेट्रोल पॉवरट्रेन्समध्ये सुधारणा करण्यावर भर देत आहे. उत्पादन पोर्टफोलिओ आणखी मजबूत बनवण्यासाठी नवीन इंजिनांवर लक्ष केंद्रित करेल. Celerio मधील नवीन K10-C इंजिन हे या सुधारणेचे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे 1.2 लीटर इंजिनमध्येही काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. रमण म्हणाले, “आम्ही म्हणत आहोत की आम्ही आमच्या विद्यमान पॉवरट्रेनमध्ये सुधारणा करू.”
हेही वाचा: या कारणामुळे मध्य प्रदेशात एकाने आपल्या पत्नीसाठी बांधला ताजमहल, फोटो पाहून वेडे व्हाल..
Nawab Malik: यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे मलिक यांनी रात्री १२लाच केला फोटोहल्ला
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात हिंदुस्तानी भाऊ नवाब मलिक यांच्या विरोधात, कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत
Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर
राज्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले; नागरिकांना सत्ता बदलण्याची सुवर्णसंधी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम