Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर
लढाईत मवाळ व जहाल असे दोन गट होते. क्रांतिकारी शहीद भगत सिंह जहाल गटातील होते. जहालगिरीनेच आपण स्वातंत्र्य मिळवू अशा विचाराचे ते होते. भगत सिंह यांचा जन्म 1907 साली झाला. त्यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) 38 वयाचे होते. 1907 साली ते दक्षिण आफ्रिका येथे होते. ते त्या ठिकाणी अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत होते. त्यावेळी मोहनदास करमचंद गांधी होते. महात्मा ही उपाधी त्यांना नव्हती.
1915 साली महात्मा गांधी(Mahatma Gandhi) भारतात आले. भगत सिंह (Bhagat Singh) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विचारात साम्य होते. गरीब व वंचित घटकांना प्राधान्य हे या दोंघांच्या विचारात साम्य होते. भारत इंग्रजांच्या अन्यायकारक वेढ्यातून बाहेर यावा असं गांधी व भगतसिंह यांना वाटत होते. त्या दोघांचे विचार एकाच उद्देशाकडे घेऊन जाणारे होते. गांधी मवाळ विचाराचे व भगतसिंह जहाल विचाराचे असले तरीदेखील दोघांचे ध्येय एकच होते. हे विसरून चालणार नाही.
धर्माचा वापर करून पसरवला जाणारा द्वेष आणि हिंसा याच्या विरोधात ते दोघेही होते. 1928 मध्ये सायमन आयोगाच्या विरोधात आंदोलनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये आंदोलनाचे प्रमुख आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लाला लजपतराय यांना खूप मार लागला आणि त्यामुळेच काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे भगतसिंह यांना खूप राग आला.
भगतसिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस सुप्रिडेंडंट स्कॉट याची हत्या करण्याचा डाव आखला परंतु भगतसिंह यांच्या एका साथीदाराच्या चुकीमुळे दुसऱ्याच पोलीस अधिकाऱ्याची साँडर्सची हत्या झाली. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे लाला लजपतराय यांचे शेवटच्या काही वर्षातील राजकारण भगत सिंह यांना पटत नव्हते. त्यांनी लाला लजपतराय यांचा एकदा जाहीरपणे विरोध देखील केला होता.
तरीदेखील लालाजींचा मृत्यू पोलिसांनी विनाकारण केलेल्या लाठीहल्ल्यामुळे झाल्याने भगतसिंह यांनी हत्या करण्याचा डाव आखला. या हत्येच्या कटात भगत सिंह यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. परंतु काही दिवसांनंतर त्यांनी असेंब्लीत बॉम्ब फोडला.
भगत सिंह यांचा कसलीही जीवितहानी करण्याचा उद्देश नव्हता. इंग्रजांना इथल्या खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी हा त्यांच्या बॉम्बस्फोटामागचा उद्देश होता.
केवढा हा झोल! समीर वानखेडेंचा बुरखा फाटला टराटरा; वानखेडे जन्मापासूनच 'मुस्लिम' असल्याचे उगड..!@nawabmalikncp #NawabMalik #SameerWakhende #AryanKhanDrugCase #BMChttps://t.co/acpw8GJh6z
— महाराष्ट्र लोकशाही (@MahaLokshahi) November 18, 2021
ज्यावेळी त्यांनी बॉम्ब फोडला तेव्हा भगत सिंह आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त हे दोघेही घटनास्थळावरून पसार होऊ शकत होते परंतु त्यांनी तसे न करता ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यावेळी त्यांच्याकडे पिस्तूल सापडले होते. पोलीस अधिकाऱ्याची हत्या देखील याच पिस्तुलाचा वापर करून त्यांनी केली होती. आणि हे पुढे सिध्द झाले. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली.
महात्मा गांधी आणि भगतसिंह यांची फाशीची शिक्षा:
1930 साली दांडी यात्रेनंतर काँग्रेस आणि इंग्रज सरकार यांच्यात वादविवाद होत होते. भारतीय राज्यव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने ब्रिटनमध्ये गोलमेज परिषद लंडन येथे आयोजित केली होती. भारतातील काही नेत्यांना बोलावण्यात आले होते. परंतु महात्मा गांधी व काँग्रेसने या परिषदेला हजेरी लावली नाही.
त्यामूळे या परिषदेतून ब्रिटिशांना काहीही हाती लागले नाही. त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेला ब्रिटिशांनी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. 17 फेब्रुवारी 1931 या दिवशी व्हॉईसरॉय आयर्विन आणि महात्मा गांधी यांची बैठक पार पडली. 5 मार्च 1931 या दिवशी गांधी व व्हॉईसरॉय यांच्यात करार झाला. या करारात ज्यांना अहिंसक मार्गाने आंदोलन केल्याने अटक करण्यात आली आहे अशांची सुटका करण्याच्या निर्णय झाला.
परंतु हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या भगतसिंह यांची शिक्षा मात्र माफ झाली नाही. भगत सिंह व अशा स्वरुपाचे गुन्हे नावावर असलेल्या कैद्यांना शिक्षेतून माफी किंवा कुठलीही सूट मिळाली नाही. त्यामुळेच मग पुढे वाद वाढू लागला. भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांची शिक्षा रद्द करण्यात येत नव्हती तरीदेखील महात्मा गांधी गांधी करार कसा करू शकतात असा सवाल उपस्थित केला होता.
महागाईवरून पंतप्रधानांना सवाल उपस्थित करूनही फरक पडत नसेल तर,लोकांनी कुठे जायचं? स्मृती इराणीच कडाडल्या@srinivasiyc #PetrolDieselPriceHike#Congress #NarendraModihttps://t.co/JpbbAqAI90
— महाराष्ट्र लोकशाही (@MahaLokshahi) November 17, 2021
महात्मा गांधींना त्यावेळी सर्वत्र विरोध होऊ लागला होता. महात्मा गांधीच्या सभांमध्ये लोक त्यांना विरोध करत होते. 23 मार्च 1931 रोजी रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशी देण्यात आली. यामुळे देश पेटून उठला. लोक ब्रिटिशांविरोधात अधिकच आक्रमक झाले , तर लोकांच्या मनात गांधी यांच्या विरोधात रोष वाढत चालला होता.
भगत सिंह यांची फाशीची शिक्षा माफ झाली नव्हती तरीसुध्दा ब्रिटिशांशी करार केला होता. गांधीनी भगत सिंह यांची फाशी रद्द करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे लोकांचे मत होते. महात्मा गांधी यांना काँग्रेसमधीलच सुभाषचंद्र बोस व काही नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
26 मार्च 1931 रोजी कराची येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी 25 मार्च 1931 रोजी गांधी कराचीत दाखल झाले. त्या ठिकाणी सुध्दा गांधींच्याविरोधात आंदोलन झालं. खुनी कुठे आहे? असे लोक ओरडू लागले. काळ्या कपड्याचा वापर करून बनलेली फुलं आणि ‘गांधी मुर्दाबाद’ आणि ‘गांधी गो बॅक’ अशा घोषणा तेथे देण्यात आल्या. त्यावेळी या आंदोलनामुळे आपण व्यथित झालो असं गांधीजी म्हणाले होते.
त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू आंदोलनकर्त्यांना भेटले होते. आंदोलन कर्त्यांसोबत नेहरूंची जवळपास तीन तास चर्चा झाली होती. त्यांनी आंदोलन कर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. तरीदेखील संध्याकाळी पुन्हा महात्मा गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावरूनच त्यावेळी गांधींवर लोक किती नाराज होते याची कल्पना येईल.
काँग्रेसमधील सुभाषचंद्र बोस यांच्यासह बऱ्याच नेत्यांनी गांधी-आयर्विन कराराचा विरोध केला. ब्रिटिश सरकार भगत सिंहांची फाशीची शिक्षा रद्द करत नसेल तर नाही तर मग ब्रिटिशांसोबत करार करण्याची गरज नाही असे सुभाषचंद्र बोस आणि काही काँग्रेस नेत्यांचं मत होतं. परंतु काँग्रेस वर्किंग कमिटी मात्र गांधीचे समर्थन करत होती.
त्यावेळी गांधींची भूमिका नेहमी काय होती?
गांधींनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, भगत सिंह यांच्या शौर्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराचीच भावना आहे. परंतु स्वत:चं बलिदान देऊन लोकांना त्रास होता कामा नये… लोक तुमच्यासाठी फाशीवर जाण्यासाठी तयार होऊ नयेत, असे महात्मा गांधी त्यावेळी म्हणाले होते.
ब्रिटिश वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु करारामध्ये झालेल्या अटी शर्तींनुसार फाशीच्या शिक्षेतून माफी देण्याचे ठरले नव्हते. त्यामुळे हा करार रद्द करण्याचे योग्य वाटले नाही, असेही महात्मा गांधी म्हणाले होते.
महात्मा गांधींनी त्यांच्या स्वराज्य नावाच्या पुस्तकात देखील या प्रकरणाबाबत लिहिले आहे. आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, मृत्यूची शिक्षा देण्यात येऊ नये. भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांना मला बोलण्याची संधी मिळाली असती तर तुमचा स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्ग चुकला आहे.
तो निष्फळ ठरणार आहे. देवाला साक्षी ठेऊन मी सांगू इच्छितो की हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे. अहिंसेने तुमच्या अडचणी वाढतील, असे मी भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांना सांगितले असते असे गांधी यांनी लिहिले आहे. मी व्हॉईसरॉय याच्याकडे भगत सिंह यांची फाशी रद्द करण्यासाठी मला जेवढे शक्य होते तेवढे मी प्रयत्न केले. माझ्यात जेवढी सांगण्याची, विनंती करण्याची जेवढी ताकद होती तेवढे मी प्रयत्न केले आहेत.
23 मार्चला (याच दिवशी भगत सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी दिली होती) मी व्हाइसरॉयला एक सविस्तर पत्र लिहिले त्या पत्रात मी सर्व मुद्दे सविस्तर मांडले होते. भगत सिंह अहिंसेला खतपाणी घालणारे नव्हते आणि ते हिंसेचा धर्म मानणाऱ्यांपैकी नव्हते. भगत सिंह व त्यांच्या सहकारी या वीरांनी मरणाची भीती सुध्दा पचवली होती. त्यांच्या शौर्याला वंदन.
परंतु त्यांनी जे कृत्य केले आहे त्याचे अनुकरण करता कामा नये. त्यांचे कृत्याने देशाचा फायदा झाला असं मला अजिबात वाटत नाही. जर खून करून चर्चेत येण्याची परंपरा चालू झाली तर लोक न्याय मिळवण्यासाठी एकमेकांचा जीव घेऊ लागतील. असे महात्मा गांधी म्हणाले आहेत.
नक्की खरे काय?
महात्मा गांधी म्हणाले होते, भगत सिंहांची फाशीची शिक्षा रद्द यासाठी मी व्हाइसरॉय यांच्यावर दबाव आणला होता परंतु या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्यांना याचे कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. फाशी देण्याच्याच दिवशी सकाळी गांधींनी व्हॉईसरॉयला भावनिक पत्र लिहिलं होते. त्याच्या माध्यमातून त्यांनी व्हाइसरॉय यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फाशी देण्याच्या दिवशीच पत्र लिहिल्याने खूप उशीर झाला.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्याच्या अगोदर गांधी आणि व्हॉईसरॉय यांच्यामध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेत भगत सिंह यांच्या फाशीचा मुद्दा अनावश्यक असल्याचं गांधीजी म्हणाले. त्यामुळे फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी व्हॉईसरॉयवर सर्व क्षमतेने दबाव आणला होता हा महात्मा गांधीचा दावा खरा ठरत नाही.
लोकांच्या विरोधातली तीव्रता लक्षात घेऊन महात्मा गांधी यांनी टीकेला उत्तर देत आपली भूमिका मांडली.
एकीकडे त्यांनी भगत सिंह यांच्या शौर्याचे कौतुक करत वंदन केलं परंतु स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी निवडलेल्या मार्गाला गांधींनी विरोध दर्शवला. त्यांचा मार्ग बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी सांगितले.
फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी यासाठी भगतसिंह अर्ज लिहिण्यास अजिबात तयार नव्हते. यावरूनच आपल्याला त्यांचा स्वभाव लक्षात येईल. त्यांच्या स्वभावावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, आपली फाशीची शिक्षा रद्द झाली नाही म्हणून त्यांना खंत अजिबात वाटली असेल. या प्रकरणात महात्मा गांधींवर भगत सिंह नाराज असल्याचा पुरावा कुठेही सापडत नाही.
भगत सिंह आणि त्याचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला होता तेव्हा प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह यांचे वडील सार सोभा सिंह हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. न्यायालयात सार शोभा सिंह यांनी भगत सिंह यांना ओळखलं. त्यामुळे जाणूनबुजून खुशवंत सिंह यांच्या साक्षीमुळे भगत सिंह यांना फाशी झाली असा प्रचार केला गेला.
परंतु या मधील महत्वाची बाब म्हणजे भगत सिंह यांना फाशी असेंब्लीत बॉम्ब फेकल्यामुळे झाली नव्हती तर पोलीस अधिकारी साँडर्सच्या हत्येच्या कटातील आरोपी म्हणून झाली होती. साँडर्स हत्येच्या प्रकरणाशी सोभा सिंह यांचा काहीही संबंध नव्हता. परंतु बॉम्ब हल्ल्यात भगत सिंह यांच्याकडे सापडलेला रिव्हॉल्व्हर आणि साँडर्सच्या हत्तेत वापरण्यात आलेला रिव्हॉल्व्हर एकच असल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळेच साँडर्सच्या हत्येचे आरोपी म्हणून भगतसिंह गुन्हेगार ठरले. सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे भगत सिंह यांना फाशी होण्यास सरकारी साक्षीदार झालेल्या त्यांचे क्रांतिकारी सहकारीच जबाबदार होते. त्यामध्ये जयगोपाल हे देखील होते. त्यांच्या चुकीमुळेच स्कॉटऐवजी साँडर्सची हत्या करण्यात आली होती. परंतु तेच या प्रकरणातील सरकारी साक्षीदार ठरले. जयगोपल यांच्यावर मात्र कुठेही टीका होताना पाहायला मिळत नाही.
भगतसिंह यांची आठवण राजकारण करण्यासाठी होत आहे की खरंच त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून होत असते? कारण त्यांचे नाव घेऊन महात्मा गांधींना टार्गेट केले जाते परंतु त्यांना अडचणीत आणणाऱ्या जयगोपाल यांच्याबाबतीत एकही शब्द कोण काढत नाही. कारण त्याचा कुठलाच राजकीय फायदा होत नाही. यावरून हे देखील सिद्ध होते की महापुरुषांची आठवण आपल्या सोईसाठी होत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम