Sameer wankhede: केवढा हा झोल! समीर वानखेडेंचा बुरखा फाटला टराटरा; वानखेडे जन्मापासूनच ‘मुस्लिम’ असल्याचे उगड

0

कर्डिलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे( Sameer wankhede)यांनी शाहरुख खानचा( Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drug case) ड्रग्स प्रकरणात अटक केली, आणि समीर वानखेडे संपूर्ण देशाची हेडलईन बनले. मात्र सुरवातीपासूनच हे प्रकरण फेक असल्याचे नवाब मलिक (Nawab Malik)यांनी म्हटल्याने, अनेकांकडून या प्रकरणात शंका उपस्थित केल्या जात होत्या. फक्त प्रकरणच नाही तर समीर वानखेडे हा माणूसच फेक असून, त्याने खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली असल्याच्या दावा मलिकांनी केला,आणि एकच खळबळ उडाली. मात्र आता हा दावा खरा असल्याचा पुरावा सामोरं आल्याने, पुन्हा खळबळ उडाली असून, समीर वानखेडे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर शंका घ्यायला वाव असल्याने, आणि त्यातच समीर वानखेडे यांनी ही कारवाई जाणून बुजून केली असल्याचा आरोप नवाब नवाब मलिक यांनी केल्याने या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचं बोललं गेलं. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातला स्वतंत्र असणारा साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar sahil) याने या प्रकरणात समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये मिळणार असल्याचा खुलासा केला, आणि समीर वानखेडे आणखीनच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर नवाब मलिक रोज नवनवीन खुलासे करत समीर वानखेडे हे जन्मापासूनच मुस्लिम आहेत. आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून, त्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली.आणि आपण मागासवर्गीय असल्याचं खोटं सांगत नोकरी मिळवली. असा गंभीर आरोप नवाब मलिक आपल्या ट्विटर अकाऊंटवर रोज करत होते. या संदर्भातले पुरावे देखील ते सादर करत होते. आणि यालाच कंटाळून समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेे(dyandev wankhede) यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.

राष्ट्रवादीचे( NCP) नेते नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत असल्यामुळे, आणि वारंवार आपल्या जाती संदर्भात खोटे पुरावे सादर करत असल्यामुळे, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञामदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना काल नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात समीर वानखेडे यांचा मुंबई महानगरपालिकेतील शाळेचा दाखला, आणि जन्माचा दाखला सादर केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आता या कागदपत्रावर आज न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते.

मुंबई महानगरपालिकेने (BMC) समीर वानखेडे यांचा शाळेच्या आणि जन्माच्या दिलेल्या दाखल्यावर समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याने, वानखेडे आता चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. आज जर न्यायालयात समीर वानखडे हे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचे सिद्ध झाले तर, समीर वानखेडे यांना हा खूप मोठा धक्का तर आहेच, मात्र त्यांना कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जावं लागणार आहे. त्याचबरोबर नवाब मलिक करत असलेले सर्व आरोप खरे असल्याचे देखील सिद्ध होणार आहे. आणि हा भारतीय जनता पार्टीला देखील मोठा धक्का मानला जातोय.

एकीकडे हे सगळं खरं असलं तरी, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(kranti redekar) यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महानगरपालिकेने समीर वानखेडे यांचा जन्माचा दिलेला दाखला पोस्ट केला आहे. या दाखल्यांमध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरुजी वानखडे आहे. दुसरीकडे महानगरपालिकेने सादर केलेल्या दाखल्यांवर समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचं समजतं. यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून, “दूध का दूध आणि पाणी का पाणी” होणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.