Onion price: ‘गड्याचं’ डोकं ठिकाणावर आहे का? केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी झाला हवालदिल
यंदा महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येऊन शेतकरी कांदा विक्रीसाठी सज्ज असत. त्यामुळे सध्या बाजारात लाल कांद्याची आवक नाही. त्यामुळे उन्हाळ कांद्याची दरवाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती.
शेतकऱ्यांना लाल कांद्यात झालेला तोटा उन्हाळ कांद्यातून भरून निघेल, अशी आशा होती म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांद्याची विक्री नोव्हेंबर डिसेंबर करता येईल व त्यात आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत होते. परंतु आता कांद्याची आयात करायला परवानगी दिल्याने कांद्याचा भाव मोठ्या प्रमाणात पडला आहे. कांद्याचे बाजारभाव पडल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे.
कांद्याचा पडत्या भावाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आज बाजारात विक्रीला आलेला कांदा लागवड व संगोपन, बी निर्मिती, रोपनिर्मिती, लागवड व काढणी, साठवणूक आणि विक्री यासारख्या अनेक टप्प्यातून आलेला आहे. साधारण दोन ते अडीच वर्षांची मेहनत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे कांद्याची होणारी वजनघट आणि खराब होणार कांदा हे विचारात घेता किमान पाच हजारापेक्षा अधिक भाव कांद्याला मिळणं अपेक्षित होत.
परंतु आता सरकारने कांदा आयात करून आणि बफर स्टॉकमधील कांदा बाजारपेठांमध्ये विक्रीला आणून देशांतील कांद्याचे बाजारभाव स्थिर केले आहेत. यामुळेच आता शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. शेतीला लागणारे साहित्य, खते यांच्या किमती गगनाला भिडायला गेल्या मात्र त्याच्यावर कुठलेही सरकारचे नियंत्रण नाही. आज पीव्हीसी पाईप चे दर कुठे गेलेत, खताचे दर कुठे गेले, औषधांचे दर कुठे गेलेत? या निमित्ताने असा प्रश्न निर्माण होतो की त्यांच्याकडून सरकारला काही टक्का तर भेटत नसेल ना मागच्या दाराने.
शासनाला शेतमालाच्या भावावर नक्कीच लक्ष ठेवावं, पण मग बाकीच्या गोष्टी कोण बघणार? बाकीच्या गोष्टींवर नियंत्रण कोण ठेवणार? शेतकरी फक्त राजकारण करण्यासाठी आहे का? शेतकऱ्यांणची तुमच्याकडून जी पिळवणूक होत आहे, त्याचे मोठे परिणाम तुम्हाला देखील भोगावे लागतील. १६ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, पुणे बाजारपेठेत कांद्याला किमान 500 रुपये व कमाल 2600 रुपये दर मिळाला आहे. तर चाकण (पुणे) बाजारात किमान 1500 रुपये तर कमाल 2500 रुपये दर मिळाला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम