T20 World Cup: भारतापेक्षा श्रीलंकेच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली;आयसीसीनेही काढली विराट कोहलीची लायकी
दुबईमध्ये झालेल्या टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार भारतीय संघ असल्याचे अनेकांनी म्हटलं. मात्र भारतीय संघाला पाकिस्तानने चारीमुंड्या चित केले. आणि आपण या स्पर्धेत मोठा संघ होता, हा गैरसमज क्षणात दूर झाला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ ही स्पर्धा जिंकेल असं कोणालाही वाटलं नाही. मात्र ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये कसं क्रिकेट खेळायचं हे पुन्हा एकदा दाखवून देत, आयसीसी स्पर्धेचे आम्हीच बादशाह असल्याचे सिद्ध करून दाखवलं.( Australia won the T20 World Cup 2021)
आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ‘मोस्ट व्हॅल्यूबल टीम ऑफ द टूर्नामेंट’ची निवड केली असून यात एकाही भारतीय खेळाडूला जागा मिळाली नाही. (Upstox Most Valuable team of the tournament)हा मोठा धक्का मानला जातोय. या विश्वचषकात जबरदस्त फलंदाजी आणि कॅप्टनशी करणाऱ्या पाकिस्तान संघाच्या बाबर आझमचीी (Babar azam as a captain कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावाही केल्या आहेत. t20 वर्ल्ड कप स्पर्धेतील मोस्ट ˈव्हॅल्यूबल टीम ऑफ द टूर्नामेंट’ मध्ये भारताच्या एकही खेळाडूला या यादीत जागा मिळवता आली नाही. (None of India’s players made it to the Most Valuable Team of the Tournament) हा अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मोठा अपमान समजलं जातोय.
विशेष म्हणजे आयसीसीच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील मोस्टˈव्हॅल्यूबल टीम ऑफ द टूर्नामेंट’च्या संघात श्रीलंकेच्या दोन खेळाडूंनीही जागा मिळवलीय हे विशेष. आयसीसीने निवडलेल्या या संघात सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नर (devid Warner) आणि जोस बटलरला संधी देण्यात आली असून, विकेट किपर म्हणूनही बटलरचीच निवड केली आहे. मात्र सेमीायनलच्या दोन्हीं सामन्यात आपापल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या डॅरिल मिशेल आणि ऑस्ट्रेलियाचा किपर वेड याला मात्र या संघात स्थान देण्यात आले नाही.
तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमची निवड केली असून, त्याला कॅप्टन म्हणून देखील संधी देण्यात आली आहे. आझमने या स्पर्धेत सहा सामन्यात तब्बल चार अर्धशतक झळकावत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला. सर्वाधिक धावा करूनही त्याला ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेँट’ने गौरवण्यात आले नसल्याने शोएब अख्तरने नाराजीही व्यक्त केली आहे. चौथ्या क्रमांकासाठी श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज ‘असलंकाला’ संधी देण्यात आली आहे. २४ वर्षाच्या या खेळाडूने विश्वचषकात प्रभावित करत उत्कृष्ट कामगिरी केली करत, सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
आयसीसीने निवडलेल्या ‘मोस्टˈव्हॅल्यूबल टीम ऑफ द टूर्नामेंट’च्या संघात पाचव्या क्रमांकावर ‘अॅडम मार्करम’ या साऊथ आफ्रिका संघाच्या प्रतिभावान फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. तर सहाव्या क्रमांकासाठी इंग्लंडचा ऑल राऊंडर ‘मोईन अली’ला स्थान देण्यात आले आहे. मोईन अलीने या विश्वचषकात संघासाठी काही उपयुक्त खेळ्या केल्या. सातव्या क्रमांकासाठी श्रीलंकेच्या लेगब्रेक गोलंदाज ‘वानिंदू हसरंगा’ यानेही या संघात स्थान फटकावले आहे. श्रीलंकेच्या दोन खेळाडूंनी आयसीसीने नेमलेल्या संघात जागा फटकवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
The @upstox Most Valuable Team of the Tournament has been announced 🌟
Does your favourite player feature in the XI?
Read: https://t.co/J3iDmN976U pic.twitter.com/SlbuMw7blo
— ICC (@ICC) November 15, 2021
आठ, नऊ,दहा, अकरा या क्रमांकावर अनुक्रमे झम्पा, हेझलवूड, बोल्ट, नोर्खिया या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर बारावा खेळाडू म्हणून शहीन आफ्रिदीला संधी मिळाली आहे. आयसीसीने निवडलेल्या या संघात एकाही भारतीय खेळाडूला संधी मिळाली नसल्याने, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र भारतीय खेळाडूंनी परफॉर्मन्सच केला नसल्याने, या संघात स्थान मिळाले नाही. हा भारतीय संघाचा आणि भारतीयांचा मोठा अपमान आहे. मात्र याला जबाबदार देखील भारतीय संघच आहे. हे देखील मान्य करावं लागेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम