Kangna Ranaut Controversy: या गांजाडी बाईला कोणीतरी आवरा रे; ‘कंगणा’च्या तोंडात आणखी किती घाण शिल्लक आहे…
काही दिवसांपासून कंगणा राणावत स्वतंत्र सैनिक, महापुरुषांच्या आणि आता राष्ट्रपिता यांच्या बाबतीत जी काही घाण ओकतेय, यावरून संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुसरीकडे काही जणांकडून तीची पाठराखणही केली जात असल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही जणांकडून कंगणाला दुर्लक्षित करायला हवं, असं आवाहन करण्यात येत आहे. तर काही जण तिच्या तोंडातून निघत असलेल्या वक्तव्याबाबत बीजेपी कडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आली नसल्याने, हे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही बोललं जात आहे.
काही दिवसापूर्वी कंगना राणावत हिने देशाला स्वातंत्र्य 1947ला मिळाला नसून,ती भीक होती. तर खरं स्वतंत्र भारताला 2014 म्हणजेच नरेंद्र मोदी आल्यावर मिळालं, असल्याचं धक्कादायक आणि वादग्रस्त विधान अंगाने केलं आणि एकच खळबळ उडाली. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला. मात्र या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणारा वर्ग देखील पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. कंगणाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले उतरल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले. गोखले यांनी फक्त कंगणाच्या वक्तव्याचे समर्थनच केले नाही तर, गांधीजींवर टीका करत आपल्या अकलेचे तारेही तोडले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कंगणाने अपमान तर केलाच, मात्र कंगणा इथेच थांबली नाही. यापुढे जाऊन ही बाई म्हणाली, 1947 मध्ये कोणतं युद्ध झालं? 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, याचे पुरावे द्या. असेही अकलेचे तारे तोडले. अशी अनेक वादग्रस्त विधानं करून देखील कंगना थांबायचं नाव घेईना. आज पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या विषयी कंगणाने वादग्रस्त विधान केल्याने संताप व्यक्त केला जातोय.
महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना कंगना म्हणाली,कानाखाली खाऊन स्वातंत्र्य मिळत नसतं. एक कानाखाली लावल्यानंतर दुसरा गाल पुढे केल्याववर फक्त भिक मिळते, स्वातंत्र्य नाही. असे वादग्रस्त वक्तव्य कांगणाने केलं आहे. महात्मा गांधी यांनी सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंग यांना कधीही पाठिंबा दिला नाही, असंही कंगना म्हणाली. आयुष्यभर सत्य आणि अहिंसा जोपासणाऱ्या गांधीजींच्या विचारांचा कंगनाने खूप मोठा अपमान केला असून, या संदर्भात सोशल मीडियावर कंगना मोठ्या प्रमाणात ट्रोल तर होतेयच, मात्र अनेकजण तिला शिव्या देखील घालताना पाहायला मिळत आहेत.
अनेक स्वत्रंत्र्यसैनिकांना महात्मा गांधी सारख्या लोकांनी इंग्रजाच्या हवाली केलं. या लोकांमध्ये इंग्रजांविरोधात लढण्याची ताकद नव्हती, मात्र सत्तेची भूक होती. असंही वादग्रस्त विधान कंगनाने केलं, असल्यामुळे, नवा वाद निर्माण आला आहे. आता तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातंय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कंगनावर टीका केली असून, ती राक्षसी वृत्तीची बाई असल्याचे म्हटले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम