Ajit Pawar: नगरकरांनी थेट पालकमंत्रीच बदलून टाकला; नगरकरांच्या ‘या’ कृत्यामुळे अजित पवारांनी डोकंच बडवून घेतलं

0

राष्ट्रवादीचे (NCP)ज्येष्ठ नेते आणि नगर(ahamadnagar) जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबत एक अनोखी घटना काल पारनेर(parner) तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळाले. पारनेर तालुक्यातील अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून काल संत निळोबाराय यांच्या मंदीराच्या कामाचे जीर्णोद्धार भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरकरांनी आपला थेट पालकमंत्रीच बदलून टाकल्याने अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

बेधडक बोलण्यासाठी आणि एक्शनची ‘रिएक्शन’ देण्यासाठी अजित पवार चांगलेच ओळखले जातात. अजित पवार नेहमी आपली विशिष्ट शैली जोपासत वावरताना दिसून येतात. कार्यकर्ता असो वा नेता असो त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर, पब्लिकली त्यांचा समाचार घेताना ते कोणतीही कसर ठेवत नाहीत. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र काल पारनेर तालुक्यातील पिपळेनेर(piplener) गावात संत निळोबाराय यांच्या मंदिर आणि वाड्याच्या जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना कोनशिलावरचे एक नाव पाहून अजित पवार अक्षरशः चकित झाले.

संत निळोबाराय यांच्या मंदिर आणि वाड्याच्या जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना कोनशिलावरचे हसन मुश्रीफ (Hasan mushrif)यांचे नाव पाहून अजित पवार(Ajit Pawar) अक्षरशः चकित तर झालेच. मात्र चकित होताना त्यांनी दिलेली ‘रिएक्शन’ फारच कमालीची होती,आणि सध्या त्याचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. संत निळोबाराय sant nilobaray) यांच्या मंदिर आणि वाड्याच्या जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,(Balasaheb Thorat) दिलीप वळसे-पाटील, Dilip walse patil) पारनेरचे आमदार निलेश लंके, Nilesh lanke)अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.

महा विकास आघाडीचे अनेक नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला, याच्या पेक्षा जास्त चर्चा ही कोनशिलावरचे हसन मुश्रीफ यांच्या नावात शुद्धलेखनात झालेल्या चूकीची झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी ही चूक लक्षात आणून दिली. चूक लक्षात आणून देताना, अजित पवार यांची ‘रिएक्शन’ कमालीची होती. ‘कोनशिलावर'( उद्घाटन फलक) हसन मुश्रीफ ऐवजी हसन मुस्त्रीफ(Hasan mushrif) अशी मोठी चूक लक्षात आणून देताना पवारांनी थेट डोकं हाणून घेतल्याचे पाहायला मिळाले.

वर्तमानपत्रे, न्युज चॅनल तसेच अनेक अनेक ठिकाणी शुद्धलेखनात चुका झाल्याच्या आपण अनेक वेळा पाहतो. मात्र काल कोनशिलावरच (उद्घाटनाच्या फलकावर) थेट पालकमंत्र्यांचच नाव बदलून टाकल्याने याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होताना पाहिला मिळाली. मात्र याच्यापेक्षा ही जास्त चर्चा ही चूक लक्षात आणून देताना अजित पवार यांच्या ‘रिएक्शन’ झाली. अजित पवारांनी थेट डोक्याला हात लावत ही चूक लक्षात आणून दिली. एवढ्या मोठ्या विषयावर अशी चूक कशी काय होते? असे देखील सोशल मीडियावर अनेकांनी विचारले असल्याचे पाहायला मिळाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.