इथे लोकांना 5 रुपयाचा वडापाव घेणं अवघड झालंय आणि हा भाड्या 5 कोटींचे घड्याळ घेतोय, आता केलीना जप्त बस बोंबलत..
क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची ५ कोटी किमतीची दोन घड्याळे सीमा शुल्क विभागाकडून (कस्टम विभाग) जप्त केली आहेत. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनव्हॉईस नव्हते आणि त्याने ही घड्याळे जाहीर देखील केली नव्हती. आयसीसी टी 20 स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली. रविवारी संध्यकाळी भारतीय क्रिकेट टीमसह हार्दिक पांड्याही मायदेशात परतला.यावेळी विमानतळावर हार्दिक पंड्याला सीमाशुल्क विभागाने थांबवले आणि त्याची दोन घड्याळे सीमाशुल्क विभागाकडून ताब्यात घेण्यात आली.
घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये होती. त्याच्या एका फोटोवर एकाने इथे लोकांना 5 रुपयाचा वडापाव घेणं अवघड झालंय आणि हा भाड्या 5 कोटींचे घड्याळ घेतोय, आता केली जप्त बस बोंबलत अशी कमेंट केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला आपला खेळ दाखवता आला नाही. हार्दिक पांड्याला ऑल राऊंडर खेळाडू मानला जातो. मात्र टी 20 विश्वचषक स्पर्धेत पंड्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात पंड्या फक्त 69 धावा करू शकला. विशेषबाब म्हणजे न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाच्या महत्त्वाच्या सामन्यातही पंड्याने अत्यंत महत्त्वाच्या विकेट्स तो घेऊ शकला नाही. बीसीसीआयकडून न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी 16 खेळाडूंची संघात घोषणा निवड की आहे. ज्या खेळाडूंनी या वर्षीच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली अशा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूीलंडविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत ऋतुराज गायकवाडलाही भारतीय संघात खेळण्यास संधी मिळाली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणतो की भारतीय संघात व्यंकटेश अय्यर हा हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो. व्यंकटेश अय्यरला अष्टपैलू म्हणून तयार करता येईल, असेही व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम