Today’s Onion Rate: केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी झाला चिंताग्रस्त; जाणून घ्या आजचे दर..

0

Today’s Onion Rate: शेतकऱ्यांसाठी कधी वरदान तर कधी शेतकऱ्याला रडवणाऱ्या कांद्याच्या दरावर सरकारच्या निर्णयाचा परिणाम झालेला आहे. आता कांद्याचे वाढते दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्याची आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली गेली आहे. कांद्याच्या आयातीमुळे आता कांद्याच्या दरावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. (Today’s Onion Rate: Onion prices fall sharply due to central government’s ‘Ya’ decision, farmers worried; Go for today’s rate)

आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ म्हणजेच लासलगाव येथे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तब्बल 625 रुपयांची घसरण दरात झाली आहे. (ही आकडेवारी 13 नोव्हेंबर रोजीची आहे.) सरकारच्या घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे एकतर शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

कांदा पिकापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यातच आता शासनाच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मध्यंतरी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने स्टॉकमधील कांदा देशातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पाठवला होता. त्याचसोबत कांद्याची आयात करुन दर आटोक्यात आणले जातील असे केंद्र शासनाने स्पष्ट केले होते.

त्याचाच भाग म्हणून आता इराण, तूर्की , अफगाणिस्थान या देशातून कांदा आयात केला जात आहे आणि आता कांदा आयातीचा परिणाम कांद्याच्या दरावर होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. ज्या भागात यावेळी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे अशा भागातील लोकांचे कांदा हे पीक शेवटची आशा होती. परंतु शेतकऱ्याने न खाचता धैर्याने खंबीर उभे राहणे गरजचे आहे.

कांदा साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची देखील झालीय पंचाईत: उन्हाळी कांद्याला दर नव्हता म्हणून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला होता. अजून दर वाढल्यावर आपला कांदा बाजारात घेऊन जाता येईल अशा अपेक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना निराशा आली आहे. याशिवाय मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसामुळेही काही ठिकाणी साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले होते.

आता दर वाढत असताना कांदा पिकासाठी झालेला खर्च तरी वसूल होईल अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. कांद्याचे दर देखील वाढताना पाहायला मिळत होते. मध्यंतरी साठवणूक केलेला कांदा बाजारात आल्यामुळे व आता कांद्याच्या आयातीला परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. आता कांदा दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांत 625 रुपयांनी कांद्याचा भाव पडला: उन्हाळी कांद्याचे गेल्या सहा महिन्यापासून पुढे तरी दर येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली होती. परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सुध्दा लासलगाव बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव होता. परंतु आता कांद्याच्या आयातीला सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने आयात कांदा बाजारात येताच कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे.

गुरुवारच्या बाजारभावानुसार शनिवारी 625 रुपयाने कांद्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात अशीच घसरण सुरु राहिली तर उत्पन्न तर सोडाच परंतु शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्चही निघेल का नाही याची शंका असल्याचे शेतकरी म्हणाले. शनिवारी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीमध्ये 371 गाड्यांमधून 5 हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदविण्यात आली होती. या कांद्याला कमाल 2575 रुपये तर किमान 900 रुपये आणि सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर देण्यात आला होता.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीनुसार आजचे 14 नोव्हेंबर 2021 रोजी किमान 1000 रुपये तर कमाल 2800 रुपये असा बाजारभाव कांद्याला मिळाला आहे. तर सांगली 12 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार किमान 1500 रुपये तर कमाल 3200 रुपये दर मिळाला होता.

..तर शेतकरी आंदोलन करणार: मध्यंतरी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. शेतकऱ्याला आता कुठे कांद्याचे भाव वाढल्याने आपण या संकटातून बाहेर पडू असे वाटले होते. परंतु केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आता पुरता हवालदील झाला आहे. कांद्याची आयात झाली तर कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला होता.

हेही वाचा: टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार 

Sharad Pawar: राज्यात दंगली शरद पवार यांच्या आशीर्वादानेच;जेव्हा-जेव्हा शरद पवारांचे सरकार येते, तेव्हा अश्या दंगली घडतातच 

काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे, या नेत्याने केला हा गंभीर आरोप 

काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे, या नेत्याने केला हा गंभीर आरोप 

खळबळजनक..! मोदींच्या मनात अस्थिरता निर्माण झाल्यामुळेच,पुन्हा एकदा जातीय दंगे, हिंदू-मुसलमान हिंसाचार ही जुनी हत्यारे भाजपने शेवटी बाहेर काढलीच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.