खळबळजनक..! मोदींच्या मनात अस्थिरता निर्माण झाल्यामुळेच,पुन्हा एकदा जातीय दंगे, हिंदू-मुसलमान हिंसाचार ही जुनी ‘हत्यारे’ भाजपने शेवटी बाहेर काढलीच..

0

औरंगाबाद शहरात महागाई विरोधात आज शिवसेनेकडून केंद्र सरकारचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा (Aakrosh morchya) काढण्यात आला होता. हा आक्रोश मोर्चा शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्या मार्गदर्शनाखाली निघाला होता. शिवसैनिक आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्याचे दिसून आले. हजारो जनसमुदायाला संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. संजय राऊत यांनी त्रिपुरा (Tripura)मध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून काही मुस्लीम संघटनांकडून राज्यात निघालेल्या मोर्चा विषयी देखील भाष्य केलं.

सेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमी आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारचा निषेध म्हणून, औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे परवानगी नसताना देखील या मोर्चाचे आयोजन केल्याने, सध्या हा आक्रोश मोर्चा चर्चेचा विषय बनला आहे.

या मोर्चात सहभागी झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. महागाई विषयी प्रश्न विचारले तर, केंद्र सरकार चीनच्या घुसखोरी विषयी बोलतं. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी बोलतं. यामुळे महागाई कमी होणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होणार नाहीत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. असे अनेक सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

आज इंधन दरवाढ गगनाला भिडले असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या काळात डिझेल पेट्रोल साठ-पासष्ट रुपयांवर गेलं,गॅस महाग झाला तर स्मृती इराणी, भाजपचे नेते गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरायचे. इंधन दरवाढ विरोधात मोर्चे काढायचे,आता ही मंडळी कुठे झोपली आहेत? असा सवार देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या आक्रोश मोर्चाची जोरदार चर्चा होतेय, ती म्हणजे अमरावतीत झालेल्या हिंसाचार विषयी संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे.

औरंगाबादमध्ये काढलेल्या आक्रोश मोर्चात संजय राऊत यांनी देशातल्या एकूण परिस्थितीवर भाष्य केले. देशात धार्मिक तेढ निर्माण करून जी काही जाळपोळ हिंसाचार होत आहे, याला सर्वस्वी भाजप जबाबदार असल्याचा घणाघात राऊतयांनी आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तेरा राज्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे भाजपच्या मनात अस्थिरता निर्माण झाली आहे.‌ आणि म्हणून भाजप पुन्हा एकदा जातीय दंगे, हिंदू-मुसलमान हिंसाचार ही त्यांची जुनी त्यांची हत्यारे बाहेर काढायला सुरुवात केली असल्याचा, घणाघात आणि मोठा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.

रजा अकादमीने अमरावतीमध्ये काढलेल्या मोर्चाविषयी देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. रजा अकादमी ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचे पिल्लू राहिलेलं आहे. त्यांची ताकद आम्हाला माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचा तो आवाज आहे. भारतीय जनता पार्टीला जे हवं असतं तेच रजा अकादमी करत असते, हे सगळ्यांना माहिती आहे. असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे. रजा अकादमीला मुस्लीम समाजात अजिबात स्थान नाही. हे मी विश्वासाने आणि जाणीवपूर्वक सांगतोय, असंही राऊत म्हणाले.

रजा अकादमी हे भाजपच्या सूचनेनुसार काम करते, हे सगळ्यांना माहिती आहे. असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही वर्षापासून अमरावतीत कोण वातावरण बिघडवत? याचा शोध घेण्याची वेळ आली असून, गृहमंत्राने यांची माहिती घ्यायला हवी, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी वर केलेले गंभीर आरोप आणि धक्कादायक विधानानंतर आता राजकारण चांगलेच तापण्याची वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.