Sharad Pawar: राज्यात ‘दंग’ली शरद पवार यांच्या आशीर्वादानेच;जेव्हा-जेव्हा शरद पवारांचे सरकार येते, तेव्हा अश्या ‘दं’गली घडतातच

0

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीने(BJP) अमरावतीत आज बंद पुकारला होता,Amravati called off today मात्र या बंदला गालबोट लागत हिंसाचार घडल्याची घटना घडली. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना या घटनेला जबाबदार धरत असल्याचे दुर्दैव महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे. संजय राऊत,( Sanjay Raut) तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेत भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचं म्हटलं, तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अमरावतीत घडलेली घटना शरद पवारांमुळेच घडली आहे. असही धक्कादायक विधान केलं आहे.

त्रिपुरात अल्पसंख्यांकांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी काही मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढत, या घटनेचा निषेध नोंदवायला सुरूवात केली. काल राज्यात काही ठिकाणी शांततेत मोर्चे निघाले, मात्र काही ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना पाहायला मिळाली. काल अमरावतीत या मोर्चाला गालबोट लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आज अमरावतीत बंद पुकारला. मात्र या बंदचे हिंसाचारात रूपांतर झाले, आणि काही दुकानेही फोडण्यात आली, दगडफेक देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी हा हिंसाचार रजा अकादमीमुळे घडला असून, त्यांच्यावर लवकर बंदी घाला. नाहीतर त्यांना कसं बंद करायचं हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. अशा इशाराही भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणे यांनी दिला. मात्र रजा अकादमी (Raja akadami)ही भारतीय जनता पार्टीचं पिल्लू असून, भारतीय जनता पार्टीच्याच इशाऱ्यावर ही संघटना काम करते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. एवढेच नाही तर संजय राऊत यांनी भाजपच्या मनात आता अस्थिरता निर्माण झाल्यामुळेच, त्यांनी आपली जुनी हत्यारे काढायला सुरूवात केली, असा गंभीर आरोप केला.‌

नुकत्याच झालेल्या तेरा राज्यांच्या पोट निवडणुकीत भाजपचा दारूण झालेल्या पराभवामुळे भाजप अस्थिर झालं आहे, असं त्यांना वाटत आहे. आणि म्हणून त्यांनी जातीय तेढ, हिंदू-मुस्लिम हिंसाचार, अशी त्यांची जुनी हत्यारे, ते आता बाहेर काढून देश पेटवायचं काम सध्या करत आहेत. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर आज माध्यमांशी बोलताना केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगला समाचार घेतला. आज बाळासाहेब असते तर, त्यांनी संजय राउत यांच्या थोबाडीत मारली असती. असं वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.

एकीकडे शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना भाजपच्या एका माजी मंत्र्याने या प्रकरणात थेट शरद पवारांनाच ओढले असून, त्यांनी शरद पवारांविषयी वादग्रस्त विधानही केले आहे. भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे म्हणाले, अमरावती,नांदेडमध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या शरद पवार यांच्या आशीर्वादानेच होत आहेत. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते, तेव्हा अश्या दंगली घडतात. असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे यांच्या विधानामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.